आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लहानपणी आजी आजोबा म्हणा किंवा इतर नातेवाईक, यांनी दिलेले पैसे एक तर थेट आई बाबांकडे दिले जायचे किंवा गल्ल्यात जायचे. गल्ला म्हटलं, की सहसा प्लास्टिक किंवा पत्र्याचा उभा डबा आठवतो, ज्याला फक्त नाणी आणि नोटा घडी करून आत टाकायला छेद असायचा.
साध्यासुध्या भाषेत सांगायचं झालं, तर हे ‘पिगी बँकेचं’ भारतीय रूप होतं. इंग्रजी शब्दांचा भडिमार करायला गेलो, तर आपला गल्ला म्हणजे आजची पिगी बँक!
पाश्चिमात्य संस्कृती जशी भारतात रुजत गेली, तसे त्यांचे शब्द त्यांची जीवनपद्धती आपण आत्मसात करत गेलो. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे पिगी बँक.
आजकाल लहान मुलांचे बँकेत खाते सर्रास उघडले जाते. त्यामुळे या पिगी बँकेला मर्यादा आल्या. अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या पिगी बॅंक्स नाहीशा झाल्या.
कधी विचार केला आहे का? की सर्रास वापरल्या जाणाऱ्या या पिगी बँकेला पिग अर्थात डुकराचाच आकार का असतो? वाघ, सिंह किंवा हत्ती का नाही?
याबाबत आज विस्ताराने बघूया. साधारणपणे पंधराव्या शतकात या पिगी बँकबाबतचा उल्लेख पाहायला मिळतो. या वस्तूचा इतिहास फारच रंजक आणि जाणून घ्यावा असा आहे.
जसं आपल्याकडे मूर्ती बनवायला शाडूची माती, मसाल्याच्या किंवा लोणच्याच्या बरणीसाठी चिनी माती वापरली जाते, तसंच युरोपात ताट, वाट्या आणि किचनमधील उत्तर भांड्यांसाठी पिग (pygg) या मातीचा वापर केला जात असे.
चलन व्यवस्था प्रचलित झाल्यानंतर नाणी ठेवण्यासाठी pygg याच मातीपासून पैसे साठवण्यासाठी सुद्धा भांडी बनवली जाऊ लागली.
पैसे सुरक्षित साठवण्याच्या व्यवस्थेला बँक म्हणतात आणि पिग मातीपासून बनलेली भांडी पैसे साठवण्यासाठी वापरली जाऊ लागली यावरून या भांड्याला नाव पडले ‘पिगी बँक’!
याच pygg चा उच्चार त्यानंतर pig असा होऊ लागला आणि मग त्या भांड्याला डुकराचा आकार दिला गेला.
जसं जसं पुरातन सर्वेक्षण आणि त्याच्या शोधासाठी उत्खनन व्हायला लागलं, तसतशी नवनवीन माहिती सुद्धा समोर यायला लागली. जर्मनीमध्ये झालेल्या उत्खननात तर तब्बल १३ व्या शतकातील एक पिगी बँक हस्तगत केली गेली आहे.
कालांतराने इंडोनेशियामध्ये १४व्या शतकातले एक भांडे सापडले होते. यावरून बरेच वाद रंगल्यानंतर, युरोपचा इंडोनेशिया आणि इतर आग्नेय आशियाई देशांसोबत असलेले व्यापारी संबंध लक्षात घेता पिगी बँकेची ही प्रचलित भांडी आशियात आल्याचे स्पष्ट झाले.
–
हे ही वाचा – आकाशाचा रंग निळा का असतो? जाणून घ्या…
–
तंत्रज्ञान जसजसं विकसित होत गेलं, तसा इतिहास, संस्कृती यांचा अभ्यास होऊ लागला. नवनवीन माहिती अधिकाधिक प्रमाणात उजेडात येऊ लागली.
काही आर्कियोलॉजिस्टचं म्हणणं आहे, की १५ व्या शतकात युरोपात pygg नावाची कोणतीही माती अस्तित्वातच नव्हती.
शिवाय काही डिक्शनरीमध्ये तर pygg आणि pig हे दोन्ही शब्द सारखे असून अक्षराच्या बदलाच्या हिशोबानुसार त्याचा वापर केला जातो, असाही उल्लेख आढळतो.
नंतर काही संशोधक आणि इतिहासकारांनी पिगी बँकेचा संबंध हा चीनशी असल्याचेही समोर आणले. पिगी बँक ही चीनच्या काही साम्राज्याशी संबंधित असल्याचे ते सांगतात.
डुक्कर हा प्राणी चिनी संस्कृतीमध्ये समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे चलनी नाण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी डुकराच्या आकाराची भांडी ही तेथील साम्राज्यात बनवली जाऊ लागली आणि तिथूनच पिगी बँकेचा उदय झाला.
जसं आपण पाहिलं, की गल्ला कोणताही असो, त्याला पिगी बँकच म्हटलं जातं. मग त्याचा आकार किंवा त्याला बनवण्यासाठी बनवलेले साहित्य कोणतेही असो.
कालांतराने या पिगी बँकेचा आकार आणि रचना सुसंगत व्हायला लागली. बटनावर पैसे ठेवून ते दाबले की घराच्या आतून कुत्रा येऊन ते नाणे आत घेऊन जायचा अशा संकल्पना असलेल्या पिगी बँक अगदी आजही भारतात सर्रास दिसतात.
पिगी बँक फोडण्याची प्रचलित परंपरा सुद्धा कालाधीन होऊन, आता झाकण असलेले पिगी बँक बाजारात आली आहे. त्यामुळे हवे तेव्हा पैसे काढता येतात. पैसे बाहेर काढण्यासाठी भांडं फोडण्याचा त्रास आता उरलेला नाही.
वस्तू कशीही असली, तिचा इतिहास काहीही असला, तिचा आकार बदलला,रंग बदलला तरी तिच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश नाही बदलत.
सुरवातीपासून लहान लहान बचत करणे ही चांगली सवय असून भविष्यात तिचा योग्य तो फायदा होतो, हा संदेश काळानुसार बदलत गेलेली पिगी बँक आपल्याला देते.
===
हे ही वाचा – ‘मॅक्डोनाल्ड्स’ने अशी कोणती शक्कल लढवली की ज्याने लहान मुलांना वाचनाची गोडी लागतेय?! जाणून घ्या
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.