आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लडाखच्या सीमेवर आपल्या सैनिकांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, याची केवळ कल्पनाच केलेली बरी! जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सतत बर्फाच्छादित असलेल्या या प्रदेशात भारतीय जवान देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात.
भारतातील नागरिकांसाठी, स्वतःच्या जीवावर उदार सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या या जवानांसाठी काहीतरी करायला हवं असं प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटत असतं. नाविन्याची आवड असलेले सोनम वांगचुक यांनी खरोखरंच या जवानांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हिमाच्छादित वातावरणात, या सैनिकांना उबदार वातावरण मिळवून देऊ शकतील अशा तंबूंची निर्मिती त्यांनी केली आहे. या तंबूचे वजन ३० किलोपेक्षाही कमी आहे. याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, -१४ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात सुद्धा उत्तम उब मिळून देण्याची या तंबूची क्षमता आहे.
या तंबूमध्ये तापमान नियंत्रण करण्यासाठी लागणारी सगळी ऊर्जा ‘सोलार पॉवर’मधून मिळणार आहे. एकावेळी १० जवान आत राहू शकतील या आकाराचे हे तंबू त्यांच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरतील.
‘रात्री १० वाजता, गलवान व्हॅलीमध्ये तंबू बाहेरील वातावरणाचे तापमान -१४ डिग्री असताना तंबूमधील तापमान +१५ डिग्री होते. सोलर एनर्जीमुळे केरोसीनची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, प्रदूषण सुद्धा कमी होईल. १० जवानांसाठी पुरेशी जागा असलेल्या या तंबूचे वजन ३० किलोहूनही कमी आहे’ असं ट्विटही सोनम वांगचुक यांनी केलं आहे.
SOLAR HEATED MILITARY TENT
for #indianarmy at #galwanvalley
+15 C at 10pm now.
Min outside last night was -14 C,
Replaces tons of kerosesne, pollution #climatechange
For 10 jawans, fully portable all parts weigh less than 30 Kgs. #MadeInIndia #MadeInLadakh #CarbonNeutral pic.twitter.com/iaGGIG5LG3— Sonam Wangchuk (@Wangchuk66) February 19, 2021
कोण आहेत सोनम वांगचुक?
बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. नुकतीच दुसऱ्यांदा आई झालेली करीना कपूर, या सिनेमात फुंगसुक वांगडु हे नाव ऐकून दुःखी होते.
सोनम वांगचुक म्हणजे खऱ्या जीवनातील फुंगसुक वांगडु!
लेह जिल्ह्यात जन्मलेल्या वांगचुक यांना वयाच्या ९ व्या वर्षापर्यंत शाळेची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नव्हते. पुढे रिजनल कॉलेज, श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनीरिंगची पदवी त्यांनी घेतली. शिक्षणाची अवस्था आणि दर्जा बघून स्थानिक मुलांना शिकवणे सुरु केले.
त्यांच्या शाळेची वास्तू उणे ३० डिग्री तापमानातही सौर उर्जेवर गरम राहते. मुलांना अभ्यासासोबत पशुपालन, शेती, अन्न पदार्थ बनवणे तसेच अतीतीव्र वातावरणात जगण्याचे धडे दिले जातात.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा करत असतानाच पाण्याच्या समस्येकडे या वैज्ञानिकाचे वेधले गेले. उन्हाळ्यात वितळलेले सरोवरातील पाणी हे हिवाळ्यात कालवे, नदी, ओढे यांमधून वाहत राहते. कालांतराने त्यांनी या समस्येवर सुद्धा शोधून काढला.
कोनाच्या आकारात पाणी गोठवून ठेवणे, हा त्यावरील उत्तम पर्याय होता. ज्यामुळे कोेनाच्या वरच्या भागातच थेट सुर्यकिरणे पडतील आणि बर्फ पायथ्याला गोठत राहील.
–
हे ही वाचा – चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारलेल्या “स्वदेशी” आंदोलनात तुम्ही सहभागी होणार ना?
–
थोडक्यात काय, तर नाविन्याची आवड आणि त्यातून लोकांच्या फायद्यासाठी जे जे काही करता येईल ते करणं हा सोनम यांचा स्थायीभाव आहे. याचाच परिपाक म्हणून या तंबूची निर्मिती त्यांनी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.
त्यांच्या या नव्या शोधाविषयी फेसबुकवरील मंडळी मोठ्या उत्साहाने व्यक्त होत आहेत. त्यांनी सैनिकांच्या फायद्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल खरोखरंच अत्यंत स्तुत्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बघुयात नेटकरी नेमकं म्हणतायत तरी काय?
खऱ्या आयुष्यातील रँचोने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करून दाखवली असं प्रतिभा गुर्णानी यांचं म्हणणं आहे.
तुमच्या सारख्या महान व्यक्तीला आमचा सलाम! भारतातील अधिक तापमानाचा वापर अशाच पद्धतीने सगळ्या नागरिकांसाठी करता येईल, असंही नेटकऱ्यांचं मत आहे.
सोनम यांच्या उत्तम कल्पनांचा भारतीय सेनेला फार उपयोग होत असल्याचं आनंद अगरवाल यांचं म्हणणं आहे.
आयआयटीसारख्या मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन, त्यानंतर मोठ्या पगाराच्या हव्यासापोटी परदेशात जाणाऱ्या इंजिनिअर मंडळींना सुद्धा खडे बोल सुनावलेले बघायला मिळतायत.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि देशासाठी इतकं उत्तम काम करणारे सोनम वांगचुक हे अशा लोकांसाठी आदर्श आणि गुरु ठरले पाहिजेत असं रमण श्रीनिवासन यांचं म्हणणं आहे.
अरुण प्रताप सिंग यांचं मत विचार करायला लावणारं आहे.
सोनम हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. देशात सुरु असलेलं पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन, सरकारने त्यांच्या क्षमतेकडे लक्ष द्यायला हवं असंही ते म्हणतात. नवी पिढी घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं मत त्यांनी मांडलं आहे.
सोनम वांगचुक यांनी भारतीय जवानांसाठी उचललेलं हे मोठं पाऊल, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. नेटकऱ्यांकडून होणारी त्यांची वाहवा हे याचंच उत्तम उदाहरण आहे, हे नक्की!
===
हे ही वाचा – आमीरने सुपरहिट केलेल्या फुंगसुक वांगडुचा खराखुरा जीवनपट पाहून अधिकच भारावून जाल
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.