Site icon InMarathi

दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!

mushroom king inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण दशकभरापुर्वीपर्यंत मशरूम हा प्रकार भारतात फारसा खाल्ला जात नसे. विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित असलेला हा प्रकार आता भारतातल्या जवळपास प्रत्येक प्रांतात आणि शहर, गावात खाल्ला जातो.

हॉटेल्समधल्या पंजाबी भाज्यांत तर अविभाज्य बनलेला हा पदार्थ आहे. सुप्सपासून भाज्यांपर्यंत सर्वत्र मशरूमचा वापर वाढल्यानं त्याचं उत्पादनही अलिकडे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे.

 

 

मशरुमची शेती ही पारंपारिक शेतीहून वेगळा प्रकार आहे. कमी जागेत भरपूर उत्पादन करता येऊ शकणारा हा प्रकार आहे.

असं असलं तरी अजूनही म्हणावे तितक्या संख्येने शेतकरी याकडे वळलेले नाहीत. याला अपवाद पंजाबमधील संजीव सिंह यांचा.

पंजाबमधील संजीव सिंह यांनी १९९२ मधे मशरूमची शेती सुरू केली. त्या काळात त्या प्रदेशात मशरूमची शेती करणारे ते एकमेव शेतकरी होते. जो पहिल्यांदा एखादा प्रयत्न करतो त्याला अडचणीही बर्‍याच येतात.

===

हे ही वाचा शेतीसाठी गुंतवले १० हजार, आता कमाई महिन्याला लाख रुपये, वाचा, तुम्हीही करा…

===

सगळंच नवीन असल्यानं मागच्यांचा अनुभव गाठीशी नसतो. आपल्या स्वत:च्या चुकांतून सुधारणा करत, नवनविन प्रयोग करत गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.

संजीव सिंह यांचा मशरूम शेतीचा प्रयोगही असाच धडपडत सुरू झाला. हळूहळू हे तंत्र शिकत जात त्यात सफाई येत गेली आणि आज संजीव सिंह यांची मशरूम शेतीतली उलाढाल दीड करोडची आहे.

 

 

संजीव यांना मशरूम शेतीची कल्पना कशी सूचली? याचाही रंजक किस्सा आहे. ज्यावेळेस ते पंचवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिल्यांदा मशरूम शेतीविषयी समजलं. असं काहीतरी अस्तित्वात आहे हे कळलं.

आपल्याकडे जसा सह्याद्रीवर माझं घर माझी शेती कार्यक्रम असतो तसाच पंजाबमधे मेरा पिंड मेरा किसान हा कृषिविषयक कार्यक्रम प्रसारीत होतो. या कार्यक्रमात त्यांना मशरूम शेतीविषयी पहिल्यांदा माहिती मिळाली.

हा कार्यक्रम बघून संजीव यांनाही आपण मशरूमची शेती करावी असं वाटू लागलं. त्यादृष्टिनं त्यांनी प्रयत्न म्हणून सर्वात आधी पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला.

इथे त्यांना घरातल्या घरातही मशरूम कसे पिकवले जाऊ शकतात याचं प्रशिक्षण देण्यात आलं. अगदी प्लॅस्टिकच्या बॅगमधेही मशरूम पिकवले जाऊ शकतात हे त्यांना इथे आल्यावर समजलं.

 

 

मशरूमसाठी फक्त शेतजमिनीचीच आवश्यकता असते या ग्रहाला धक्का बसला. हे सगळंच त्यावेळेस म्हणजे नव्वदच्या दशकात खूप नवीन होतं. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही त्या परिसरात मशरुमच्या वाटेला गेलं नव्हतं.

नव्हे, कोणाला याविषयी काही माहितीच नव्हती. दुसर्‍या बाजूला मशरूमची मागणी जोर धरत होती आणि ते पिकवणारे शेतकरी अगदी मर्यादित होते.

त्यांच्या सगळ्यात आधी काय लक्षात आलं असेल, तर मशरूमच्या शेतीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यासाठी खूप मोठ्या जमिनिची किंवा जागेची गरज नसते. अगदी कमी जागेतही खूप जास्त उत्पन्न घेता येऊ शकतं.

