आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“चुकीला माफी नाही” हे वाक्य काही वर्षांपासून खूप प्रचलित झालं आहे. तुम्ही कोणतीही चूक केली किंवा तुमच्याकडून ती चूक अनावधानाने झाली, तरही त्याची शिक्षा ही तुम्हाला भोगावीच लागते. जितकी चूक छोटी, तितकी शिक्षा छोटी आणि जितकी चूक मोठी, तितकी शिक्षा सुद्धा मोठी होत असते.
काही लोकांचं नशीब बलवत्तर असतं ज्यामुळे त्यांना चूक झाली तरीही शिक्षा होत नाही किंवा स्वतःमध्ये बदल करण्याची त्यांना अजून एक संधी मिळते. काहींना मात्र नशिबाची तितकी साथ मिळत नसते. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या चुकांमुळे सुद्धा तुम्हाला शिक्षा ही घडत असते.
शिक्षा होण्याची सुरुवात आपल्याला शाळेपासूनच केली जाते. ‘वर्गाच्या बाहेर उभं करणं’, ‘हाताच्या बोटांवर छडी मारणे’, ‘कोंबडा करायला लावणे’ असे कित्येक प्रकार करून आपली पिढी आज स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. आजच्या पिढीला ऑनलाईन शाळा आणि सजग पालक यामुळे आपल्याला व्हायची तशी शिक्षा फार कमी वेळेस होते.
कमी वयात आपण घडलेल्या शिक्षेबद्दल आपण दुसऱ्या व्यक्तीला किंवा सिस्टीम ला दोष देत असतो. नंतर हे लक्षात येतं की, कोणतीही सिस्टीम ही लोकांच्या फायद्यासाठीच केलेली असते. त्या सिस्टीम नुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तुम्हाला गरज असते.
उदाहरण सांगायचं तर, ७.१९ ची लोकल ही त्याच वेळेस निघणार असते. तुम्हाला उशीर झाला म्हणून ती तुमच्यासाठी थांबत नसते. फारच नशीबवान असाल तर, तुम्हाला २ मिनिटं उशीर झाला आणि लोकल सुद्धा उशिरा आली असं कदाचित होऊ शकतं. पण, ही शक्यता फार कमी वेळेस असते.
दुसऱ्या प्रकारची शिक्षा त्यावेळी होते जेव्हा तुम्ही एखादं चुकीचं काम जाणिवपूर्वक केलेलं असतं. कधी चूक असते, कधी चोरी तर कधी तो गुन्हा असतो. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा प्रकार हा प्रत्येक देशात वेगळा बघायला मिळतो.
चोरीच्या शिक्षेला थोड्या फार फरकाने शिक्षा सारखी असली तरीही बलात्कार सारख्या गुन्ह्याला भारतापेक्षा आखाती देशांमध्ये जास्त भयंकर शिक्षा आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. प्राचीन काळात गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा या आजपेक्षा कडक होत्या.
काही शिक्षांबद्दल उपलब्ध झालेली ही माहिती वाचली तर गुन्हेगार हा गुन्हा करण्या आधी दहा वेळेस विचार करेल. बघूया कोणत्या आहेत या शिक्षा:
१. हत्तीच्या पायाखाली देणे:
मुघल साम्राज्यात सुरू झालेली ही शिक्षा १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत आमलात आणली जायची. ही शिक्षा देण्यासाठी गुन्हा अक्षम्य आणि जनतेला एक धडा मिळावा असा असायचा.
प्रत्येक राजाची ही शिक्षा कधी द्यायची ? याचे आपले ठोकताळे असायचे. पण, ही शिक्षा देण्याची पद्धत आणि ती शिक्षा स्वीकारताना होणारा त्रास हा कोणालाच बघवत नव्हता. हत्ती हा साधा नसावा आणि त्याला राग आलेला असावा अशी राजांची अट असायची.
–
हे ही वाचा – कझाखस्तानमधील गुन्हेगारांना “लैंगिक” गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्याची अघोरी पद्धत वाचूनही झोप उडेल.
–
एकदा तो हत्ती उन्मत्त झाला की, मग त्याच्या समोर गुन्हेगाराला लोळवलं जायचं आणि त्यावरून पळण्यासाठी बांधलेल्या हत्तीला सोडून दिलं जायचं. गुन्हेगाराचं पुढे काय व्हायचं ? हे वेगळं सांगायची गरज नाहीये. शिक्षा पहायला आलेले लोक पणावलेल्या डोळ्यांनी एक धडा शिकून घरी परतायचे.
२. पिंजऱ्यात कोंडून मारणे:
भयानक शिक्षेच्या प्रकारांपैकी ही अजून एक. इटली आणि इंग्लंड या देशांमध्ये ही शिक्षा प्रामुख्याने दिली जायची.
ज्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जायची त्यांना एका पिंजऱ्यात कोंडलं जायचं. हा लोखंडी पिंजरा भरवस्तीत ठेवला जायचा आणि गुन्हेगाराला लोकांच्या हवाले केलं जायचं. गुन्हेगाराला या पिंजऱ्यात कसलाही खाद्यपुरवठा दिला जायचा नाही आणि कोणाला तसं करायची परवानगी सुद्धा नसायची.
‘पिंजऱ्यात जायचं नसेल तर शिस्तीत वागा’ असा एक संदेश तिथले पोलीस लोकांना नेहमीच द्यायचे.
