Site icon InMarathi

पेट्रोलच्या दरवाढीमागचं कारण काय? सामान्यांना पडलेल्या प्रश्नाचं अर्थपूर्ण उत्तर, वाचा

petrol price inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : शिवानी दाणी वखरे (अर्थविषयक सल्लागार) 
(सोशिओ-इकॉनॉमी-पोलिटिकल अनॅलिस्ट, भाजप प्रवक्त्या, महाराष्ट्र)

===

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे १०० च्या वर गेलेलं पेट्रोलच्या गगनभेदी किमती!

 

 

वेळोवेळी दाखले दिले जात आहेत, कॉँग्रेसच्या काळात कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १०० डॉलर प्रति बॅरेलच्या वर होते, तरी पेट्रोल ६५ रुपयाच्या जवळपास होतं आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ६०$ प्रति बॅरेल च्या जवळपास असताना मात्र १०० का? सामान्यांसोबत खुप अन्याय हतो आहे.

ह्याचे दोन विविध अँगल बघायचा प्रयत्न करू.

कच्चे तेल ज्या बेस भावात आपण विकत घेत असतो त्यावर केंद्र आणि राज्य आपापले कर लावते आणि एकूण किंमत ठरत असते. म्हणून आठवत असेल तर गोव्यामध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत इंधनाचे भाव सगळ्यात कमी होते कारण राज्य सरकार कर तुलनात्मक दृष्ट्या कमी लावत होते. आणि ह्यालाच २०१४ आणि २०२१ मध्ये समजायचे असेल तर त्या काळी जे कर लावले जायचे त्याद्वारे कॅपिटल एक्सपेंडिचर खूप काही ठळक असे होत नव्हते.

मुख्यत्वे ते संकलन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करण्यात खर्च व्हायचा. (रेव्हेन्यू आणि कॅपिटल चा सोपा फरक हा, कि रेव्हेन्यू खर्च ज्याला राजस्व खर्च म्हणतात. तो केल्यावर कुठलेही असेट निर्माण होत नाही आणि अनुक्रमे भविष्यात उत्पन्नही येत नाही तेच कॅपिटल एक्सपेंडिचर ते असते जे केल्यावर असेट तयार होते आणि भविष्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या उत्पन्न मिळते.

स्वाभाविकच कॅपिटल खर्च महत्वाचा असतो आणि २०१४ पर्यंत तेच कॅपिटल एक्सपेंडिचर अतिशय कमी होत होते तुलनात्मक अभ्यास केला तर. ह्यात २०१४ नंतर हे चित्र बदलले आणि हळूहळू एकूण खर्चात कॅपिटल एक्सपेंडिचरचा सहभाग वाढू लागला. आपण ते आपल्या आजूबाजूला बघू शकतो की, इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती जोरावर आहे. (जी चायनाने ८० च्या दशकातच करायला सुरुवात केली होती).

जागतिक स्तरावर ३० डॉलर प्रति बॅरेलचे भाव वाढले नक्कीच आहेत, त्याची कारणे सुद्धा आपण बघणार आहोत. पण त्या आधी, १०० डॉलरच्याच्या तुलनेत ६० डॉलर ही किंमत कमी आहे, त्यामुळे इंधनाचे दर सुद्धा कमी असावे ही इच्छा असणे स्वाभाविक आहे.

हे ही वाचा – पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या या मूलभूत सुविधांबद्दल आपण अजूनही अंधारात आहात!

 

 

पण आज जे काही कर संकलनाद्वारे खर्च होतो आहे त्यात ह्या महामारीमुळे ७० कोटी जनतेला दिले जाणारे मोफत राशन, आणि अर्थव्यवस्था कुठल्याही कारणाने मंदीत जाण्यापासून रोखायचे असेल तर कॅपिटल एक्ससपेंडिचर हा एकमेव पर्याय असतो आणि त्या साठी लागतो पैसे आणि तो येणार कुठून?? तर हाच काय तो मार्ग सध्या उपलब्ध आहे ज्याचा अवलंब सरकार करत आहे.

हे अगदी मान्य आहे की हे पैसे सामान्य जनतेच्या खिशातून चालले आहेत. आपली ही मागणी असू शकते की श्रीमंतांकडून हे घ्यावे. गरिबांना झळ नको.

