Site icon InMarathi

देशपांडे बहिणींची सुरेल आवाजातील ‘ही वाट दूर जाते’, नवीन गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

deshpande inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तसे पहिले तर मराठी मनोरंजन विश्वात खुप कमी भावाबहिणीच्या हिट जोड्या पाहायला मिळतात. एक फ्लॉप तर एक हिट असे अनेक कलाकार आहे, मात्र दोन्ही हिट असणारे फार कमी. यातलीच एक जोडी आहे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या बहिणीची.

 

 

मृण्मयीने ‘अग्निहोत्र’ आणि ‘कुंकू’ मालिकांसोबतच कट्यार काळजात घुसली, मोकळा श्वास, फत्तेशिकस्त, नटसम्राट आदी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली. तर गौतमीने अभिनयाच्या ध्यासाने तिचा इंजिनीअरिंगचा जॉब सोडला आणि मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली.

या दोघी बहिणी अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असल्या तरी त्या उत्तम गायिका आहेत. दोघींचाही आवाज खूपच सुरेल आहे. त्यांच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.

या दोघींचा नुकताच ‘ही वाट दूर जाते…’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून हा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने शीर्षक दिले, ” ही वाट दूर जाते…! दोघींनीही एकत्र गाणे ही एक मजा आहे. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही सोबत हे छान गाणे गायले आहे. हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.”

 

 

गौतमी आणि मृण्मयी या बहिणींनी एकमेकींना सुरेल साथ देत हे गाणे गायिले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर फॅन्स आणि प्रेक्षकांनी भरभरून कमेंट्स आणि लाइक्स देत पसंतीची पोचपावती दिली आहे. हा व्हिडिओ अतिशय कमी कालावधीत जबरदस्त व्ह्युज मिळाले आहेत.

अनेकदा या दोघींच्या सिंगल सिंगल गाण्याची सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत असतात.

मृण्मयीने दिग्दर्शित केलेल्या ‘मन फकिरा’ या सिनेमात गौतमीने पार्श्वगायन देखील केले आहे. मृण्मयी आणि गौतमी या अभिनय आणि गाण्यासोबतच नृत्यात देखील पारंगत आहे. त्यांचे नृत्याचे व्हिडिओ देखील अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

 

 

या दोघींमध्ये दिसण्याच्या बाबतीत प्रचंड साम्य आहे. अनेकदा प्रेक्षकांचा देखील गोंधळ उडतो. गौतमी आणि मृण्मयी या बहिणींचे बॉण्डिंग देखील खूप छान आहे. अनेकदा त्यांच्या नात्यांची आणि प्रेमाची प्रचिती आपल्याला मुलाखती, कार्यक्रम, सोशल मीडियावरील पोस्ट यांवरून येतच असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version