Site icon InMarathi

लंडन कोर्टाचा ग्रीन सिग्नल! नीरव मोदीला भारतात आणायचा मार्ग मोकळा झालाय का?

modi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शेक्सपियर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, “To be or not to be is the question”, हे वाक्य आपण सिनेमा, नाटक, TV वरील मालिकांमधून कमीत कमी १०० वेळा तरी ऐकलं असेल, पण आज हे वाक्य वेगळ्याच कारणासाठी इथे वापरत आहोत (जगाव की मरावं हा संदर्भ नाहीये) ते आजच घडलेल्या एका घटनेवरून.

सध्या भारतात “मोदी” या नावाला एक “वलय” प्राप्त झालंय, त्यामागे एक नाव हे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांचे आहे, तर दुसरे नाव आहे “नीरव मोदी” याचे!

 

 

हो हाच तो नीरव मोदी जो पंजाब नॅशनल बँकेचे १४००० करोड रुपये बुडवून लंडनला पळून गेला; तर सांगायचं असं, की ह्या नीरव मोदी महाशयांना भारतात पडकून आणण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे.

===

हे ही वाचा या प्रसिद्ध माणसाने फक्त पीएनबी बँकेलाच नव्हे तर प्रियांका चोप्रालाही लावला होता चुना

===

ब्रिटनमधील न्यायालयाने नीरव मोदी याला भारताकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे. आज ब्रिटनच्या कोर्टात न्यायाधिशांनी असा निर्णय दिला, की फसवणूक आणि Money laundring च्या आरोपाखाली त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.

नीरव मोदीला पकडण्यासाठी भारत सरकारने जंग जंग पछाडले होते, इंटरपोलमार्फत नीरव मोदीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसदेखील बजावली होती. खरंतर नीरव मोदी हा एक हिरे व्यापारी, परदेशात होणाऱ्या हिरे प्रदर्शनातून तो हिरे खरेदी करत होता, पण त्यासाठी मोठी रक्कम लागत असे!

मग त्याने पंजाब नॅशनल बँकेच्या बनावट हमीपत्रावर परदेशातील भारतीय बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते, पण त्याच्याकडे परतफेडीसाठी आव्यश्यक असेलेली रक्कमच नव्हती, पण कर्जाच्या रकमेची परतफेड झालीच नाही.

 

 

मूळ मुद्दा तर पुढेच आहे; इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा आपल्या मनात एक शंका येते, की खरंच त्याला भारतकडे सुपूर्द केले जाईल का? त्यानंतर काही अडचणी आल्या तर?

कारण या आधीही Brewery King विजय मल्ल्या यांच्या बाबतीत आपले हात चांगलेच पोळले आहेत, मग नीरव मोदीच्या बाबतीत असं काही झालं तर.

 

 

खरंतर सामान्य माणसाचा एक कर्जाचा हफ्ता चुकला, तरी मागे तगादा लावणाऱ्या बँकांना एक माणूस हजारो कोटींचा चुना लावून जातो हे काही शोभत नाही!

कारण काहीतरी गडबड असल्याशिवाय हे सगळं घडतं का? एक दिवस एक घोटाळा उघडकीस येतो आणि कळतं, की हा तर हजारो कोटीचा घोटाळा करून गेला! मग ज्या सामान्य माणसाच्या आयुष्यभराच्या मिळकतीवर असे घोटाळ्यांचे शिक्के लागतात, तेव्हा त्या सामान्य माणसाने काय करायचे हो!

तुम्ही तुमची सगळी जमापुंजी विश्वासाने एका बँकेत ठेवता, कधीतरी बातमी येते, या बँकेत घोटाळा, ठेवीदारांचे करोडो रुपये बुडाले, काय अवस्था होत असेल हो त्यांची!

===

हे ही वाचा भारतीय उद्योग विश्वातील “चांडाळ चौकडी”ची विस्फोटक माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी

===

सांगायचा मुद्दा एवढाच सामान्य माणूस फार तर फार काय करू शकतो, फक्त आशा लावून बसू शकतो, माझे पैसे मिळाले तर किती बरं होईल, जे बँकवाले एक हफ्ता चुकला तर तुमच्या मागे लागायचे ते अशा वेळी तुमचे अश्रू पुसायला येत नाहीत!

म्हणून खरंच असं वाटतं, की या माणसांना ते जिथे लपले असतील तिथून बाहेर काढून चाबकाचे फटके द्यावेत, पण ते करूनही गेलेले पैसे परत मिळतील याची खात्री नाही.

 

 

पण मग करायचे काय, “येईल का असा दिवस, की ज्यादिवशी सगळ्यांचे बुडवलेले पैसे परत मिळतील”, पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण त्याला कठोर शिक्षा तरी व्हायला हवी, बघूया कुठले स्वप्न पूर्ण होते?

===

हे ही वाचा मोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version