चंद्रावर जाण्यासाठी बुकींग सुरू! केवळ आठच जागा शिल्लक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तान्ह्या मुलांपासून ते प्रेयसी, पत्नीपर्यंत सर्वांनाच चंद्राचे सगळ्यांनाच आकर्षण असते. लहानग्यांचा मामा, प्रियसी आणि पत्नीसाठी त्यांचा सखा असणाऱ्या ह्या शशीला जवळून पाहण्याचा, त्याला अनुभवण्याचा मोह कोणाला नसेल?
आपल्यापासून कोटी किलोमीटर लांब असणारा हा चंद्र आणि त्याचा प्रकाश प्रियकर आणि प्रियसीसाठी किंवा पती, पत्नीसाठी प्रेम आणि प्रेम व्यक्त करणारा एक सुंदर मार्ग आहे.
आयुष्यात एकदा तरी आपण या चंद्राला जवळून पहावे, त्याच्यावर उभे राहावे, चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते ते बघावे, असा विचार एकदा तरी मनाला शिवून जातो. मात्र हे वाटते तितके सोपे नाहीये ना!
मात्र तुमच्या सर्वांसाठी आता एक अशी संधी उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे तुम्ही चंद्रावर जाऊ शकता आणि तेही अगदी मोफत.
विश्वास बसत नाहीये ना? अहो आम्ही खरंच सांगतोय. तुम्ही तुमचे हे वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरवू शकता.
अमेरिकन कंपनी असणाऱ्या ‘स्पेस एक्स’ २०२३ साली त्यांच्या पहिल्या चंद्र मोहिमेमध्ये सामान्य व्यक्तीला पाठवायचे ठरवले आहे.
–
हे ही वाचा – चंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस सांगतोय, या बिझिनेसच्या खास गोष्टी!
–
या मोहिमेसाठी जपानमधील अब्जाधीश आणि ऑनलाइन फॅशन क्षेत्रातील मोठे नाव असणारे युसाकू मेजवा यांची निवड करण्यात आली आहे. या मिशनचे नाव आहे, डिअर मून.
२०२३ मध्ये ही मोहीम होणार आहे. आता तुम्ही म्हणाल यात आमच्यासाठी काय आहे? थांबा थांबा पूर्ण बातमी तर वाचा.
चंद्रावर जाणाऱ्या या पहिल्या अंतराळ प्रवासीसोबत आठ सामान्य जणांना जाण्याची संधी मिळणार आहे. याची घोषणा स्वतः युसाकू मेजवा यांनीच केली आहे.
मेजवा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून एक व्हिडिओ शेयर केला असून, यात त्यांनी सांगितले आहे की, ” मी पृथ्वीवरील काही लोकांना अंतराळाच्या सफर घडवून आणू इच्छितो. या यात्रेचा संपूर्ण खर्च मी उचलणार आहे. मी सर्व तिकिटांची खरेदी केली असून, ही एक खासगी यात्रा असेल.”
सोबतच त्यांनी एक फॉर्म सुद्धा शेयर केला आहे. या सफारीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी तो फॉर्म भरायचा असून, मेजवा यांच्या दोन अटी देखील पूर्ण करायच्या आहेत.
त्यांच्या दोन अटींपैकी पहिली अट म्हणजे, माझ्यासोबत येण्यासाठी इच्छुक असणारी व्यक्ती जे काही काम करत असेल, ते काम अशा पद्धतीने पुढे न्यावे जेणेकरून समजला त्याचा फायदा होईल. दुसरी अट, त्यांच्याप्रमाणे समाजातील होतकरु तरुणांना मदत करणा-यांना प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
–
हे ही वाचा – नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे!
–
आधी मेजवा फक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना1 या मोहिमेसाठी नेणार होते, मात्र आता त्यांनी ही संधी सर्वांसाठी खुली केली आहे.
तर मग तुम्ही मेजवा यांच्या या दोन अटींमध्ये बसत असला तर नक्कीच चंद्राला भेटण्याची, जवळून बघण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.