आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजच्या या डिजिटल युगात चित्रपटाच्या पोस्टरला पूर्वीइतके महत्व नसले तरी, अजूनही सिनेमांचे पोस्टर प्रदर्शित केलेच जाते.
मोशन पोस्टर नावाने चित्रपटाच्या घोषणेवेळी हे पोस्टर प्रदर्शित करतात. पूर्वी सिनेमांची पोस्टर ही पेंट केली जायची आणि रात्रीतून ती शहरात, गावात मोक्याच्या ठिकाणी लावली जात. लोकांना हीच पोस्टर पाहून कोणता सिनेमा प्रदर्शित होणार आहे हे समजायचे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
आजच्या काळात तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी अतिशय पुढे गेली असली, तरी पोस्टरची परंपरा टिकून आहे.
आज पोस्टर लावली न जाता ती सोशल मीडियावर व्हायरल केली जातात. याच सोशल मीडियामुळे आपल्या देशात कोणता सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे हे परदेशात बसूनही समजते.
आपल्या देशात अनेक सिनेमे हे इतर देशातील अथवा भाषांतील चित्रपटाचे रिमेक आहे. किंबहुना सध्यातर रिमेकचाच जमाना आल्याची भावना सर्वांनाच होत असते. मात्र तुम्हाला ठाऊतक आहे का की, सिनेमांसारखे सिनेमांचे पोस्टर देखील आपण रिमेक केले आहेत?
हो आपल्या देशातील असे अनेक सिनेमे आहेत ज्यांची पोस्टर सुद्धा दुसऱ्या सिनेमाच्या पोंस्टरची कॉपी आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सिनेमांच्या पोस्टरबद्दल.
बाहुबली द बिगनिंग :
२०१५ साली आलेल्या या सिनेमाने लोकप्रियतेचे आणि कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. त्यावर्षीचा किंबहुना पुढील अनेक वर्ष हा सिनेमा चर्चेत होता.
या सिनेमाचे पोस्टर ज्यात राणी शिवगामिनी देवी यांचे संपूर्ण शरीर पाण्यात असून एक हात मात्र पाण्याबाहेर होता आणि त्या हातात एक छोटे बाळ होते. हे पोस्टर खूपच प्रसिद्ध झाले. मात्र तुम्हाला माहित आहे, हे पोस्टर १९९८ साली आलेला हॉलिवूडचा सिनेमा ‘साइमन बर्च’चे कॉपी केले होते.
फरक फक्त एवढा होता की, बाहुबलीच्या पोस्टरमध्ये शिवगामी देवीचा एक हात वर होता आणि त्याच हातात बाळ होते तर साइमन बर्चच्या पोस्टरमध्ये दोनी हात बाहेर होते आणि त्यात बाळ होते.
बाहुबली 2 :
२०१७ मध्ये कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? ह्या प्रश्नाचे उत्तर घेऊन बाहुबली २ हा सिनेमा प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे या सिनेमानेही तुफान कमाई केली, आणि लोकप्रियता मिळवली. पण या सिनेमाचे पोस्टर देखील कॉपी केलेले होते.
बाहुबली २ चे पोस्टर ज्यात प्रभास हत्तीवर चढून उभा आहे ते पोस्टर २००८ साली आलेल्या टोनी जा चा चित्रपट ‘ओंग बैक २’ चे पोस्टर पाहून तयार केले होते.
पीके :
२०१४ साली प्रदर्शित झालेला परफेक्शनिस्ट आमिर खान याचा पीके हा सिनेमा खूप यशस्वी झाला. मात्र या सिनेमापुर्वी आमिरचे अंगावर कपडे नसलेले फक्त एक रेडिओ असलेले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, त्यावरून या सिनेमाबद्दल खूप चर्चा तर झाली, मात्र खूप वादही झाला आणि आमिरला खूप ट्रोल देखील केले गेले.
हे पोस्टर ७० च्या दशकात आलेल्या पोर्तुगीज़ आर्टिस्ट क्विम बर्रीरोज़च्या अल्बमच्या पोस्टरवरून कॉपी करण्यात आले होते.
