Site icon InMarathi

लिंबाचं लोणचं खाताना हात कधी आखडलाच तर ‘हे’ आठवून पहा!

pickle eating inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय जेवण म्हणजे जिभेची पर्वणी असते. भारतीय संस्कृतीत अन्न हे परब्रम्ह असे म्हटले जाते. त्यामुळे अन्नाला अतिशय महत्व दिले जाते.

भारतात तुम्ही कोणत्याही राज्यात जा, तुम्हाला तेथे एका वेगळ्या पदार्थाची चव चाखायला मिळेल. प्रत्येक राज्य आणि तेथील एखादा प्रसिद्ध पदार्थ हे समीकरण वेगळं असतं.

भात, भाजी, पोळी, चटणी आणि लोणचे, एखादा गोड पदार्थ साधारण असा जेवणाचा बेत असतो. आपण रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी अनेक चटण्या आणि लोणची वापरत असतो.

 

 

या चटणी, लोणच्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. कैरीचं लोणचं, लिंबांचं लोणचं किंवा गाजराचं लोणचं असे प्रकार कोणतेही असो त्याची एक वेगळीच चव असते.

हिवाळा संपत आला आणि उन्हाळ्याची चाहूल लागली की लिंबांचं लोणचं घरोघरी बनविलं जातं. कारण एप्रिल आणि मे महिन्यात लिंबाचे भाव फार वाढतात.

लिंबाची लोणची दोन – तीन प्रकारची बनविली जातात. जसे की गोड, आंबट, गोड लोणचं लिंबू आणि हिरवी मिरची टाकून देखील लोणचं बनविलं जातं.

 

 

हे ही वाचा – लिंबू-पाणी प्यायल्याने खरंच एकदम झकास फिट होता येतं? यामागचं तथ्य जाणून घ्या!

लोणचं कोणतंही असो आपल्या पोटात लिंबू जाते हे अधिक महत्वाचे आहे आणि त्याचे कित्येक फायदेदेखील आहेत.

आजच्या लेखात आपण लिंबाचं लोणचं खाण्याचं फायदे जाणून घेणार आहोत.

लोणचं म्हटलं, की अनेकांना ते आरोग्यासाठी हितकारक वाटत नाहीत. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल, मीठ आणि मसाले वापरले जातात. पण काही लोणची अशीदेखील असतात ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते तसेच त्यामध्ये फार कमी प्रमाणात मीठ आणि तेल वापरलं जातं.

लिंबाच्या लोणच्याचे काही प्रकार तर काही लोणची तर फक्त मीठ आणि हळद वापरुन करतात. त्यामुळे लिंबाचं लोणचं खाण्याचे अनेक फायदे आहेत.

रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते 

शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकांना लो तर काहींना हाय म्हणजेच उच्च रक्तदाब यांचा त्रास होतो. जर शरीरातील रक्तप्रवाह थोडा कमी जास्त झाला तर अनेक समस्या निर्माण होतात.

 

 

शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी रोजच्या जेवणात थोड्यातरी प्रमाणात लिंबाच्या लोणच्याचा समावेश करावा कारण लिंबांमध्ये कॉपर, पोटाशियम, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. जे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त 

अनेकांना हाडांच्या समस्या असतात. शरीरात कॅल्शियम कमी असल्यामुळे हाडे दुखतात. महिलाना सर्वाधिक गुडघे दुखी, कंबरदुखी यांचा त्रास होतो.

 

 

प्रत्येक व्यक्तीचे जसे वय वाढत जाते तसे त्याची हाडे कमकुवत होत जातात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी विटामीन सी आणि विटामीन ड अत्यंत महत्वाचे असते. ही दोन्ही जीवनसत्वे आपल्याला लिंबांतून मिळतात.

लिंबांमध्ये कॉपर, पोटाशियम, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, जे तुमची हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

 

त्यामुळे जर तुम्हाला हाडांचा काही त्रास असेल किंवा तुमची हाडे तितकीशी मजबूत नसतील तर तुम्ही तुमच्या जेवणात लिंबाच्या लोणच्याची एखादी फोड जरूर खावी. त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतील.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त 

आपण कोणत्याही रोगास किंवा इतर काही शारिरीक समस्यांना लवकर का बळी पडतो? यांचे एक कारण म्हणजे आपली प्रतिकार शक्ती. आपली प्रतिकारशक्ती जर कमी असेल तर आपल्याला कोणताही विकार लवकर होतो. याचेच एक उदाहरण म्हणजे सध्या फोफावणारा कोरोना. या रोगामुळे रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात आले आहे.

