' एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं – InMarathi

एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंडियन एअरलाईन्सच्या वुमनियांची भरारी

 

स्त्रियांचं ड्रायव्हिंग हा टर उडविण्याचा आणि विनोदाचा लाडका विषय असताना इंडियन एअरलाईन्सच्या महिला पायलट्सनी सर्वात जास्त लांबीचं आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण उड्डाण करून जगाच्या कौतुकाचा विषय आणि भारतासाठी अभिमानाचा विषय होण्याचा मान पटकवाला आहे.

 

एअरईंडियाच्या महिला पायलट चमूनं भल्याभल्यांना चकीत करणारी भरारी मारून जगभरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय होण्याचा मान पटकवला आहे. याचं कारण म्हणजे या चमूनं नॉर्थ पोलपर्यंतचा हवाई प्रवास केला. बेंगलोर ते सॅन फ़्रॅन्सिस्को असं फ़्लाईट या महिला पायलट चमूनं नियंत्रित केलं.

 

north pole inmarathi

हे ही वाचा – ७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष? तर विशेष हे आहे की, हे इतर सामान्य उड्डाणांसारखं उड्डाण नाही.तर या प्रवासासाठी उत्तर ध्रुवावरून (northa pole) उड्डाण करावं लागतं.

इतिहासात पहिल्यांदाच महिला वैमानिकाच्या नेतृत्वाखाली केवळ महिला चालक दल असणारं असं जे उड्डाण होतं. याचं नेतृत्व केलं, तरूण आणि वयानं लहान झोया अगरवाल हिनं.

झोया आणि तिच्या टीमला या दिवसाची खूप आतुरता होती. जगात जिथे अनेकांनी उत्तर ध्रुव नकाशातही फ़ारसा बघितलेला नाही तिथे या महिला त्यावरून उड्डाण करणार होत्या.

बोईंग ७७७ आणि हा महिला पायलट चमू जगातल्या सर्वात लांब मार्गावर उड्डाण करून आला आहे. या चमूमधे अनेक अनुभवी महिला पायलटही आहेत. यात कॅप्टन पपगारी थनमाई, आकांक्षा सोनावरे आणि कॅप्टन शिवानी मन्हास यांचा समावेश होता. कोणत्याही पायलटसाठी हे एक स्वप्न सत्यात येणं आहे.

बोईंग ७७७-२००LR हे विमान इतकं शक्तिशाली आहे की ते पृथ्वोवरची कोणतिही दोन टोकाची दोन टिंबं प्रवासानं जोडू शकतं. यामुळेच हा इतका लांब प्रवास शक्य झाला आहे.

 

air inmarathi

 

एव्हिएशन एक्सपर्टसच्यामते हे उड्डाण सोपं नाही. तांत्रिक ज्ञान अचून असल्याखेरीज हे उड्डाण करणं अशक्य आहे. कौशल्य आणि अनुभव असल्याखेरीज हे उड्डाण यशस्वी करणं अवघड आहे.

झोया अगरवाल ही जगातली सर्वात कमी वयात बोईंग ७७७ उडविणारी महिला पायलट आहे. २०१३ साली प्रथमच बोईंग पायलट बनलेल्या झोयानं प्रचंड आत्मविश्र्वासानं ही भरारी घेऊन जगभरात एक उदाहरण प्रस्थापित केलं आहे.

 

joya inmarathi

हे ही वाचा – आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील

आता तिच्या शिरपेचात उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणारि पहिली महिला पायलट हा तुराही खोवला गेला आहे. तिचा हा आत्मविश्र्वास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही. जर तुमच्या आत्मविश्र्वास असेल तर जगातलं कोणतंही काम तुमच्यासाठी अशक्य असत नाही.

स्त्री म्हणून कोणत्याही मर्यादा जर निसर्गानं निर्माण केलेल्या नाहीत तर त्या मनानं कच खात आपण का निर्माण करायच्या? असं ती म्हणते. तिचा हा आत्मविश्र्वासच तिला या अनोख्या मोहिमेच्या नेतृत्वापर्यंत घेऊन गेला.

 

air 2 inmarathi

 

जगभरातलया हवाई कंपन्या या मार्गावरच्या उड्डाणांसाठी त्यांच्याकडचे जुने आणि अनुभवी पायलट निवडत असतात. एअर इंडियाच्या  एअरलाईन्सनं मात्र झोयासारख्या अनुभवानं कमी आणि वयानं लहान मात्र यातलं तंत्र पूर्णपणे अवगत असलेल्या पायलकडे हे नेतृत्व सोपवून एक उदाहरण घालून दिलं आहे.

एअर इंडियाची अनेक विमानं या मार्गावरून या पूर्वीही उडून आलेली आहेत. मात्र हे इतिहासात प्रथमच घडलं की या उड्डाणासाठी एका महिला पायलटची निवड करण्यात आली. शिवाय तिच्या सोबत सहय्यक म्हणून इतर पायलटही महिलाच होत्या. हे पहिल्यांदाच घडलं म्हणूनच चर्चेचा विषय झाला.

 

pilot inmarathi

 

या टीमनम सॅन फ़्रॅन्सिस्को येथून भरारी घेतल्यानंतर युनिअन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप पुरी यांनी त्यांच्या ट्विटमधे म्हणलं बोईंग ७७७ च्या कॉकपिटमधे व्यावसायिक, कुशल आणि आत्मविश्र्वासानं परिपूर्ण अशा एयर इंडियाच्या महिला पायलट उपस्थित आहेत आणि या विमानानं भरारी घेतली असून ते सॅन फ़ॅन्सिस्को ते बेंगलोर व्हाया नॉर्थ पोल असं उड्डाण करणार आहे. आपल्या नारी शक्तीनं आजा ऐतिहासिक भरारी घेतली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.

दक्षिण भारता आणि उत्तर ध्रुवावरून हे पहिलंच नॉन स्टॉप उड्डाण होतं. चार महिला वैमानिकांनी १६ हजार किलोमिटर्सचं अंतर नॉन स्टॉप पार करत इतिहास रचला.

===

हे ही वाचा – या ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत !

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?