उत्तम आरोग्य आणि सौंदर्यही! त्यासाठी गुलकंदाचे हे ८ फायदे जाणून घ्यायलाच हवेत…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. शरीर थंड ठेवण्यासाठी दिवसातून दोनवेळा किंवा कधी कधी तर तीनवेळा सुद्धा अंघोळ करायचा पर्याय स्वीकारला जातो.
माठातलं आणि फ्रिजचं पाणी घराघरांत दिसू लागतं. कलिंगड, खरबूज, काकडी असे पाणीदार आणि थंड पदार्थ खाण्यात दिसू लागतात. एरवी फक्त फालुद्यात पडणारा सब्जाचे नुसत्या पाण्यात उद्या घेऊ लागतो.
थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद!
गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.
अनेकजण चवीने गुलकंद खातात. मसाला पण खाणाऱ्या खवय्यांना तर गुलकंदाची चव वेगळी सांगायची गरज नाहीच. ‘मसाला पान’ या पदार्थाला गोडवा आणणारा मुख्य पदार्थ म्हणजे गुलकंद.
तोंडाला चव आणणाऱ्या या पदार्थाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? बघा बरं या गुलकंदाचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत ते…
१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय
शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते.
याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते
गुलकंदाचे नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन केल्यास डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता सुद्धा कमी होते.
लहान मुलांना रोज १ चमचा गुलकंद देणं हे त्यांच्या आरोग्यासाठी निश्चितपणे फायदेशीर आहे.
२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी
हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
–
हे ही वाचा – या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!
–
पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.
गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्ल्पित्ताचे नियंत्रण करते असा उल्लेख आयुर्वेदातही केला आढळतो.
३. उत्तम अँटीऑक्सिडंट
गुलकंद हा अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे. म्हणूनच गुलकंद खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शरीराला थंडावा मिळाल्यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होऊन पिंपल्स, अॅकने यांचा त्रास कमी होतो.
याशिवाय उत्तम अँटीऑक्सिडंट असलेलं गुलकंद, शरीर डिटॉक्स करण्याचं काम सुद्धा करतं.
४. अल्सरवर गुणकारी
शरीरातील अति उष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास सुद्धा अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या असल्सवर सुद्धा गुणकारी ठरतो.
५. मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते
मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरीला तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.
–
हे ही वाचा – रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
–
म्हणजेच मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना होणारा त्रास प्रमाणात कमी करण्याची क्षमता गुलकंदात आहे.
६. जळजळ कमी होणे
अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!
याशिवाय संधिवाताचा त्रास कमी करण्याची क्षमता सुद्धा गुलकंदात आहे.
७. शांत झोप लागण्यासाठी
चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे.
मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.
८. ऊर्जावर्धक
गुलकंदात असलेली साखर उत्तम ऊर्जेचा स्रोत ठरते. त्यामुळेच गुलकंद शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो. आयुर्वेदात असं म्हटलं गेलंय, की गुलाब पाकळ्यांच्या सेवनाने काम्मोतेजना मिळते. म्हणजेच गुलकंदाचे सेवन हे शारीरिक संबंध ठेवतानाही उपयोगी आहे.
===
हे ही वाचा – काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.