' शनिवारवाडा आणि पर्वती म्हणजेच पुण्यात भ्रमंती! या १२ स्थळांमुळे ‘गैरसमज’ दूर होईल. – InMarathi

शनिवारवाडा आणि पर्वती म्हणजेच पुण्यात भ्रमंती! या १२ स्थळांमुळे ‘गैरसमज’ दूर होईल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाराष्ट्रातील सोनेरी त्रिकोण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे-नाशिक यांच्यातील पुणे हे शहर भारतातील IT hub म्हणून लवकरच ओळखलं जाणार आहे.

मुंबई श्रेष्ठ की पुणे? हा वाद बाजूला सारला, तर मुंबईच्या दमट आणि उकडणाऱ्या हवामानापेक्षा पुण्याचं गार हवामान, मुंबईच्या तुलनेत किंचित का होईना कमी गर्दी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचा मध्यम वेग ही काही करणं लोकांना मुंबईपेक्षा पुण्याला जास्त प्राधान्य द्यायला भाग पाडतायत.

 

mumbai and pune inmarathi

 

पुण्याची निसर्ग संपन्नता, डोंगर, दऱ्या, पुण्याला लाभलेला सुवर्ण ऐतिहासिक वारसा, तिथे जपल्या जाणाऱ्या परंपरा, मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी माणसं आणि मुंबई इतकंच प्रगत असून सुद्धा पुण्यात आपण आपल्या महाराष्ट्रातच आहोत हे सगळे घटक लोकांना आणि पर्यटकांना पुण्याकडे खेचतायत.

पुणे म्हटलं की पर्यटनाच्या दृष्टिने पर्वती, शनिवार वाडा, तुळशी बाग, दगडू शेठ हलवाईचा गणपती इतकीच मर्यादित ठिकाणं आपल्या ध्यानात येतात.

अहो पण, पुणे तिथे काय उणे? ते इथवर येऊन थांबतय होय? शिक्षणाच्या या माहेरघराचे असे अनेक पैलू आहेत जे अजूनही दुर्लक्षित किंवा पर्यटकांच्या नजरेआड आहेत ज्यांना दृष्टीस आणायची गरज आहे. आज आम्ही तेच करणार आहोत. पुण्याच्या काही दुर्लक्षित ठिकाणांबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.

१. बाणेर – पाषाण जैविकविविधता उद्यान

बाणेर आणि पाषाण टेकड्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जैविक विविधतेच्या संरक्षणासाठी ह्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. ५०० एकर जागेत निर्मिती केलेलं हे उद्यान ध्यान आणि ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. सिंहगड आणि इतर ठिकाणांना कंटाळला असाल तर बाणेर – पाषाण उद्यानाला नक्की भेट देऊन बघा.

 

baner biodiversity park map inmarathi

 

२. ग्राम संस्कृती उद्यान

या उद्यानात महाराष्ट्रातील पारंपरिक जीवन कसं होतं याचं दर्शन घडतं. अगदी जिवंत वाटणारे देखावे, शिल्प, विविध प्राणी आणि मळे यांचा सगळ्यांचा आनंद एकाच ठिकाणी घेता येऊ शकतो.

 

gram sanskruti udyan inmarathi

 

आजकालच्या मुलांना आपलं खेड्यातील पारंपरिक जीवन कसं होतं याची जाणीव करून द्यायची असेल तर ग्राम संस्कृती उद्यान तुमच्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.

३. पु. ल. देशपांडे किंवा ओकायामा फ्रेंडशिप गार्डन, पुणे

जपानच्या तीन सर्वोत्कृष्ट आणि मोठ्या उद्यानांना आदरांजली म्हणून ह्या उद्यानाचं निर्माण करण्यात आलं होतं. १० एकर जागेवर विस्तृत असलेलं हे उद्यान अगदी नयनरम्य आहे, निसर्गप्रेमींसाठी तर एक मेजवानीच.

 

okayma friendship garden pune inmarathi

 

४. मेजर प्रदिप ताथवडे उद्यान

२००० साली जम्मूच्या पूंच जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी चकमकीत शहिद झालेले, पुण्यातील मेजर प्रदिप ताथवडे यांच्या स्मरणार्थ ह्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

 

shahid major pradeep thatavde udyan inmarathi

 

सहल, व्यायाम, योग, जॉगिंग ह्या सगळ्यासाठी हे उद्यान अगदी योग्य आहे. विविध फुलझाडांनी बहारलेलं हे उद्यान मनःशांती प्रदान करून आपल्याला प्रसन्न करत.