त्यांनी व्यवसायाला सुरवात केली तेव्हा मशरुमच्या बिया स्थानिक बाजारपेठेत आजच्यासारख्या सहजी उपलब्ध नव्हत्या. त्यासाठी थेट दिल्ली गाठावी लागत असे, त्या काळात मशरुम हे केवळ ऑरगॅनिक पद्धतीनेच पिकवले जात असत.

===

हे ही वाचाछंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा

===

२००१ सालापासून त्यांनी मशरूम जास्त तांत्रिक पद्धतीने पिकवायला सुरवात केली. यासाठी त्यांनी एक खास खोली बांधली आणि सहा थरांची रचना करत त्यात शास्त्रशुध्द रितीनं तापमान, माती, खत वगैरे रचत मशरूम लावले. हा प्रयोग खूपच यशस्वी झाला आणि केवळ सात वर्षात त्यांनी १५ ऊ चौ. फ़ू. जागेत स्वतंत्र प्रयोगशाळा उभी केली.

स्वत:च मशरूम पिकवून त्याची विक्रिही तुफान नफ्यासहीत त्यांनी करायला सुरवात केली कारण यांनी पिकवलेले मशरूम अव्वल दर्जाचे होते याची त्यांना खात्री होती.

 

 

हे मशरूम पंजाबच्या सीमा पार करत हिमाचल, जम्मू आणि हरियाणामधेही विकले जाऊ लागले. आजच्या घडीला दिवसाला संजीव सात क्विंटल इतके मशरूम पिकवतात आणि त्याची विक्रीही करतात.

यावरुनच त्यांच्या अवाक्याचा आणि नफ्याचा अंदाज यावा. वर्षाची उलाढाल दीड कोटीत जाऊन पोहोचली आहे आणि याचं श्रेय अर्थातच संजीव यांच्या दुरदृष्टी आणि कठोर कष्टांना आहे.

या त्यांच्या अखंड मेहनतीचं फळ म्हणजे २०१५ साली त्यांना त्यांच्या या कामाची दखल घेत सरकारनं त्यांना “मशरूम किंग” असा खिताब बहाल केला.

आजच्या घडीला ही उपाधी मिरवणारे ते भारतातले एकमेव शेतकरी आहेत. याचं कारण त्यांचा जनसंपर्क. केवळ उत्पन्न करून ते थांबले नाहीत तर ग्राहकांशी सुसंवाद साधत त्यांचे फिडबॅक लक्षात घेत त्यांनी काम केलं.

कशी होते मशरुमची शेती?

मशरूम लागवडीसाठी फार मोठ्या जमिनीची आवश्यकता नसते. शेतजमिनी हळूहळू निवासी जागात रूपांतरित होत चालल्यानं शेती कमी होऊ लागली आहे आणि लोकांना अन्नधान्याचा पुरवठा संकुचित होण्याची चिंता भेडसावू लागणार आहे.

यावर उपाय म्हणजे, व्हर्टिकल शेती. जी जी पिकं व्हर्टिकल पद्धतीनं करता येणं शक्य आहे ती तशीच पिकवणं ही आता काळाची गरज बनणार आहे. मशरूमही व्हर्टिकल पध्दतीनं कमी जागेत करता येणारी शेती आहे.

 

 

मशरूमसाठी मुळात मातीची गरजच नसते. कंपोस्ट पद्धतीने केलेल्या खतावर हे उत्पन्न घेता येतं. संजीव यांचंच उदाहरण द्यायचं तर केवळ दोन एकर शेतीतून ते आज दीड करोड रुपये कमावतात.

तेच जर पारंपारिक शेती केली, तर हेच उत्पन्न मिळवायला त्यांना २०० एकर जमिनीची गरज लागणार आहे.

मशरूम उगवायला कोणत्याही विशेष ऋतूची गरज नाही. वर्शभर सगळ्या ऋतूत याचं उत्पादन घेता येतं हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे.

===

हे ही वाचा प्रेरणादायी : नैसर्गिक आलं आणि हळद पिकवून हा “तरुण शेतकरी” कमवतोय १.५२ कोटी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version