Site icon InMarathi

एका शिक्षकाने ‘अवघ्या काही तासात’ लिहिलं गाणं: जे भारताला ‘स्वच्छतेची’ सवय लावतंय

gadi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/Iकी nMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे अनेकदा जुन्या हिंदी सिनेमात एखादया हिरोच्या एन्ट्री साठी धमाकेदार पार्श्वसंगीत असायचे. भले पडद्यावर हिरोची एन्ट्री थोडी उशिरा झाली तरी नुसते  संगीत वाजले की प्रेक्षक समजून जायचे, आता हिरोची एन्ट्री होणार. आपला भारतीय सिनेमा मुळातच गाण्यांमुळे जास्त प्रभावी होतो.

कचरा प्लास्टिक बाटलीवाला अशी हाक ऐकू आली आपण समजून जातो की भंगारवाला आला आहे. आज अनेक इमारती आणि कॉम्प्लेक्समध्ये अशा लोंकाना एन्ट्री नसल्याने आजच्या लहान मुलांनी ती हाक ऐकलीही नसेल. पूर्वी भंगारवाले, भांडी विकणारे एक विशिष्ट आवाजात ओरडायचे त्यावरून घरातल्या गृहिणीला समजून जायचे.

 

हे ही वाचा – सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

आज ते आवाज जरी कमी झाले असले, तरी एक गाणं रोज सकाळी कानावर पडते ते म्हणजे “गाडीवाला आया घरसे कचरा निकाल” की आपल्याला समजते की कचऱ्याची गाडी आली आहे.

गाणे आले कुठून?

कोणतंही यमक न वापरता साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं हे गाणं, सोशल मीडियावर खूप चाललं. या गाण्याचे लेखक चक्क एक शिक्षक आहेत. श्याम बैरागी असे त्यांचे नाव, ते मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. शिक्षक जरी असले तरी गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत.

 

गाण्याची संकल्पना :

भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले होते आणि याबद्दल लोकांनीही आपल्या गावात, शहरात जनजागृती करावी असे सांगितले होते.

जनजागृतीची नुकतीच सुरवात झालेली असताना मंडला नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी श्याम यांना बोलवून घेतले आणि त्यांना या योजनेबद्दलची  माहिती दिली तसेच घंटा गाडीसाठी गाणे लिहण्यास सांगितले.

जेणेकरून हे गाणे वाजल्यावर लोकांना कळेल घंटा गाडी आली आहे, कचरा बाहेर ठेवला पाहिजे. हे ऐकून झाल्यावर ते घरी गेले व एका दिवसातच गाणे लिहून काढले.

 

हे ही वाचा – बघा, शिक्षकाने केलेली नामी युक्ती – टिव्ही पाहून होतंय गरीब मुलांचं शिक्षण!

गाण्याचा रिच कसा वाढला :

मंडला शहरामध्ये लोकांनी हे गाणं viral केल्याने ते साहजिकच आसपासच्या राज्यात सुद्धा पसरले. छत्तीसगडच्या एका दिग्दर्शकाने तर चक्क यावर व्हिडिओ बनवून youtube वर टाकला.

त्याला देखील मोठ्या प्रमाणवर चांगला प्रतिसाद मिळला आहे. फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातील लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला आहे.

 

 

 

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ व काही प्रमाणात राजस्थान अशा ठिकाणी आज हे गाणं वाजत आहे. सोशल मीडियाची ताकद हीच तर आहे.

एका शहरातील घंटा गाडीसाठी बनवलेले गाणे आज तीन राज्यातल्या घंटागाडीसाठी वाजत आहे.

लोकांनी जरी ते viral केले असले तरी त्याचे श्रेय जाते ते श्याम बिजारी यांनाच. आज कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा ते ठेवत नाहीत. उलट ते अभिमानाने सांगतात देशात सावर्जनिक स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम मी केले आहे.

आज कलाकारांनी देशाच्या बाबतीत काही मते मांडली तर लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते पण एकीकडे अशा कलाकाराचे कौतुक करताना जास्त कुणी दिसून येत नाही.

===

हे ही वाचा – एखादं गाणं डोक्यात सतत घोळत का राहतं, यामागील शास्त्रीय कारण वाचा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version