हे ही वाचा – पुणेकरांच्या या विचित्र तऱ्हा वाचून गंमत वाटेल, पण हा माज नाही, तर…

५. जिजामाता उद्यान

राणी बाग, व्हिक्टोरिया गार्डन अशा विविध नावांनी ओळखलं जाणारं हे उद्यान इथे घडवण्यात आलेल्या सुंदर वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे.

या उद्यानात छोट्या चाळी सुद्धा आहेत. इथे आल्यावर उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरात स्थित मुंबई झूलॉजिकल पार्क आणि भाऊ दाजी लाड संग्रहालय या दोन ठिकाणांना सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.

 

jijamata udyan pune

 

ज्यांना ब्रिटिश रॉयल्टीचा अनुभव हवा असेल आणि ज्यांना इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी या उद्यानाला नक्की भेट द्या.

६. ओशो आश्रम

ओशोंना मानणाऱ्यांसाठी हा आश्रम म्हणजे सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. पुण्याच्या कोरेगाव येथे स्थित या आश्रमात ओशोंचे तत्वज्ञान, मनःशांती प्राप्त करण्यासाठी योग साधना आणि आयुष्य जगण्याची कला शिकवली जाते.

 

osho international pune inmarathi

 

फक्त पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा आश्रम भेट देण्यासारखा आहे. वर्षभर सुरु असणाऱ्या ह्या आश्रमात राहण्याची मात्र सोय नाही. एक दिवसीय सहलीसाठी या आश्रमाला भेट देऊ शकता.

७. पाताळेश्वर गुफा मंदिर

या मंदिराची निर्मिती ८ व्या शतकात केली गेली होती. शंकराचं हे मंदिर अजिंठा आणि एलोराच्या गुहांसारखंच आहे. जंगली महाराज रोडवर असलेलं हे मंदिर दगडात कोरण्यात आलं होतं. चर्च मंदिर पंचलेश्वर किंवा बांबुर्डे नावाने सुद्धा ओळखलं जाते.

फक्त स्थानिक राहिवास्यांनाच या मंदिराबद्दल माहित असून इथे फार पर्यटक येत नाहीत. ह्या मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत आहे.

 

pataleshwar temple inmarathi

 

९. जनजातीय संग्रहालय

कोरेगावात असलेलं हे संग्रहालय आदिवासी प्रजातींना समर्पित आहे त्यामुळे ह्या संग्रहालयात महाराष्ट्रात आढळणाऱ्या आदिवासी प्रजातींबद्दल माहिती दिली जाते.

देखावे, पुतळे, आदिवासी वापरत असलेली अस्त्रशस्त्र, त्यांचं राहणीमान दर्शवणारी भांडी इत्यादी सगळं इथे संग्रहित आहे. आदिवासी संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

 

tribal museum inmarathi

 

१०. कात्रज सर्प उद्यान

सर्प प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जाणाऱ्या ह्या उद्यानात १६० हुन अधिक भारतीय व विदेशी सापांच्या प्रजाती पाळलेल्या आहेत.

१९८६ साली ह्या उद्यानाचं बांधकाम पूर्ण होऊन हे जनतेला समर्पित करण्यात आलं. ९ फूट लांबीचा कोब्रा ह्या उद्यानाचं आकर्षण केंद्र आहे.

 

katraj snake park inmarathi

 

दरवर्षी नागपंचमीला इथे मोठा उत्सव साजरा केल्या जातो व लोकांना सापांबद्दल माहिती दिली जाते, जागृत केलं जातं. जेणेकरून लोकं सापाला मारणार नाहीत.

११. शिरोटा तलाव

पुण्याच्या बाहेर असलेल्या या तलावावर फार वर्दळ नसते. इथे दिवसभर ट्रेकिंग, आणि इतर ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर रात्री तलावाजवळ शेकोटी पेटवून, खुल्या आकाशाखाली चमचमत्या चांदण्यांचा आनंद लुटण्याची काही औरच मजा असते.

 

shirota lake inmarathi

 

१२. मस्तानी तलाव

असे म्हणतात थोरले पेशवे मस्तानी बाईसाहेबांबरोबर ह्या तलावाला नेहमी भेट देत असत. शहराच्या वर्दळीपासून फार लांब असलेला हा तलाव, भोवतालची हिरवळ निसर्गाचं सौंदर्य आणखीन खुलवतं.

 

mastani lake inmarathi

 

याशिवाय, अनेक गड- किल्ले जसे- मल्हारगड, विसापूर किल्ला, घनगड किल्ला, आणि अनेक नद्या आणि तलाव जसे – कुंडलिका नदी, पाषाण तलाव, कात्रज तलाव ही ठिकाणं सुद्धा पर्यटनाचं आकर्षण ठरू शकतात.

===

हे ही वाचा – पुणे तिथे काय उणे : या सुप्रसिद्ध झणझणीत मिसळींचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?