' १००० रुपये कप… ३ लाख रुपये किलो… एवढं काय विशेष आहे या चहात? – InMarathi

१००० रुपये कप… ३ लाख रुपये किलो… एवढं काय विशेष आहे या चहात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चहा म्हटलं आणि भारतीयांचे कान टवकारले नाहीत असं सहसा कधी होत नाही. भारतात चहाची वेळ नसते. कधीही, कुठेही आणि अगदी मनसोक्त चहा पिण्यात आपण भारतीय मंडळी एक्स्पर्ट आहोत. पक्की चहाबाज मंडळी अगदी गल्लीगल्लीत पाहायला मिळतील.

छोट्या काचेच्या ग्लासात मिळणाऱ्या कटिंगपासून ते आई किंवा बायकोच्या मागे भुणभुण लावून, चांगला मोठा कप भरून चहा घेणारे लोक तुमच्या सगळ्यांचाच ओळखीत असतील.

चहा पिणं ही भारतातील अनेकांसाठी काळाची गरज, काहींसाठी व्यसन, काही जणांसाठी नुसताच टाईमपास, तर काहींसाठी दिलसे जपलेली हौस असते.

 

tea

 

थोडक्यात काय, तर ‘भाई एक कटिंग देना’ असं टपरीवरच्या पोऱ्याला म्हणणारा अतिसामान्य कामगार, वेटरकडे ‘एक चहा दे रे’ अशी ऑर्डर एखाद्या छोटेखानी हॉटेलात सोडणारा मध्यमवर्गीय नोकरदार आणि ‘वन कप ऑफ टी प्लिज’ असं फाईव्ह स्टार हॉटेलात म्हणणारा रईस अशी सगळीच मंडळी आपल्याला भारतात पाहायला मिळतात.

चहाच्या बाबतीत ‘हौसेला मोल नाही’ ही म्हण भारतीयांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरते, ती म्हणूनच!

म्हणूनच मग, अमृततुल्य चहा, तंदूर चहा, लेमन टी, आईस टी असे चहाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा भारतात प्रसिद्ध झालेले आहेत. कुणाला कसा चहा पिण्याची हौस येईल, काय सांगावं…

 

cutting tea cups inmarathi

 

असाच एक चहा आहे, अगदी ‘हौसेला मोल नाही’ या वक्तव्यात चपखल बसणारा. ज्याची किंमत आहे, तब्बल १००० रुपये! तीसुद्धा एका कपासाठी बरं का मंडळी…

कुठे मिळतो हा चहा आणि हा नेमका एवढा महाग का आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका महागड्या चहाविषयी…

हे ही वाचा – चहाचे इतके प्रकार… तुमच्या कट्टर चहाप्रेमी मित्रांनाही माहित नसतील!

कोलकात्त्यामधील मुकुंदपूर इथे एक लहानसं चहाचं दुकान आहे. होय, एका कपाकरिता हजार रुपये मोजावे लागतात असा हा चहा कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधला नसून, एका साध्यासुध्या टपरीवरचा चहा आहे.

पार्थ प्रतिम गांगुली याने २०१४ साली हे दुकान सुरु केलं. त्याच्या या लहानशा दुकानात जवळपास १०० वेगवेगळ्या प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. सिल्वर नीडल व्हाईट टी, तिस्ता व्हॅली टी, ब्लु टिसेन टी, जिंजर तुलसी टी, हिबिस्कस टी, लव्हेंडर टी, वाईन टी, असे एक ना अनेक चहाचे प्रकार बघतानाच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

 

ginger tulsi tea inmarathi

 

पार्थ २०१४ पर्यंत एका कंपनीत काम करत होता. सारं काही नाकासमोर सुरु असताना, अचानक त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा झाली. त्यातूनच त्याला चहाच्या या दुकानाची कल्पना सुचली आणि त्याने व्यवसाय सुरु केला.

विविध प्रकारचा चहा मिळत असल्याने, हे दुकान अल्पावधीतच लोकांच्या परिचयाचं झालं. ‘निर्जस’ हा चहाचा स्टॉल आता पश्चिम बंगालच्या राजधानीत अत्यंत लोकप्रिय झालेला आहे.

टपरीवरील चहासाठी साधारणपणे १०-२० रुपये देणारी भारतीय मंडळी, या टपरीवर मात्र १२ रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतच्या किमतीचा चहा अगदी आनंदाने विकत घेतात.

 

nirjas parth pratim ganguly inmarathi

 

चहाची किंमत एवढी का?

१००० रुपये प्रति कप या किंमतीला विकला जाणारा हा चहा Bo-Lei चहा नावाने ओळखला जातो. हा चहा चीनमध्ये बनत असल्याचं म्हटलं जातं. या चहाची किंमत ३ लाख रुपये प्रति किलो इतकी आहे.

आपला नेहमीचा चहा आणि ग्रीन टी बनवण्यासाठी वापरलं जाणारं, Camellia Sinensis हे रोप हा चहा तयार करण्यासाठी सुद्धा वापरण्यात येतं.

 

green tea inmarathi

 

एका विशिष्ट पद्धतीने फर्मेंट आणि ऑक्सिडाइझ करून हा चहा तयार केला जातो. त्यामुळे या चहाला एक निराळी चव येते.

याशिवाय या पद्धतीने तयार करण्यात आलेला हा चहा, अधिक काळ टिकणारा सुद्धा आहे. त्यामुळेच किलोभर चहाला लाखभर रुपये अशी मोठी किंमत पाहायला मिळते.

या अप्रतिम चहाची चव चाखण्यासाठी एकदा तरी कलकत्त्याला जायला हवं, नाही का मंडळी?

===

हे ही वाचा – मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?