Site icon InMarathi

या ५ महारथींनी आयुष्यात जे कमावलं ते सगळं ‘अशा’ कृतींमुळे एका झटक्यात गमावलं!

WHO featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोशल मीडिया वर सध्या काय ट्रेंड होईल आणि काय नाही याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. रसोडे में कौन था? पासून पावरी हो रही है पर्यंत कित्येक उलट सुलट गोष्टी आपण ट्रेंड होताना पाहिल्या आहेत!

चांगल्या गोष्टी असो किंवा अत्यंत थुकरट गोष्टी त्यांना ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा घेतात म्हणजे मीमकरी लोकं!

एखादी लोकप्रिय व्यक्ति काहीतरी विचित्र वक्तव्य करते आणि सोशल मीडियावर त्या व्यक्तव्याला धरून अनेक भन्नाट मीम्स व्हायरल होतात, लोकं स्टेटसला ते मीम्स ठेवतात, शेकडो ग्रुप्स मध्ये, फेसबुक पेजवर ती मीम्स व्हायरल होतात, आणि मग त्या व्यक्तीवर एक कायमचा ठपका बसतो!

 

 

आणि त्यांनंतर कोणत्याही बाबतीत त्यांना त्याच एका गोष्टीवरून ट्रोल केलं जातं. आज आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही फेमस लोकांच्या ट्रॉलिंगविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या एका वक्तव्यामुळे किंवा एका घटनेमुळे समस्त नेटकरी त्यांना सदैव ट्रोल करतात!

१) अमृता फडणवीस :

 

 

संपूर्ण सोशल मीडियावर ‘मामी’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या  एका गाण्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे!

अर्थात अमृता यांची ही काही पहिली वेळ नाही. याधीही त्यांनी अशीच काहीशी गाणी व्हिडिओ स्वरूपात युट्यूबवर रिलीज केली गेली. स्त्रीभ्रूण हत्या अशा गंभीर समस्येवर त्यांनी केलेल्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यावरून सुद्धा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

===

हे ही वाचा ‘मामी जोमात, ट्रोलर्स कोमात’ : अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सना खुलं आव्हान

===

मागील महिन्यात रिलीज झालेल्या “डरे डरे” या गाण्याचे सुद्धा वेगवेगळे मीम्स व्हायरल झाले आहेत. याबाबत एका मुलाखतीत अमृता यांना या ट्रॉलिंगविषयी प्रश्न विचारल्यावर “माझ्या ट्रॉलर्सना उत्तर मी माझ्या नवीन गाण्यातून देईन” असं उत्तर त्यांनी दिलं!

 

 

 

२) हार्दिक पांड्या :

 

 

२०१९ साली करण जोहरच्या टॉक शो मधला तो एपिसोड सगळ्यांनाच आठवत असेल. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल हे दोघे BCCI बरोबर केलेलं कॉंट्रॅक्टच्या विरोधात जाऊन, या कॉफी विथ करण या शो वर गेले आणि तिथे अत्यंत विचित्र गोष्टींवर चर्चा केली.

त्या मुलाखतीत हार्दिक पांड्याने त्याच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या एकंदर विचारसरणीबद्दल त्याने जी मुक्ताफळं उधळली ती नॅशनल टेलिव्हिजनवर प्रचंड व्हायरल झाली आणि लोकांनी त्यावरून त्या दोघांना प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली.

नैतिकतेच्या पातळीवर हार्दिकने केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं होतंच पण त्या एका वक्तव्यामुळे हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं गेलं! खूप वेगवेगळी मीम्स आणि व्हीडियो प्रचंड व्हायरल झाले. इंटरनेटवरून ती मुलाखत उतरवण्यात आली पण लोकांनी त्यातल्या काही क्लिप्स उचलून खूप व्हीडियो व्हायरल केले!

 

 

आज हार्दिक पांड्याचं लग्न होऊन त्याला मूलही झालंय पण तरी आजही लोकं त्याला त्याच एका मुलाखतीवरून खूप नावं ठेवतात!

३) सचिन पिळगावकर :

 

 

मराठी इंडस्ट्रीमधले सीनियर अभिनेते, हिंदी चित्रपटसृष्टिवरही स्वतःचा ठसा उमटवणारे, आणि कित्येकांचे लाडके ‘महागुरु’ म्हणजे सचिन पिळगावकर हे तर नेटकऱ्यांच्या हीटलिस्टवरच असतात!

