' कधीतरी तू माझा होशील ना? या एकाच आशेवर तब्बू चक्क १० वर्ष त्याची वाट बघत होती – InMarathi

कधीतरी तू माझा होशील ना? या एकाच आशेवर तब्बू चक्क १० वर्ष त्याची वाट बघत होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी सिनेमा जिथे प्रेमाच्या असंख्य कहाण्या अनेक लेखकांनी आजपर्यंत रचल्या आहेत. प्रेमाचे अनेक पैलू शेकडो हिंदी चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अगदी कृष्णधवल चित्रपटापासून ते रंगीत सिनेमापर्यंत अनेक लव्ह स्टोरीज प्रेक्षकांनी उचलून धरल्या.

अनेकदा सिनेमातील कलाकार जेव्हा रोमँटिक स्टोरीमध्ये काम करत असतात, त्यांच्यात सुद्धा साहजिकच जवळीक वाढते. ‘सेटवरच भेटणे ते आलिशान हॉटेल मधील डेट’, इथपर्यंत जाऊन पोहचते. जितक्या चित्रपटातील लव्ह स्टोरीस गाजल्या, तितक्याच खऱ्या आयुष्यातील हिरो हिरोइन्सच्या  लव्ह स्टोरीज देखील तितक्याच गाजल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी दिलीपकुमार मधुबाला पासून ते अगदी आताच्या रणबीर आलीय असो, प्रत्येक लव्हस्टोरी मध्ये काही ना काही ट्विस्ट होतेच, काहींच्या स्टोरीस हिट ठरल्या तर काहींच्या फ्लॉप. काहींचे लग्न होऊन संसार अगदी नेटका झाला तर काहींनी लग्न  झाल्यानंतर काही कारणांमूळे वेगळे होण्याचा निर्णय झाला.

अशीच एक अधुरी प्रेम कहाणी आहे ती म्हणजे तब्बू आणि नागार्जुन यांची. दोघे ही दिसायायला देखणे तितकाच उत्तम अभिनय, अजून काय हवंय? पण दोघांचे हे  गुण जरी जुळत असले तरी प्रेमात हे यशस्वी होऊ शकले नाही.

हे ही वाचा – या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या “कर्तृत्ववान” बायका!

nag tabu inmarathi

 

नव्व्दच्या दशकात हे दोघे ही नावारूपाला आले, तब्बू ने करियर ची सुरवात भले हिंदी चित्रपटात झाली असली तरी ती काही काळ तेलगू मध्ये देखील रमली, आणि तिथेच तिला तिच्या आयुष्यातील हिरो भेटला तो म्हणजे नागार्जुन. त्याला भेटल्यावर तब्बू ला जणू तुम मिले दिल खिले और जिने को क्या चाहिये असे झाले होते.

 

tabbu inmarathi 2

हे ही वाचा – भरपूर चर्चेत आलेल्या ११ हिंदी चित्रपटांच्या या रंजक गोष्टी जाणून घ्या!

दोघांनी एकत्र मिळून केवळ तीन चित्रपटात काम केले परंतु त्यांचे रिअल लाईफ लव्ह स्टोरी बरेच वर्ष होतीं. अगदी नागार्जुनच्या हैद्राबाद मधील घराजवळ तिने घर विकत घेतले होते. भले तिचे काम हिंदीत एकीकडे चालू होते परंतु तिने ते हैद्रबाद मध्ये राहून मॅनेज करायची.

तीन चित्रपटात काम एकत्र काम केल्याने साहजिकच त्यांच्या लव्हस्टोरीजच्या चर्चा मीडिया मध्ये येऊ लागल्या, परंतु त्यांनी हे कायमच सर्वांपासून गुपित ठेवले होते.

दोघे लग्न करणार का? अशी चर्चा होऊ लागली होती. नागार्जुनच्या वडिलांचा तब्बू ला विरोध होता, असे काहींचे म्हणणे होते कारण तब्बू धर्माने मुस्लिम होती.

 

tabbu 6 inmarathi

 

नागार्जुनचे लग्न आधीच अमला या अभिनेत्रीशी झाले होते  परंतु तब्बू तरीदेखील त्यांच्या प्रेमात होती, दोघे ही लग्नानंतरसुद्धा एकमेकांना डेट करत होते.

कधीतरी तू माझा होशील ना? अशीच काहीशी अवस्था तब्बूची असेल, १० वर्ष नागार्जुन सोबत रिलेशनशिप मध्ये होती. नागार्जुन त्याच्या बायकोला सोडून माझ्याशी लग्न करेल या एवढ्याच एका आशेवर ती जगात होती. मात्र हिंदी चित्रपटाप्रमाणे अंत मैं हैप्पी एंडिंग होता हैं असे काही झाले नाही.

 

tabu 4 inmarathi

 

तब्बल १० वर्ष वाट पाहून सुद्धा नागार्जुन परत आला नाही. कारण नागार्जुन त्याच्या बायकोला सोडून येण्यास तयार नव्हता, त्यामुळे १० वर्षांनंतर सुद्धा ते एकत्र येऊ शकले नाहीत.

तब्बू आजतागायत अविवाहित राहिली आहे. चित्रपटांमधून कणखर आई, नवऱ्याला मदत आणि पाठिंबा देणारी अशी ही नायिका खऱ्या आयुष्यात मात्र फक्त एकतर्फी प्रेमाची नायिका म्हणून जगताना दिसून येत आहे. 

 

tabbu 5 inmarathi

 

हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर अनेक चित्रपटात नायिका हिरो ची शेवटपर्यंत वाट बघत असते  व अगदी सिनेमाची शेवटी तो तिला भेटतो सुद्धा, पण हे फक्त पडद्यावर घडू शकत. खऱ्या आयुष्याचा दिग्दर्शक कोणीतरी वेगळंच असतो तो ठरवेल त्याच दिशेने कलाकारांचे आयुष्य जात असते. 

===

हे ही वाचा – परीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?