' फिल्म की वेबसिरीज: वादांच्या फैरींना कंटाळून ‘महाभारत’ संदर्भात आमीरचा मोठा निर्णय – InMarathi

फिल्म की वेबसिरीज: वादांच्या फैरींना कंटाळून ‘महाभारत’ संदर्भात आमीरचा मोठा निर्णय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो. आमिर त्याच्या चित्रपटातील छोट्यातल्या छोट्या पात्रापासून मोठ्या भूमिकेपर्यँत सर्वांचा पूर्ण अभ्यास करतो त्यासाठी कितीही वेळ लागला तरी तो त्याचे काम त्याला पाहिजे तसेच करतो.

 

amir-inmarathi

 

याचा फायदा त्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावर नक्कीच जाणवतो. याचसाठी त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असे संबोधले जाते.

मागच्या काही वर्षांपूर्वी आमिर खान हिंदूंचे महाकाव्य असणाऱ्या ‘महाभारता’वर सिनेमा करणार असल्याचे बोलले जात होते. यासंबंधी अनेक बातम्या माध्यमांमध्ये देखील येत होत्या. मात्र आता अचानक आमिरने या प्रोजेक्टला होल्डवर ठेवले असल्याचे म्हटले जात आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, आमिरने जवळपास २ वर्ष या प्रोजेक्ट्वर रिसर्च केला. आता अचानक होल्ड केल्याच्या बातम्या आल्याने सर्वानाच धक्का बसला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा सिनेमा सध्या तरी होणार नाही म्हटल्यावर अनेकांनी आर्थिक गणितं जमत नसल्याचे सांगितले, मात्र असे कोणतेच कारण नसून, सूत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा न बनण्याच्या मागे किंवा होल्डवर जाण्याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे, यासाठी लागणार वेळ.

 

mahabharat inmarathi 2

 

हो या सिनेमासाठी आमिरला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

अनेक बाजुंनी विचार केल्यावर आमीरने ठरवले की, एकाच प्रोजेक्टवर एवढा वेळ लागला तर अनेक चांगल्या कथा, सिनेमे हातातून घालवावे लागतील. शिवाय हा प्रोजेक्ट करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.

कारण ३ तासाच्या सिनेमात संपूर्ण महाभारत दाखवणे निव्वळ अशक्य असल्याने त्याने यावर वेबसिरीज काढण्याचे ठरवले होते, मात्र आता वेबसिरीजलाही तो पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नसल्याने त्याने हा प्रोजेक्ट पुढच्या काही काळासाठी होल्डवर ठेवण्याचे ठरवले आहे.

आमिरला वाटते की, या वेबसिरीजसाठी आता योग्य वेळ नाहीये. हा प्रोजेक्ट अनेक वादांना देखील तोंडू फोडू शकतो.

आताची परिस्थिती बघता आमिरला कोणताही वाद नको आहे. त्याला वेबसिरीज आणि वाद हे समीकरण तोडायचे असल्याने त्याने सध्या तरी ‘महाभारता’वरचे काम थांबवले आहे.

 

amir khan inmarathi

 

त्याला अशा चित्रपटाचा भाग व्हायचे आहे, ज्याचे दिग्दर्शन एखादा विश्वासार्ह हुशार दिग्दर्शक करेल.

आमिर खान त्याचा आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमामध्ये व्यस्त आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा सिनेमा १९९४ साली आलेल्या सुपरहिट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.

यात आमिर सोबतच करीना कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे.

 

lalsing chadda inmarathi

 

२०१८ मध्ये आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटानंतर तो ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?