Site icon InMarathi

राम मंदिरासाठीच्या निधीतील ‘हा’ चेक ठरतोय चर्चेचा विषय! क्रिएटिव्हिटीचे सर्वत्र कौतुक

ram mandir donation viral cheque inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या देशात क्रिएटिव्हिटीला बिलकुल तोटा नाहीये. देशातल्या लोकांची क्रिएटिव्हिटी आपण अनेकदा टीव्ही, सोशल मीडिया वगैरे माध्यमातून बघतच असतो.

कधी कधी लोकांची क्रिएटिव्हिटी पाहून हसायला, रडायला येते तर कधी रागही येतो. कधी कधी तर हसावे की रडावे कळत नाही. मात्र सध्या अशीच एक क्रिएटिव्हिटी या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही क्रिएटिव्हिटी एका चेक संदर्भात असून, तुम्ही जर तो चेक पहिला, तर नकळत तुमच्याही तोंडून चेक लिहणाऱ्या माणसाची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही.

मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिराच्या पायाभरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. आता या मंदिराच्या बांधणीसाठी संपूर्ण देशातून इतकेच नव्हे तर विदेशातूनही अनेक भक्त आर्थिक मदत करत आहे.

 

 

त्यासाठी देशात एक मोहीम देखील चालवली जात आहे. त्या अंतर्गत लोकांनी त्यांची मदत केली आहे. यामध्ये अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकारणामधील अनेक वरिष्ठ नेत्यांनाही देणगी दिल्याचे पहायला मिळाले.

आता या देणगी गोळा करण्याच्या मोहिमेची सांगता झाली आहे. मात्र या देणगीमध्ये एका भक्ताने देणगीचा चेक दिला असून, हा चेक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हा चेक २ लाख १४ हजार २१४ रुपयांचा आहे. या चेकचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चेक वायरल होण्यामागचे कारण म्हणजे या चेकमध्ये अंकात लिहिली गेलेली रक्कम. हा चेक श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या नावाने २ लाख १४ हजार २१४ रुपयांचा देण्यात आला आहे.

लक्षवेधी बाब म्हणजे, या चेकवर आकड्यांमध्ये रक्कम लिहिताना २१४२१४ हे मराठी आकडे इंग्रजी आकड्यांमध्ये अशापद्धतीने लिहिले आहे, की ते देवनागरीमधील रामराम असे वाचता येत आहे. याचमुळे हा चेक देणाऱ्या व्यक्तीच्या क्रिएटीव्हीचे सर्वत्र खूपच कौतुक होत आहे.

 

 

व्हायरल फोटोमध्ये आकड्यांमध्ये लिहिण्यात आलेल्या रक्कमेकडे म्हणजेच ‘रामराम’ नावाकडे लक्ष जावे म्हणून बाण दाखवण्यात आला आहे.

अयोध्येमधील राम मंदिराच्या उभारणीसाठी सुरु केलेल्या या निधी संकलन मोहिमेमधून जवळपास दोन हजार १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा झाल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.

===

हे ही वाचा – श्रीराम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम परस्पर सौहार्दाचा घंटा नाद…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version