वाचकहो, हे लक्षात घेतले पाहिजे की, २०१४ च्या तुलनेत महागाई सुद्धा आटोक्यात असताना सरकार हे धाडसी पाऊल उचलायचा विचार करू शकते आणि म्हणून तो करते आहे. आता अर्थव्यस्थेला मदत करण्याची आपली पाळी आहे.

जगातिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव का वाढले? ३० डॉलर प्रतिवरून हे भाव मागील काही महिन्यातच ६० डॉलर प्रति बॅरेल वर का आले? तर एक महत्वाचे कारण म्हणजे जे ओपेक (OPEC) देश आहेत, मुख्यत्वे ज्यात इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत आणि व्हेनेझुएला हे देश येतात जे तेल निर्यातीत अग्रेसर असतात त्यांनी महामारीमुळे मागणी नाही म्हणून आपले उत्पादन कमी केले.

 

 

सौदीने तर नुकतेच म्हटले की “आम्ही एक मिलियन बॅरेल प्रति दिवस कमी तेल उत्पादित करू, आणि हीच भूमिका साधारण फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत जारी राहील”. यात महामारीच्या प्रकोपातून आपण बाहेर वेगाने येत असल्याने मागणी पुन्हा पूर्ववत होते आहे.

मागणी वाढली आणि पुरवठा मात्र खंडित राहिला तर त्याचा थेट परिणाम असाही किमतींवर होणारच जे की आपण बघितले. ह्यात अमेरिकेतसुद्धा जे उत्पादन होते त्याचे आकडे सुद्धा खूप सकारात्मक आणि समाधानकारक नाही.

वॅक्सीन वेगाने पुरवली जाते आहे. आपल्या देशात तर १ कोटीचा आकडा सुद्धा पार केला, त्यात वरचढ बाब म्हणजे जाणकार सांगत होते की, चीनची मागणी देखील कमी होईल पण असे काहीही आढळून येत नाही. कच्च्या तेलाची चीनची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढते आहे आणि भारताची मागणी सुद्धा जोर पकडत आहे आणि त्यामुळे ही वाढलेली किंमत कच्च्या तेलाची आहे.

जाणकार असे सांगतात की भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हे भाव ६५ डॉलर प्रति बॅरेलच्या जवळपास स्थिरावतील, आणि असे झाले, आणि आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली (जगात सगळ्यात जास्त रिकव्हरीचा वेग आपलाच असणार आहे असे बहुतांश आतंरराष्ट्रीय संस्था सांगतात). की इंधनाचे भाव सुद्धा पूर्ववत येऊ शकतात.

 

 

प्रामुख्याने महाराष्ट्रात राज्य सरकारसुद्धा आपले कर कमी करून हे भाव आटोक्यात अणू शकते. पण तशी इच्छा शक्ती लागते. जीएसटीचा हिस्सा वेळेवर मिळतो आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर राज्याचे दर्शनीय असे काहीही होताना दिसत नाहीये, अश्यात केंद्राला खर्चाची अडचण असेल तरीही राज्याने जनतेच्या भावनांचा आदर राखून तो कमी करायला हरकत नसावी.

इंधन किमतीचे तांडव सुरु असताना, सोन्याचे भाव मात्र जवळपास १५ % टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालेत. असे का? तर हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय असू शकतो.

३९००० ते ४०००० प्रति तोळे असे दर असताना जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० ला असताना ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये ते ५५००० प्रति तोळ्यांपर्यंत पोहोचले होते आणि आता मात्र पुन्हा ते ४६००० प्रति तोळ्याच्या दरावर पोहोचले आहे. हे असे का झाले? तर त्यामागचे काही इंटरेस्टिंग कारणे आहे.

जगात पैसा हा वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये फिरत असतो. प्रामुख्याने डॉलर, कच्चे तेल आणि सोने.

 

हे ही वाचा – पेट्रोलचा खर्च कन्ट्रोल करत दुचाकीचे ऍव्हरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स वाचाच

जेव्हा अर्थव्यवस्थेत सकारात्मकता नसते आणि तेव्हा पैसा हा सोन्यात जातो. कोरोना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकदम पीकवर होता. दुनिया बहुतांश लॉकडाऊन मध्ये होती. अश्यात या अस्थिरतेत जागतिक गुंतवणूकदारांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला आणि मागणी वाढली. त्यामुळे आपोआप सोन्याचा भाव हा गगनाला भिडला.

