Site icon InMarathi

यशाचा महामंत्र – प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाकडे असायलाच हव्या या १३ गोष्टी!

ritesh 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अंथरूण बघून पाय पसरावेत’ अशी म्हण भारतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरात सांगितली जाते. श्रीमंती आणि गरिबी यांच्यात कायमच मध्यमवर्ग दडपला जातो. महिन्याला मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे, त्यात मुलांचे शिक्षणाचे खर्च यात कुटुंब प्रमुखाची नेहमीच तारांबळ उडताना दिसून येते.

प्रत्येक मध्यमवर्गातील जन्म घेणाऱ्या मुलांची, मुलींची स्वप्न असतात त्यांना चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी करायची इच्छा असते मात्र घरातून पुरेसे पाठबळ मिळत नाही किंवा आपण मध्यवर्गीय आहोत आपल्याला हे जमायचे नाही अशी ओरड प्रत्येक घरातून ऐकू येते.

 

 

आजचा तरुण वर्ग हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय घरातूनच आहे ज्याच्या समाजाकडून किंवा देशाकडून काही अपेक्षा असतात, जस की चांगले  शिक्षण, उत्तम नोकरी राहण्यासाठी जागा. तसेच सहजीवनासाठी एक उत्तम जोडीदार. या सर्व गोष्टी जशा अपेक्षा तो ठेवतो त्याचप्रमाणे त्याने देशासाठी देखील काही केले पाहिजे, कारण आजचा तरुणच उद्याच्या देशाचं भवितव्य आहे.

काही जणांना मध्यमवर्गात जन्म झाल्याचा पश्चाताप होतो  तर तस ना करता, खालील गोष्टी तुम्ही अंगी बाळगल्यात तरी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

१.आर्थिक नियोजन :

सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो आर्थिक नियोजनाचा. आज पैसे आहेत तर लोक तुम्हाला विचारतील, त्यामुळे तुम्ही तरुण असेपर्यंत भरपूर कमवा व आतापासूनच पैशांचे योग्य नियोजन करा.

पुढे भविष्यसाठी ते फायदायचे ठरेल. गरज पडल्यास आर्थिक सल्ल्गाराची  मदत घ्या.

 

 

२. शरीराकडे लक्ष द्या :

पैसे कमवायचे आहेत तर नुसते हुशार असून चालत नाही तर शरीराचीदेखील उत्तम साथ लागते. वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात त्यानुसार आपण योग्य आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे.

जेणेकरून तुम्ही फिट राहिला व कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार नाही. या वयात अनेकजण व्यसनांकडे सुद्धा वळतात तर तसे करू नका. व्यसनांपासून दूर राहा.

 

हे ही वाचा – इंजिनियर्स काहीही करू शकतात, वाचा या तरुणाचा भन्नाट प्रयोग!

३. शिस्तबद्ध दिनचर्या :

आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याची एक दिशा ठरवा. वेळचे नियोजन करा. आपला वेळ कुठे फुकट जातो आहे तपासा. दिनचर्या एकदा सेट केलीत तर शक्यतो मोडू नका.

सकाळी लवकर उठा,व्यायाम करा आजकाल wfh मुळे अनेकजण घरून काम करत आहेत तरी सुद्धा वेळेचे नियोजन खाण्यापिण्याचे वेळापत्रक तयार करा.

 

 

४. वाचन :

आजची तरुणपिढी वाचत नाही अशी ओरड होताना दिसून येते त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष करू नये. आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुस्तक उपलब्ध आहेत. जी तुम्ही कुठे ही  वाचून शकता.

रोजचे वर्तमानपत्र वाचा, अवांतर वाचन वाढावा जेणेकरून तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडेल जगात काय चाललंय याचा अंदाज येईल.

 

 

५. संभाषण कौशल्य :

आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही काय काम करणार यापेक्षा तुम्ही काय बोलता, कसे प्रेझेंट करता हे बघितले जाते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व हवेच.

