Site icon InMarathi

गोविंदासोबत फिल्म करायची म्हणून त्याने गाठली मुंबई, पण गोविंदाने मात्र कायमच…

tigmanshu inmarathi feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सोहम गोडबोले 

===

बॉलीवूडच्या दुनियेची कोणाला भुरळ नसते? भारतात जेव्हापासून सिनेमा बनायला सुरवात झाली. तेव्हा फारसे चित्रपटात काम करणे चांगले मानले जायचे नाही, एकीकडे तेव्हा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते तर एकीकडे सिनेमालाही चांगले लागले होते.

सिनेमा व्यवसायात पैसा येऊ लागला होता, त्यामुळे सिनेमात काम करण्यासाठी अनेकजण मुंबई गाठत होते. अशोककुमार, दिलीपकुमार स्ट्रगल करून सुपरस्टार होत होते. पुढे सत्तरच्या दशकात राजेशखन्ना, ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन असे प्रत्येक दशकाचे सुपरस्टार होत होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नव्वदच्या दशकात खान मंडळी आपले आपले सिनेमे गाजवत होते तर त्यांना टक्कर देण्यासाठी विरारचा मुलगा आला होता त्यांचे नाव ‘गोविंदा’. गोविंदाची स्वतःची अशी एक स्टाईल निर्माण केली, त्याच्या ‘नंबर वन’ सिनेमांनी तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

 

हे ही वाचा – भारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारा असामान्य दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर

अशा ह्या नंबर वन स्टार ची भुरळ सर्व देशात होती, त्याची डान्स स्टेप्स सर्वच फोलो करायचे. असाच एक सिनेमा वेडा व गोविंदा फॅन.

फक्त आणि फक्त गोविंदा सोबत काम करण्यासाठी मुंबईत आला. आज तो प्रख्यात दिग्दर्शक बनला आहे त्यांचं नाव म्हणजे तिगमांशू धुलिया.

अलाहाबाद सारख्या शहरात बालपण गेलेल्या तिगमांशूला घरातूनच नाटक सिनेमाची आवड निर्माण झाली होती. घरची परिस्थिती उत्तम असल्याने पैसे कमवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला गेला नाही. हव्या त्या क्षेत्रात करियर करण्याची परवानगी दिली होती.

तिगमांशुला मोठे दोन भाऊ असल्याने ते नाटकात काम करायाचे म्हणून, हा ही नाटकात काम करू लागला. मोठे झाल्यावर भावांनी वेगळ्या करियर च्या वाटा निवडल्या परंतु, तिगमांशू ला नाटकाची आवड निर्माण झाली व ह्यातच काहीतरी करायचे असे त्यांनी घरी सांगितले.

घरून तसा पाठिंबा होताच, अलाहाबाद सारख्या शहरातून बाहेर पडून मोकळ्या वातावरणात जायचे होते. म्हणून त्यांने  NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला ऍडमिशन घेतली. इरफान खानचं नाटक बघून इरफानशी दोस्ती केली. इरफान सिनियर असला तरी दोघांची मैत्री उत्तम होती. पुढे जेव्हा त्याने पहिला सिनेमा दिग्दर्शित केला त्या मध्ये त्याने इरफानलाच घेतले होते.

 

 

NSD मधून तो बाहेर पडला तरी स्ट्रगल कोणाला चुकले आहे? NSD मधून अभिनयाचे धडे जरी गिरवले असले, तरी त्याला दिग्दर्शन खुणावत होते. कॉलेजमधील गोविंदासोबत काम करायचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. शेखर कपूर ह्यांच्या टीम मध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून नोकरी मिळवली.

शेखर कपूर ह्यांच्या सोबत बॅन्डेट क्वीन साठी काम केल, ते झाल्यावर तिगमांशूने शेखर कपूर यांना गळ घातली, की मला गोविंदासोबत काम करायचे आहे. त्यांनी कुठून तरी गोविंदासोबत ओळख काढून त्याचा नंबर घेतला.

नंबर जरी मिळाला असला तरी गोविंदासोबत मीटिंग होणे हे महामुश्किलीचे काम होते कारण त्या काळात गोविंदाचे सलग सिनेमे येत होते. त्यामुळे तो प्रचंड बिझी होता. त्यात तिगमांशू सारख्या नवख्या दिग्दर्शकाला वेळ देईल की नाही हा प्रश्न होताच.

एक दिवस तो आला जेव्हा गोविंदा ने मीटिंग साठी बोलवले, मीटिंग ठरली होती हैदरबाद ला कारण त्याचे शूटिंग तिकडे चालू होते. रामोजी नुकतेच सुरु झालेले होते.

 

 

हैद्रबादला जाणं म्हणजे खर्च आलाच तेव्हा  तिगमांशू स्ट्रगलर असल्याने पैसे फारसे जवळ नसायचे. जावं तर लागणार होत कारण स्वप्न पूर्ण करायचे होते.

संजय मिश्रा या आपल्या मित्राला सोबत घेऊन बसने मुंबई ते हैद्राबाद प्रवास केला. आजच्यासारख्या वोल्वो बसेस त्याकाळी नसल्याने साधी बस पकडून त्यांनी हैद्रबाद गाठले. रहायची सोय स्वतःलाच करायची असल्याने एक स्वस्तातला लॉज घेतला, गोविंदाला फोन केला, गोविंदा ने शूटिंग च्या ठिकाणी बोलावले त्याप्रमाणे हे तिथे गेले.

हे ही वाचा – मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

 

 

तिथे पोहचल्यावर गोविंदाशी भेट झाली, परंतु ‘आपण दुपारी जेवताना बोलू आता शूटिंग करतोय’ असे, कारण सांगून तो शूटिंग मध्ये बिझी झाला. दुपारी जेवणाची वेळ झाली, तेव्हा हे परत गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ‘संध्याकाळी आपण बोलू’, संध्याकाळ झाल्यावर जेव्हा  हे परत गेले तेव्हा गोविंदा म्हणाला ‘इकडचे शूटिंग संपले आहे मुंबईला निघतोय जाताना विमानात  बोलू’.

आधीच इतकं खर्च झाल्याने विमान प्रवासासाठी पैसे कुठून असणार? असे तिगमांशू ने सांगितले. त्यावर गोविंदा च म्हणाला ‘निर्मात्या ला सांगून तुमचे तिकीट काढतो, एअरपोर्ट ला भेटू.

दोन स्ट्रगलर्स एअरपोर्टला पोचले, अख्खे युनिट जाताना बघत होते. ना गोविंदाने ओळख दिली ना युनिट ने, ते दोघे पुन्हा बस पकडून मुंबई गाठली तोच स्ट्रगल सुरु ठेवला.

काही वर्षानंतर जेव्हा तिगमांशू धुलिया दिग्दर्शक म्हणून नाव झाले. गोविंदाने तिगमांशू बरोबर फिल्म पण केली पण काही कारणामुळे ती पुढे आली नाही.

 

 

अनेकांची  स्वप्न असतात अनेक तरुण लोक या इंडस्ट्री मध्ये स्वप्न घेऊन येत असतात काहींची स्वप्न पूर्ण होतात काहींची स्वप्न ही स्वप्न म्हणूनच राहतात.

===

हे ही वाचा – बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version