–
हे ही वाचा – तुम्हाला आवडणारी ही सारी लोकप्रिय गाणी चक्क चोरलेली आहेत!
–
गजनी :
२००८ साली आलेल्या या सिनेमांतून आमिरच्या अभिनयसोबतच त्याचा हेअरकट, त्याची बोली, त्याची स्टाईल या सर्वांची भरभरून स्तुती झाली. या सिनेमाचे जेव्हा पाहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले त्यात आम्हीरचा एक पाठ दाखवणारा दमदार बॉडी असणारा, केस नसलेला फोटो तर त्यापुढे ब्लेझर आणि गॉगल्स घातलेल्या सांर्त लूकमधला आमिर खूप भाव खाऊन गेला.
मात्र हे पोस्टर २००८ मधेच आलेल्या हॉलीवुड सुपरहीरो सिनेमा असलेल्या ‘द इनक्रेडिबल हल्क’च्या पोस्टरवरून कॉपी केले होते.
राऊडी राठौर :
२०१२ साली आलेल्या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा अभिनित राऊडी राठोड हा सिनेमा खूप हिट झाला. तेलगू सिनेमा ‘विक्रमारकुडु’चा रिमेक असणारा हा चित्रपट टिपिकल प्रभुदेवा स्टाईल होता.
सिनेमा तर ओरिजनल तेलगू चित्रपटाचा रिमेक होता, आणि या सिनेमाचे पोस्टर १९९८ साली आलेल्या हॉलीवुडच्या ‘द रिप्लेसमेंट किलर्स’चे रिमेक होते.
ज़िंदगी ना मिलेगी दोबारा :
२०११ साली प्रदर्शित झालेला झोया अख्तरचा हा सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटातील कथा आणि कलाकारांपासून ते गाणी, लोकेशनपर्यंत सर्वच प्रेक्षकांना खूप आवडले.
मात्र या सिनेमाचे पोस्टर हे २००५ मध्ये रिलीज़ झालेल्या हॉलीवुडपट असणाऱ्या ‘लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन’वरून कॉपी केले होते.
रा वन :
बॉलीवूडच्या किंग खानचा हा सिनेमा खूप अपेक्षा असणारा होता. सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक असणारा हा सिनेमा प्रेक्षकांना भावला नाही. सिनेमाने जरी १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमवला असला तरी चित्रपटाच्या बजेटच्या हिशेबाने हा सिनेमा फ्लॉप म्हणूनच गणला जातो.
यासर्वांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा २००८ साली आलेल्या ‘बॅटमॅन बिगिन्स’ चित्रपटाच्या पोस्टरवरून उचलले होते.
झिरो :
२०१८ साली आलेला हा सिनेमा एक फ्लॉप सिनेमा म्हणून ओळखला जातो. शाहरुखने या सिनेमात एका बुटक्या माणसाची अतिशय वेगळी व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र तरीही हा सिनेमा प्रेक्षकांना भावला नाही.
या सिनेमाचे पोस्टर २०१६ साली आलेल्या फ्रेंच ‘उन होममे आ ला हॉटयूर’ सिनेमाच्या पोस्टरवरून कॉपी केले होते.
जजमेंटल है क्या :
अनेक वादांनंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना नाही तर समीक्षकांना जास्त भावला.
मात्र या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित होताच त्यावर हंगरीच्या एका फोटोग्राफरने फ़्लोरा बरसीने त्यांच्या एका फोटोवरून पोस्टर कॉपी केल्याचा आरोप लावत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती.
–
हे ही वाचा – मराठीतला मास्टरपीस “अशी ही बनवाबनवी” एका फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक होता!
–
दिलवाले :
२०१५ साली आलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान आणि काजोल अभिनित हा सिनेमा सरासरी इतका चालला. चित्रपटाची गाणी जास्त हिट झाली.
मात्र या सिनेमाने देखील त्यांचे पोस्टर २०१४ साली आलेल्या ‘द बेस्ट ऑफ मी’ वरून तयार केले होते.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.