' जम्मू काश्मीर महत्वाचं का आहे? – InMarathi

जम्मू काश्मीर महत्वाचं का आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण सर्व भारतीय लोक जम्मू-काश्मीर बद्दल फार भावनाशील आहोत.

काश्मीरबद्दल पाकिस्तान सोबत असलेला भारताचा विवाद हा आपल्यासाठी अस्मितेचा प्रश्न बनला आहे. काश्मीरमधील अनेकांना “आझाद काश्मीर” हवंय आणि भारतातील काहींना “काश्मीरमधील लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यायला हवा” असं वाटतं.

परंतु भारतीय सरकारने अनेक कारणांमुळे हा स्वयंनिर्णयाचा घाट घातलेला नाही. ह्या अनेक कारणांपैकी एक आहे – जम्मू काश्मीरचं भौगोलिक महत्व.

अनेकांना हे महत्व माहित नसल्याने काश्मीरवासीयांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देणं योग्य वाटतं.

काय आहे काश्मीरचं महत्व?

पुढील नकाशा बघा :

jammu kashmir 00 marathipizza

स्त्रोत

वरील नकाशा अगदी १००% अचूक नाही – पण जम्मू काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती स्पष्टपणे दाखवतो.

भारताला ३ देशांशी जोडणारा हा भूभाग.

जम्मू जर भारतात नसेल भारताचा अफगाणिस्तानशी असलेला जमिनी संपर्क संपूर्ण तुटतो. ज्याने अनेक व्यापारी परिणाम संभवतात.

पाकिस्तान-चीन संबंधांचा आधार

पाकिस्तान आणि चीनला सरळ जोडणारा काराकोरम हायवे . हा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो.

 

jammu kashmir 01 marathipizza

स्त्रोत

भारताने अनेक वेळा व्यक्त केलेल्या हरकती दुर्लक्षित करून पाकिस्तान आणि चीन ने हा १३०० किमी लांबीचा हायवे पूर्ण केला.

हा हायवे पाक-चीन संबंधांचा कणा आहे. हे संबंध अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानला हा भूभाग स्वतःकडे हवाय, तर  ह्या संबंधातून भारतविरोधी कारस्थानं घडतात म्हणून भारताला हे संबंध तोडायचे आहेत – ज्यासाठी हा भूभाग भारताकडे यायला हवा…!

पाणी…!

अनेकांना माहित नाही पण जम्मू काश्मीरमधील राजकारणामागे तेथील जल समृद्धता हे एक मोठं कारण आहे.

पाण्याच्या आणि काश्मीरच्या महत्वाचं एक उदाहरण म्हणजे १९६५च्या युध्दात आपण इच्चोगील कालव्यातील पाणी सोडून पूर आणून त्यात १०० हून अधिक पाकिस्तानी रणगाडे खेमकरण येथे पाण्यात बुडवून पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडला.

भारत पाकपैकी जो देश ह्या भागावर ताबा ठेवील तो दुसऱ्यावर मोठा दबाव निर्माण करणार ह्यात शंका नाही.

संरक्षण

पाक पुरस्कृत दहशतवाद्यांसाठी डोंगर कपाऱ्या असलेलं खोरं म्हणजे सोईस्कर नंदवनच आहे. पाक आणि चीन – ह्या दोघानाही दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ही जागा मोक्याची आहे.

भारतावर पश्चिमोत्तर भागातून अनेक आघात झाल्याचा इतिहास आहे. जम्मूचं खोरं ह्या आघातांसाठी एक natural shield आहे. ही ढाल जर कोसळली तर उत्तर भारत, राजधानी दिल्ली उघड्यावर पडते आणि संरक्षण सज्ज्तेवरील भार अनेकपट वाढतो.

आझाद काश्मीरला विरोध का बरं?

राजा हरिसिंग – ज्याला काश्मीर  स्वतंत्र  राष्ट्र म्हणून हवं होतं – त्याचे मनसुबे पाकिस्तानने काही तासांच्या आत हवेत उडवले.

स्वतःला defend करू नं शकणारं राज्य जेव्हा कुरापती काढणाऱ्या देशाच्या बाजूला असतं – तेव्हा ते सुरक्षित कधीच असू शकत नाही. पाकिस्तान-चीन युतीसमोर काश्मीर कस्पटासमान आहे हे कठोर सत्य आहे. ज्या क्षणी भारतीय सैन्य तिथून माघार घेईल, त्या क्षणी काश्मीरवर पाकिस्तान हल्ला करणार हे स्पष्ट आहे.

अश्या परिस्थितीत, काश्मीरने भारतातच रहाणं हे केवळ भारतासाठी तर आवश्यक आहेच – पण काश्मीरमधील जनतेसाठीसुद्धा तेच हिताचं आहे.

===

वरील अनेक कारणांमुळे काश्मीर हा सामान्य भारतीयांसाठी भावनेचा प्रश्न असला तरी भारतीय राज्यकर्त्यांसाठी तो मोठा strategic महत्वाचा भाग आहे.

आपण ही कारणं समजून घेऊन आपलं मत बनवावं…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?