जशी अर्थव्यवस्थेत स्थिरता येऊ लागली तसे दुसरे एसेट क्लास गुंतवणूकदारांना आकर्षक वाटू लागले आणि पैसा इतर दिशांना वळता झाला. प्राथमिक कारण हे की अर्थव्यवस्थेत स्थिरता येऊ लागली.

दुसरे म्हणजे अमेरिकन ट्रेझरी यिल्डचे व्याज आकर्षक झाले त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा तिथे पलटला. तिसरे कारण की अमेरिकेत गुंतवणूक होणार म्हणून डॉलर सोन्याच्या तुलनेत अधिक मजबूत होऊ लागला. जे सुध्दा एक कारण आहे की ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या.

चौथे कारण म्हणजे, अमेरिकेतील नवे सरकार आर्थिक पॅकेज देऊ करते आहे जे की अर्थव्यस्थेला अजून गती देईल.

वॅक्सीन देणे जोरावर आहे. जेव्हा पासून या कारणांमुळे एकूण व्यवस्था रुळावर आली, तेव्हापासून बाकी ऍसेट क्लासेस आकर्षक वाटु लागले.

गुंतवणूकदारांना आकडे असे सांगतात की इक्विटी बाजारसुद्धा वर गेले. ऑगस्टनंतर डॉलरसुद्धा मजबूत झाला. जाणकार सांगतात की येणा-या काळात सोन्याच्या किमती इथेच स्थिरावतील आणि बहुतेक कमी सुद्धा होतील. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तीन पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.

१] थेट सोने घेऊ शकतो
२] गोल्ड फंड, किव्वा ईटीएफ
३] एसजीबी, सॉव्हरिअन गोल्ड बॉण्ड

थेट सोने विकत घेतले आणि विकले तर त्याच्यावर जो काही फायदा होईल त्यावर कर, रिअल इस्टेट प्रमाणे लागतो, गोल्ड फंड अथवा ईटीएफ मध्ये डेट म्युच्युअल फंडाप्रमाणे फायद्यावर कर लागतो. मात्र एसजीबी सॉव्हरिअन गोल्ड बॉण्ड मध्ये गुंतवणूक केली तर झालेल्या फायद्यावर कुठलेही कर द्यावे लागत नाही.

 

 

फायदा संपूर्ण करमुक्त असतो. त्यामुळे सोने केवळ दागिने जेवढे पाहिजे तेवढेच घ्यावे, बाकी एकूण पोर्टफोलिओला बॅलन्स करायचे असेल तर सोने हा एक चांगला पर्याय आहे, आणि त्यात एसजीबी हा उत्तम पर्याय आहे. एसजीबी म्हणजे काय आपण कधी नंतर सविस्तर बोलू.

एकूणच काय कच्च्या तेलाचे भाव इथे स्थिरावतील, आणि सोन्याचे भाव भविष्यात कमी होऊ शकतात असे जाणकार सांगतात. हे का होते? कसे होते? हे मात्र आपल्याला नक्कीच कळायला हवे त्यासाठी हा केलेला प्रपंच.

उगाच आपण कुणी तरी काही म्हणतंय, सरकारला नावं ठेवतं आणि आपणही त्यात हाथ धुतो हे काही उचित नाही. इंधनाचे भाव गगनाला का भिडले आहे? हे समजलेच पाहिजे. ह्यात विरोधक कसे राजकारण करतात आहे .

मोदींचे खरंच चुकतेय का? भाव कमी करणे म्हणजेच कर कमी करणे हे शक्य आहे का? आणि ते जर का असेल तर ते का करत नाही आहे? ह्यावर हे कधीतरी पुढील लेखात चर्चा करू. तूर्तास गुंतवणूकदार म्हणून सोन्याने पोर्टफोलिओ रिबेलेंस किंवा हेज करा आणि आपण जे जास्त रकमेत इंधन विकत घेत आहो ते कुठेतरी होणाऱ्या कॅपिटल एक्सपेंडिचर साठी वापरले जाते आहे आणि तेच भविष्यात समृद्धी घेऊन येईल ह्यावर विश्वास ठेवा… बघा पटतंय का??

हे ही वाचा – सोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात! कसे? जाणून घ्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathiगल

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version