Site icon InMarathi

कलाकारांवर आयकर विभागाची वक्रदृष्टी, ‘हे’ बडे कलाकार आयकरच्या जाळ्यात

anurag

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या हिंदी सिनेसृष्टीचे ग्रह काही चांगले दिसत नाहीये. मागच्या वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकार NCB च्या कचाट्यात अडकले, त्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आता कलाकारांवर आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे.

 

 

आयकर विभागाचे नाव जरी काढले तरी भल्याभल्याना घाम फुटतो. आता या आयकर विभागाच्या कचाट्यात बॉलिवूडमधील काही कलाकार आणि दिग्दर्शक अडकले आहेत.

आयकर विभागाच्या पथकांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता मधु मंटेना यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले आहेत.

अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि मधु मंटेना या तिघांसोबतच ‘क्वीन’ सिनेमाचा दिग्दर्शक असणाऱ्या विकास बहल यांच्या घरीही आयकरने छापे टाकले आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार टॅक्स चोरीच्या आरोपाखाली ही छापेमारी झाल्याचे समजत आहे. ही छापेमारी मुंबईसोबतच पुण्यात २० पेक्षा अधिक ठिकाणी सुरु आहेत.

ही छापेमारी ‘फँटम फिल्म’ संबंधित असणाऱ्या सर्व लोकांवर ही कारवाई झाली आहे. अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मेंटेना यांनी मिळून २०१० साली फिल्म प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशनसाठी ‘फँटम फिल्म’ची स्थापना केली.

या कंपनीचा मालक अनुराग कश्यप आहे. २०१५ साली रिलायन्स एंटरटनमेंटने ५० टक्के शेयर खरेदी केले होते, मात्र २०१८ साली विकासला लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर या कंपनीमधून बाहेर काढण्यात आले.

 

 

तापसी आणि अनुरागने ‘सांड की आंख’ आणि ‘मनमर्जियां’ यांसारख्या यशस्वी सिनेमात एकत्र काम केले असून, लवकरच ते ‘दोबारा’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे.

‘फँटम फिल्म्स’ने २०१३ साली त्यांचा पहिला ‘लुटेरा’ हा सिनेमा तयार केला, ज्यात सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

त्यानंतर त्यांनी ‘हंसी तो फंसी’ आणि सुपरहिट ठरलेल्या ‘क्वीन’ सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी थ्रिलर चित्रपट ‘अग्ली’ आणि ‘एन एच १०’, ‘हंटर’,’बॉम्बे वेलवेट’, ‘मसान’ आदी सिनेमांची निर्मिती केली आहे.

 

 

या छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले? अजून कोणकोणते कलाकार या कचाट्यात सापडणार? त्यांच्यावर कारवाई होणार का? ते पुढील काही काळात स्पष्ट होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version