 

 

आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी लिंबाचे लोणचे अत्यंत उपयुक्त ठरते. लिंबांमध्ये अॅंटीऑक्सीडेन्ट गुणधर्म असतात त्यामुळे लिंबू प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

हे ही वाचा – रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःहून रोगाला आमंत्रण देणे

रक्तवाहिन्यायासंबंधी समस्या दूर करते 

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हदय होय. हदयाचे काम कशाप्रकारे चालते हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे. जसे की हदय हे रक्त शुद्ध करून सर्व शरीरास रक्ताचा पुरवठा करते. त्यामुळे रक्तवाहिन्या देखील उत्तम स्थितीत असाव्यात यासाठी आपण त्यांची काळजी घ्यायला हवी.

अनेकदा आपण जंक फुड खातो जसे की पिझ्झा, पास्ता किंवा पावाचे पदार्थ, अशा वेळेस रक्तवाहिन्या कमकुवत होतात. आपल्या आहारात अशा पदार्थाचा समावेश असावा ज्यामुळे रक्तवाहिन्या उत्तम राहतील आणि त्या त्याचे काम उत्तमरित्या करू शकतील.

 

 

लिंबू हे देखील अतिशय उपयुक्त आहे. लिंबाच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, तसेच फॅट कमी करण्यासाठी देखील लिंबू अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या आहारात लिंबाचा समावेश असावा.

अपचनाच्या समस्या होतात दूर 

अपचन ही एक मोठी समस्या आहे. आपण अनेकदा काही पदार्थ खातो पण ते पदार्थ आपल्या शरीरास तितक्या प्रमाणात पचत नाहीत. त्यामुळे अनेकदा पोटदुखी, पित्त अशा समस्या उद्धभवतात.

 

 

अपचन होण्याची अनेक कारणे आहेत पण ते कमी करण्यासाठी देखील अनेक उपाय आहेत,जसे की तुम्ही तुमच्या जेवणात लिंबाच्या लोणच्याची एक फोड जरी घेतली तरी तुमचे अन्न चांगल्या प्रकारे पचते.

अनेक लोक जेवण झाल्यानंतर लिंबूपाणी देखील पितात. कारण लिंबांमधील अनेक महत्वपूर्ण गुणधर्म पचनासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे जर तुम्ही जेवताना लिंबाचे लोणचे खाल्ले तर अपचनाच्या कोणत्याच समस्या निर्माण होणार नाहीत.

 

 

सध्याच्या काळात अपचन ही समस्या अयोग्य जीवनशैली असल्यामुळे उद्धभवते.

सर्व लोणची ही पचनासाठी उपयुक्त नसतात, कारण लोणच्या मध्ये मोठ्या प्रमाणात तेल आणि इतर मसाले वापरलेले असतात. मात्र त्याचे गुणधर्म लक्षात घेत सेवन केले तर मात्र त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त

जर तुम्ही जेवताना लिंबाची एखादी फोड खाल्लीत तरी देखील त्याचे अनेक फायदे होतील कारण लिंबांमध्ये अनेक महत्वाचे गुणधर्म असतात.

लिंबाच्या रसामुळे पोटातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. कारण लिंबांमध्ये अॅंटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाचे लोणचे शरीरासाठी उत्तम असते.

 

 

शक्यतो लोणचं हा पदार्थ दुपारच्या जेवणातच खावा कारण रात्रीच्या जेवणात साधे आणि पचनास हलके असे पदार्थ खावेत. त्यांमुळे आपण आपल्या आहाराचे योग्य नियोजन करावे.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करणे आजच्या काळात अतिशय अवघड पण तितकेच महत्वपूर्ण झाले आहे. कारण आजकाल सर्वांची जीवनशैली संपूर्णपणे बदलून गेली आहे. आपले जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यामुळे योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेक पदार्थ खाणे टाळले जाते.

 

 

शक्यतो कमी तेलात किंवा तेलाचा वापर न करता बनविलेले पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळेस कमी तेल किंवा तेलाचा वापर न केलेले लिंबाचे लोणचे आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

लिंबू देखील वजन कमी करण्यासाठी फार मदत करते. त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल आणि काही चटक – मटक आणि चवदार खाणार असाल तर लिंबाचे लोणचे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे, त्यामुळे तुम्ही लिंबाचे लोणचे बिनधास्त खा.

 

हे ही वाचा – या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

अर्थात ज्याप्रमाणे कोणत्याही पदार्थाचा अतिरेक हा वाईटचं, त्याप्रमाणे गरजेपक्षा जास्त प्रमाणात लोणचं खाणंही धोक्याचं! तसेच शक्यतो लोणचं घरी तयार केलेलं असावं, म्हणजे त्यातील तेल, मीठ, तिखट यांचे प्रमाण स्वतःच्या सोईनुसार बदलता येते, तसेच त्याचा दर्जाही राखला जातो.

तसेच अनेकांना उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, आम्लपित्त यांसारखे विकार असतात. काहींना आंबट पदार्थांची अॅलर्जी असते अशावेशी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लोणच्याचे सेवन करू नये.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version