Site icon InMarathi

एक असा तत्ववेत्ता जो स्वतःच्याच विनोदावर हसून मृत्युमुखी पडला, वाचा त्याची कहाणी!

philospher inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मंडळी आजपर्यंत तुम्ही अनेक हुशार आणि प्रसिद्ध अशा  फिलॉसॉफरबद्दल अनेक किस्से नक्कीच ऐकले असतील, परंतु तुम्ही कधी असं ऐकलं आहे का? की एखादा तत्त्ववेत्ता स्वतःच्याच विनोदवर एवढा हसला की त्याला आपले स्वतःचे प्राण गमवावे लागले.

मंडळी, होय असे घडले आहे. आपण त्याच मृत्यूबद्दल या लेखात माहिती जाणून घेणार आहोत….

तुम्ही अनेक तत्त्ववेत्त्यांच्या कथा ऐकल्या असतील या कथा अनेक प्रकारच्या असतात. अनेक वेळा आपण एखादा तत्ववेत्ता किती वेंधळा किंवा सर्वांपेक्षा वेगळा आहे याचे किस्से ऐकले आहेत.

परंतु ही कथा मात्र त्या सर्व कथांपेक्षा प्रचंड वेगळी आहे. कारण सामान्यपणे अशा घटना इतिहासदेखील खूपच कमी प्रमाणात घडलेली आढळून येते.

Chrysippus या नावाचा एक ग्रीक तत्त्ववेत्ता होता. त्याचा जन्मा इसवी सन पूर्व २७९ रोजी साली या शहरात झाला. आत्ता हे शहर टर्की मध्ये आहे आणि या शहराचं सध्याच नाव मर्सिन असं आहे.

Chrysippus याने त्याचे शिक्षण अथेन्स मधे पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने लगेच stoic school येथे शिक्षक म्हणून नोकरीदेखील सुरू केली. तेथील शाळेच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर Chrysippus याने या शाळेचा दुसरा यशस्वी प्रमुख म्हणून देखील जबाबदारी स्वीकारली.

हे ही वाचा – लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा!

 

 

Chrysippus हा स्वतः स्वतः एक बॉक्सर होता. त्याला शाळेत असताना फिलॉसॉफी या विषयांमध्ये रस होता आणि झिनो यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्यामध्ये नैपुण्य मिळवलं. या शाळेचा प्रमुख असताना त्याने अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्याने या काळात जवळपास सातशे पुस्तकांचं लेखन केलं.

ही सर्व पुस्तक आज जरी उपलब्ध नसली तरी त्याने सांगितलेलं तत्वज्ञान मात्र आजही उपलब्ध आहे. त्याच्या नंतरच्या काही लेखकांनी आपल्या लेखनात त्याचा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा – त्या काळी भूल न देता केलेलं लाईव्ह ऑपरेशन बघायला लोक तिकिटं काढायचे!

Chrysippus ने अनेक गोष्टींबद्दल आपलं तत्त्वज्ञान मांडलेेल आहे. जेवढं त्याच आयुष्य सर्वदूर प्रसिद्ध आहे, तेवढाच त्याचा मृत्यू देखील चर्चिला जातो. त्याच्या मृत्यूची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याचा मृत्यू सामान्यपणे झाला नाही तर त्यानेच सांगितलेल्या विनोदावर प्रचंड हसत असताना त्याला मृत्यू आला.

त्याच्या मृत्यूबद्दल देखील अनेक मतांतर आहेत. असं म्हणतात की १४३ व्या ओलंपियाड मध्ये तो मनोगत व्यक्त करत होता यावेळी त्याने एका गाढवाला अंजीर खाताना बघितलं. या प्रसंगवरती त्याला विनोद सुचला आणि तो ओरडला की,” त्या गाढवाला आता कोणीतरी शुद्ध वाईन देखील पाजा, ज्यामुळे त्याला अंजीर पचवता येईल.” एवढे बोलून झाल्यानंतर तो प्रचंड मोठ्याने हसू लागला, तो एवढा हसला की त्याला कशाचे भानच राहिले नाही!

 

हसता हसताच तो खाली पडला त्याला छातीत त्रास होत होता त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला काही लोक त्याला मदत करण्यासाठी धावले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता अगदी काही क्षणांमध्ये त्याचा मृत्यू झाला.

 

 

त्याच्या मृत्यूबद्दल काही जण म्हणतात की, त्याच्यावरती विषप्रयोग झाला होता तर काहीजण त्याचा मृत्यू नैसर्गिक मानतात. त्या काळात फॉरेन्सिक विज्ञान फार प्रगती करू शकलो नव्हतं त्यामुळे आज देखील त्याच्या मृत्यूबद्दल गुड कायम आहे.

फक्त ख्रिसमस नाही तर त्याच्या आधी देखील काहीजणांना अशाच प्रकारे अति प्रमाणात असल्यामुळे मृत्यू आला होता परंतु या घटना मात्र खूप कमी वेळेस इतिहासात घडलेल्या पाहायला मिळतात.

 

===

हे ही वाचा – “आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version