३. नाक कापणे:
‘चुकीचं काम करून घराण्याचं नाक कापणे’ ही म्हण आपण ऐकली आहे. इजिप्त मध्ये मात्र गुन्हेगाराला नाक कापण्याची शिक्षा एकेकाळी सुनावली जायची. नाक कापलेल्या सर्व नागरिकांना रिनोकोरुरा या गावात सोडलं जायचं. हे पूर्ण गाव हे नाक कापलेल्या गुन्हेगारांचं म्हणून ओळखलं जायचं.
“कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही” हा संदेश इजिप्त चे लोक सर्वांना द्यायचे. सरकारी नोकरीत भ्रष्टाचार करतांना जरी कोणी सापडलं तरी हीच शिक्षा कायम असायची.
४. प्राण्यांचे ‘मास्क’ आणि बॅजेस :
‘मास्क’ मध्ये सतत राहणे हे किती कठीण आहे हे आपण सध्या बघतच आहोत. सध्या फक्त नाकापुरता लागणारा मास्क हा त्याकाळी गुन्हेगारांना पूर्ण चेहऱ्यावर लावण्यासाठी दिला जायचा आणि तो सुद्धा विविध प्राण्यांच्या तोंडाचा आकारात तयार केलेला असायचा.
या शिक्षेमध्ये सर्वात कमी हिंसा असायची. पण, पूर्ण शहरभर प्राण्यांचा चेहरा असलेलं तोंड घेऊन तुम्हाला फिरायला लावलं जायचं. प्राण्यांच्या मास्क व्यतिरिक्त असे काही मास्क असायचे जे बघूनच लोकांना तुमची भीती वाटायची.
तुम्हाला एक बॅज घालून फिरावं लागायचं ज्यावर लिहिलेलं असायचं की, “या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि त्याच्यासोबत कोणताही व्यवहार करू नका”. हा अदृश्य मास्क लावून बरेच लोक फिरत असतात. पण, ते जाहीरपणे लोकांना सांगणं हे मृत्यूपेक्षाही खजील करणारं आहे.
–
हे ही वाचा – भारतात जन्मठेपेची शिक्षा ही “आयुष्यभराची” असते की फक्त १४ वर्षांची असते? सत्य वाचा..!
–
५. चिखलात फेकणे:
फ्रान्स मध्ये ही शिक्षा दिली जायची. गुन्हेगाराला चिखलाच्या दलदलीत लोटून दिलं जायचं. गुन्हेगार हा एक तर पाण्यात बुडल्याने मारायचा किंवा चिखलामुळे गुदमरून मरायचा.
काही ठराविक गुन्ह्यासाठीच ही शिक्षा दिली जायची. ही शिक्षा देतांना सुद्धा लोकांना एकत्र केलं जायचं आणि मग कारवाईला सुरुवात केली जायची.
६. लोखंडी साच्यात कोंडणे:
‘मुघल-ए-आझम’ सिनेमात जसं अनारकली ला भिंतीमध्ये कोंडलं जायचं. तसं प्राचीन काळात काही देशात गुन्हेगाराच्या मापाचा लोखंडी साचा तयार केला जायचा आणि त्यामध्ये गुन्हेगाराला बंद केलं जायचं. काही वेळेस ही शिक्षा केवळ भीती दाखवण्यासाठी सुद्धा दिली जायची.
७. हातांवर खिळा ठोकणे:
जगातील ही सर्वात क्रूर शिक्षा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. येशू ख्रिस्त यांना देण्यात आलेली ही शिक्षा त्यांनी हे म्हणत स्वीकारली होती की, “त्यांना कळत नाहीये की, ते काय करत आहेत.” लाकडी चिन्हावर उभे केलेले आणि हातावर, पायांवर खिळे ठोकण्यात आले होते.
या घटनेनंतर येशू ख्रिस्त यांनी जगाचा निरोप घेतांना दिलेला अहिंसेचा संदेश ख्रिश्चन धर्मीयांमध्ये रुजला गेला होता. हा संदेश ज्यांनी मान्य केला त्यांचं आयुष्य सुखकर झालं असं सर्व ख्रिस्त धर्मीय आजही मानतात.
इतिहास हा जसा शौर्यगाथांचा साक्षीदार आहे तसा तो क्रूर शिक्षांचा सुद्धा साक्षीदार आहे. ‘कडेलोट करणे’ ही सुद्धा एक अशीच शिक्षा होती जी की, आपल्या राजासोबत विश्वासघात केल्यावर दिली जायची.
जनतेत एक संदेश जाण्यासाठी आणि स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी अश्या दोन प्रकारच्या शिक्षा त्या काळी दिल्या जायच्या.
जनतेला सुधरवण्यासाठी दिलेल्या शिक्षा या काहीतरी सकारात्मक बदल घडवायच्या. तर, स्वतःच्या फायद्यासाठी दिलेल्या शिक्षा जशी की, औरंगजेब ने संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा ही सर्वात क्रूर शिक्षा मानली जाते. अशी शिक्षा सहन करूनही आपल्या म्हणण्यावर ठाम राहणारे संभाजीराजे पुन्हा होणे नाही आणि असे औरंगजेब आपण आता पुन्हा तयार होऊ देणार नाहीत हे नक्की.
===
हे ही वाचा – तिने असं काय केलं की भारतात कोणत्याही महिलेला न झालेली शिक्षा तिला होतीये?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.