Site icon InMarathi

१२ व्या मजल्यावरून पडणाऱ्या चिमुकलीला वाचवणाऱ्या सुपरहिरोचा व्हायरल व्हिडीओ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘देवदूत’ हा शब्द आपल्याकडे खूपदा वापरला जातो. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपल्या सर्वांसाठीच डॉक्टर एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही.

आपल्यावरील संकटाना अचानक येऊन दूर करणारा व्यक्ती आपल्यासाठी देवदूत असतो.

‘रील’ लाईफमध्ये आपण क्रिश, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन असे अनेक सुपरहिरो पाहिले आहेत. पण रियल लाईफमध्ये असे देवदूत सापडणे खूप कठीण असते. मात्र व्हिएतनाममधील असाच एक देवदूत सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

२ वर्षाच्या चिमुरडीला १२ व्या मजल्यावरून पडताना पाहून, तिला वाचवण्यासाठी डिलीव्हरी बॉयने दाखवलेल्या हिंमतीचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

झाले असे की व्हिएतनाममध्ये रविवारी संध्याकाळच्या सुमारास एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील घरात २ वर्षाची मुलगी खेळत असतांना अचानक बाल्कनीच्या सुरक्षेच्या जाळीतून बाहेर आली, या दरम्यान तिचा तोल गेला आणि काहीही कळायच्या आत ती बाहेरील बाजूस जाळीच्या आधाराने लटकली.

तिला पाहून समोरच्या इमारतीतील एका महिलेने आरडाओरड सुरु केली.

त्यावेळी खाली न्गुयेन नागॉस नावाचा एक डिलिव्हरी बॉय त्याचे पार्सल देण्यासाठी उभा होता. तेव्हा त्याला ओरडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकायला आला आणि त्याने वर पाहिले, तर एक लहान मुलगी वेगात खाली येत होती.

 

 

ती पडत असल्याचे पाहून न्गुयेनने त्वरित तिला वाचवण्यासाठी हालचाल सुरु केली. इमारतीच्या खाली असणाऱ्या जनरेटवर चढून त्याने तिला पकडण्यासाठी प्रयत्न केले, आणि सुदैवाने तो तिला वाचवण्यात यशस्वी झाला.

 

 

त्या डिलीव्हरी बॉयने त्या लहान मुलीला झेलले हा प्रसंग काहींनी प्रत्यक्ष पाहिला. त्या मुलीला जेंव्हा झेलण्यात आले तेंव्हा तिच्या तोंडातून रक्त येत होते.

त्यानंतर त्यानेच तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून ती मुलगी आता सुरक्षित आहे.

 

 

या डिलिव्हरी बॉयचे फक्त व्हिएतनाममध्ये नाही तर संपूर्ण जगात खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा – चेन स्नॅचिंग असो वा ट्रेन रोमियो, या देवदुताशिवाय स्त्रियांना लोकलप्रवास सुरक्षित झालाच नसता!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version