अशी ही बनवा बनवी पासून नवरा माझा नावसाचा असे कित्येक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांना देणाऱ्या सचिन पिळगावकर यांच्याकडे इंडस्ट्रीमध्ये आदराने पाहिलं जातं! पण गेली काही वर्षापासून सचिन हे सतत नेटकऱ्यांच्या रडारावर असल्याचं आपण बघितलं आहे!

माझा कट्टा वरची मुलाखत असो, मुंबई ऍनथम हे गाणं असो किंवा सोशल मीडिया वर टाकलेला वर्कआउटचा व्हिडिओ असो सचिन पिळगावकर यांची प्रत्येक बाबतीत ट्रोलर्सनी प्रचंड खिल्ली उडवली आहे!

===

हे ही वाचा महागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का?

===

पण प्रेक्षकांची प्रतिक्रिया देखील खरीच आहे, इतक्या चांगल्या अभिनेत्याला असले आचरट चाळे करताना पाहिल्यावर लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाणारच ना!

आजही युट्यूब माझा कट्टावरची त्यांची मुलाखत आणि आमची मुंबई या गाण्याच्या खालच्या कमेंट जरी वाचल्या तरी आपल्याला समजेल की, महागुरू सतत टीकेचे धनी का होतात ते?

या अशा काही व्हिडओज मुळे आणि टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या मुलाखतीतल्या एरोगन्समुळे सचिन यांनी जे जे कामावलं ते सगळं गमावलं आहे!

 

 

एक उत्तम फिल्ममेकर म्हणून सचिन यांचं नाव नक्कीच झालं असतं पण दुर्दैवाने सोशल मीडियावर माकडचाळे करणारे महागुरू अशीच त्यांची ओळख झालेली आहे!

 

४) संजय राऊत :

 

 

“मी दाऊदला दम भरलेला” या वक्तव्यावरून नेटकऱ्यांचे अत्यंत लाडके झालेले शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांना कोण ओळखत नाही!

या एका वक्तव्यावरुन लोकांनी “सौ दाऊद एक राऊत” ही टॅगलाइनसुद्धा प्रचंड फेमस केली होती. संजय राऊत हे तर सततच चर्चेत असतात, ते केवळ आणि केवळ त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे!

माझा कट्टावर “WHO ला काय कळतंय?” “मी डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडर कडून घेतो!” अशी हशा पिकवणारी स्टेटमेंट करणाऱ्या संजय राऊत यांना तर नेटकऱ्यांनी प्रचंड झोडपलं!

 

 

ही मुलाखत असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत असो, दोन्ही मुलाखतीत राऊत यांनी जी वक्तव्ये केली त्यावर शेकडोंनी मीम्स व्हायरल झाली आणि लोकांनी ती मीम्स चवीने शेयरसुद्धा केली!

खरं बघायला गेलं तर संजय राऊत हे काही राहुल गांधीसारखे सदैव अशीच असंबद्ध वक्तव्य करणारे नव्हते!

===

हे ही वाचा प्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत…

===

पण कोरोना पार्श्वभूमीवर समस्त डॉक्टरांना आणि चक्क who ला वेड्यात काढणाऱ्या एका वक्तव्यामुळे आजही नेटकरी सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रॉल करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात!

 

५) कंगना रनौत –

 

 

प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री कंगना तर गेली कित्येक वर्ष सतत चर्चेत आहे. हृतिक रोशन बरोबर असलेलं तिचं अफेअर आणि त्यावरून झालेला वादंग, हृतिकवर जहाल भाषेत केलेली टीका आणि मुक्ताफळं हे सगळं आपल्याला काही नवीन नाही!

ते प्रकरण मिटल तर त्यात सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण उभं राहिलं. त्यावरून तिने समस्त बॉलिवूडकरांना धारेवर धरायला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस तिची बोल्ड वक्तव्यं लोकांसमोर यायला लागली!’

युट्यूबसारख्या माध्यमातून वरचेवर ती लोकांसमोर येऊन बॉलिवूडचा मुखवटा फाडायला तिने सुरुवात केली! म्हणाल तर चांगलं पण हे सगळं तिच्यावरच उलटल.

 

 

सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचा पोपट म्हणून तिला हिणवलं जाऊ लागलं, तिच्यावर भन्नाट मीम्स व्हायरल व्हायला लागले. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत शब्दांत केलेली टीका आणि एकेरी उल्लेख यामुळे तिला बरंच नुकसानसुद्धा झालं!

एक अभिनेत्री म्हणून चांगली असली तरी सतत चर्चेत राहण्याच्या मोहापायी तिचं आर्थिक नुकसान तर झालंच पण तिला नेटकऱ्यांची ती ट्रोलिंग क्वीनच बनली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version