Site icon InMarathi

या ६ लोकांची कथा सुद्धा नरेंद्र मोदींच्या स्टेडियम सारखीच आहे!

narendra modi stadium inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नुकतंच भारतात एका भव्यदिव्य स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. १ लाख १० हजार प्रेक्षकसंख्या असलेलं हे स्टेडियम खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलं आहे. अवघ्या २ दिवसांत संपलेला कसोटी सामना आणि या स्टेडियमला देण्यात आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव, या दोन बाबी अजूनही चर्चेत आहेत.

एक कसोटी सामना अवघ्या २ दिवसात संपतो काय, आणि त्यावरून गदारोळ माजतो काय. अर्थात, हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘पूर्ण झालेला’ सगळ्यात लहान सामना ठरलेला नाही. तरीही क्रिकेटजगतात या विषयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

परिस्थिती ही अशी असताना भारतीयांनी मात्र, या सामान्यापेक्षा अधिक महत्त्व दिलंय ते स्टेडियमच्या नावाला. त्यावरून पेटलेलं राजकारण, आरोपप्रत्यारोप या गोष्टींना काही अंतच नाही.

 

 

‘नरेंद्र मोदींचं नाव का दिलं गेलं?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून, समर्थकांनी इतर व्यक्तींच्या नावाने उभ्या असणाऱ्या वास्तूंची एक यादीच समोर केली आहे.

थोडक्यात काय, तर क्रिकेटचा सामना लवकर संपला असला, तरी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर, अगदी गल्लीगल्लीत चर्चांचा सामना मात्र तुफान रंगतोय.

अगदी सुरुवातीच्या काळात गुजरात क्रिकेट स्टेडियम या नावाने प्रसिद्ध असलेल्या वास्तूचं पहिलं बारसं झालं, ते १९६२ साली. त्यावेळी या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव देण्यात आलं.

साबरमती नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या मोटेरा इथे उभं असलेलं स्टेडियम कालांतराने पुन्हा नव्याने बांधण्यात आलं आणि आज उभ्या असलेल्या भव्य वास्तूचा जन्म झाला. या नव्या वास्तूचं पुन्हा एकदा नामकरण केलं गेलं आणि आज या नव्या रूपात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव मोटेरामधील स्टेडियमला मिळालं.

 

 

मोदी यांच्या हयातीत या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं असलं, तरी ही काही अशी पहिली व्यक्ती नाही ज्यांचं नाव त्यांच्या हयातीतच एखाद्या ग्राउंड किंवा स्टेडियमला देण्यात आलं आहे.

आज अशाच काही स्टेडियम्सबद्दल  जाणून घेऊयात, ज्यांची नावं अशा व्यक्तींच्या नावांवरून दिली गेली आहेत, ज्या नामकरणाच्या वेळी हयात होत्या.

१. इडन गार्डन, कलकत्ता

१८६४ साली कलकत्त्यामध्ये बाबू राजचंद्र दास राहत असत. ते तिथे जमीनदार होते. त्यांच्या मुलीची प्रकृती खालावली आणि त्या जरावरील इलाज परदेशात होणं आवश्यक होतं.

बाबू दास यांनी तत्कालीन व्हॉईसरॉय ऑकलंड इडन यांना त्यांचा एका बगीचा देऊ केला. त्याबदल्यात दास यांच्या मुलावप उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर, इडन यांनी बगिच्याच्या जागेवर खेळाचे मैदान उभारले. या मैदानाला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. याच कारणामुळे, आज या स्टेडियमला इडन गार्डन या नावाने ओळखलं जातं.

 

 

हे ही वाचा – बोट मोडलं होतं, तरी जिद्दीला तोड नव्हती! स्मिथ योद्धयासारखा लढला, पण…

२. एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

सध्या चेपॉक या नावाने प्रसिद्ध असलेलं हे तामिळनाडूमधील स्टेडियम सुद्धा चिदंबरम यांच्या हयातीत त्यांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं होतं.

एम. ए. चिदंबरम हे मोठे उद्योगपती होते. १९५६ साली त्यांनी BCCI, अर्थात भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. १९६०-६१ आणि १९६२-६३ या काळात ते BCCI चे अध्यक्ष सुद्धा होते.

पूर्वी मद्रास क्रिकेट ग्राउंड म्हणून ओळखलं जाणारं हे मैदान १९८० पासून चिदंबरम यांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

 

 

३. ग्रीन पार्क, कानपुर

कानपुमधील या मैदानावर ब्रिटिश अधिकारी ग्रीन यांच्या पत्नी हॉर्स रायडींग करत असत. कालांतराने त्याच जागेवर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्यात आलं. मॅडम ग्रीन यांच्या नावावरून या मैदानाला ग्रीन पार्क असं नाव देण्यात आलं आहे.

 

 

४. एम. चिन्नास्वामी, बंगलोर

एम. चिन्नास्वामी हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव मानलं जातं. १९६० ते १९६५ या काळात त्यांनी BCCI चं सेक्रेटरी पद भूषवलं. त्यानंतर १९७७ ते १९८० या काळात ते BCCI चे अध्यक्ष सुद्धा होते.

एवढंच नाही, तर १९६५ ते १९७३ या काळात ते ICC मध्येही आपला दबदबा राखून होते. भारताचे प्रतिनिधित्व याकाळात त्यांच्याकडेच होते.

 

 

५. ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई

अँथनी डी मेलो हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना, १९३५ साली या स्टेडियमची निर्मिती झाली. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न जमिनीची किंमत कमी करायला तयार नव्हते.

यातून मार्ग काढण्यासाठी अँथनी यांनी एक शक्कल लढवली आणि ब्रेबॉर्न यांचे नाव अजरामर होण्याची शक्यता बोलून दाखवली. हा प्रस्ताव मान्य करून, रास्त भावात जामोइन देण्यात आली.

या जमिनीवर मोठ्या दिमाखात जे स्टेडियम उभं राहिलं, ते आजही ब्रेबॉर्न स्टेडियम या नावानेच प्रसिद्ध आहे.

 

 

६. वानखेडे स्टेडियम, मुंबई

१९७० ते १९८३ अशा मोठ्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष असलेले एस. के. वानखेडे यांचं नाव मुंबईतील या मैदानाला देण्यात आलं आहे.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (BCA) यांच्यातील वादाचा परिपाक म्हणून या स्टेडियमची निर्मिती झाली. १९७४ साली या मैदानाला वानखेडे यांचं नाव देण्यात आलं.

याच मैदानावर २०११ साली भारताने विश्वचषक जिंकला. यजमान असताना विश्वविजेते ठरण्याचा मान क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाला मिळाला.

 

 

याशिवाय विंडीजचे स्फोटक फलंदाज विव रिचर्ड्स, माजी कर्णधार ब्रायन लारा यांच्या नावाने सुद्धा विंडीजमध्ये मैदानं असलेली पाहायला मिळतात.

क्रिकेटविश्वातील डॉन, अर्थातच डॉन ब्रॅडमन यांच्या गावात त्यांच्या नावाने एक मैदान आहे. अर्थात, या मैदानाचा वापर लहान पातळीवरील स्पर्धांसाठीच केला जातो.

===

हे ही वाचा – ही १० क्रिकेट स्टेडियम्स एका वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version