त्याबरोबरीने संभाषण कौशल्य वाढावा अनेक लोंकाना भेट, त्यांच्याशी बोला, आपला आत्मविश्वास वाढावा. संभाषण कौशल्य कसे वाढवता येईल याचे नेट वर अनेक विडिओ आहेत ते पहा.

 

 

६. अपयशाला सामोरे जा :

आज करोनासारख्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकजण मानसिकरीत्या खचले आहेत, अशा परिस्थती मध्ये खचून न जात पुन्हा उभारी घ्या.

एखादा व्यवसाय सुरु करा, वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घ्या. नकारात्मक विचारानं पासून दूर राहा.

आज अपयश आले तरी पुढे यश मिळणार आहे जे लक्षात ठेवा.

 

 

७. निर्णय घेताना विचार करा :

आज अनेकजण आपल्या करियरची गाडी मधेच बदलून दुसरीकडे वळताना दिसून येतात. सर्वच जण यशस्वी होतात असे नाही त्यामुळे करियर बदलताना सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्या.

 

 

८. घरच्यांचा आदर करा :

आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत आहात याचे श्रेय घरच्यांना द्या कारण ते पाठीशी होते म्हणूनच तुम्ही यशस्वी झालात.

तुम्ही त्यांचा आदर करा. त्यांना मदत करा घरापासून लांब राहत असलात तरी जाणीवपुर्वक मधून मधून त्यांची चौकशी करत राहा, संपर्क साधा. त्यांच्या आवडीनिवडी जपा.

 

हे ही वाचा – वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

९. लग्न  :

आज मध्यमवर्गात मुलाला नोकरी लागली की त्याच्या घरचे लग्नसाठी मागे लागतात त्यामुळे तुम्ही लग्नासाठी तयार आहात की नाही हे ठरवा.

तसे आपल्या घरच्यांना समजावून सांगा. जिच्याशी लग्न करणार आहात तिच्याशी मोकळपणाने बोला.

 

 

१०. कुटुंब नियोजन :

एकदा लग्न झाले की आपोआप जबाबदारी पडत जाते, त्यामुळे कुटुंब नियोजनकडे लक्ष द्या.

होणाऱ्या अपत्याची  देखभाल, त्याचे पुढचे आयुष्य त्यासाठीचा खर्च या सर्वबाबी लक्षात घ्या.

 

 

११. सामाजिक कार्यात सहभाग :

आज अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यात सहभाग घ्या, आपुलकीने त्यांच्यासाठी काम करा.

आपण या समाजाचे देणे लागतो हे भान असू द्या. आपल्या शेजारी जर वृद्ध असतील तर त्यांना मदत करा.

 

 

१२. निवडणुकीचा हक्क बजावा :

आज अनेकजण निवडणुकीला मिळणारी सुट्टी घेऊन फिरायला जातात तर तसे न करता आपला हक्क बजावा.

आज मध्यमवर्गीय तरुण मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्यांनी मतदान करणे हे गरजेचे आहे. देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्यामुळे आपला हक्क वाजवायला विसरू नका.

 

 

१३. भविष्याचे प्लँन्स :

आज आपण अमुक अमुक एका वयात आहोत पुढील दहा वर्षात आपण कुठे असू याचा विचार करून त्यामार्गाने प्रयत्न करायला सुरवात करा.

वेगवेगळे छंद जोपासा, जेणेकरून म्हातारपणात कंटाळा येणार नाही. एखादी परकीय भाषा शिका, भाषेची गोडी लागल्यास पुढे त्यातदेखील करियर करू शकता.

 

 

 

आपण मध्यमवर्गात जन्मलो असा न्यूनगंड बाळगू नका. भले तुम्हाला व्यवसाय करायचा नसेल ही ज्यात नोकरी करताय ती प्रामाणिकपणे करा वरील गोष्टी अंगी बाळगा, यश नक्कीच तुमचं आहे.

===

हे ही वाचा – ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एलॉन मस्कचा कानमंत्र तरुणांसाठी फायदेशीर!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version