Site icon InMarathi

दीदींचे अंत्यसंस्कार आणि राजकीय घमासान: ‘शिवाजी पार्क’चा रंजक इतिहास!

shivaji park im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबईतील ‘शिवाजी पार्क’ हे फक्त एक मैदान नसून ते लोकांचं एक श्रद्धास्थान आहे. दादर या मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मैदान हे खूप मोठ्या इतिहासाचं साक्षीदार आहे. कित्येक खेळाडू हे इथे खेळून आपल्या करिअरमध्ये पुढे गेले आहेत आणि आज आपल्या राज्याचं किंवा देशाचं हे खेळाडू नेतृत्व करत आहेत. नुकतंच या मैदानावर ज्येष्ठ गायिका लता दीदी यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिकेटला गौरव मिळवून देणाऱ्या महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या शिवाजी पार्कवर आपल्या शालेय जीवनात क्रिकेटचा सराव आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली होती.

समस्त मराठी बांधवांच्या आदरस्थानी असलेले माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा या ‘शिवाजी पार्क’वर दसरा मेळावा घ्यायचे तेव्हा या पार्कच्या कानाकोपऱ्यात माणसं असायची.

 

 

या मैदानाने जितक्या स्पर्धा बघितल्या आहेत, तितकेच किंवा त्याहून अधिक राजकीय कार्यक्रम बघितले आहेत. अनुभवी लोकांना शिवाजी पार्कवर गेल्यावर आजही “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो ..” हे वाक्य उच्चारल्यावर वाजलेल्या टाळ्या, शिट्ट्या आठवत असतील हे नक्की.

===

हे ही वाचा UnseenMumbai : सागरी प्रवेशद्वाराला जन्म देणाऱ्या, अजूनही मुंबईतच असलेल्या वास्तूची कहाणी

===

एका मोठ्या इतिहासाचे साक्षीदार असलेलं हे मैदान एकेकाळी दुर्लक्षित होतं, त्याच्या आजूबाजूला अजिबात वस्ती नव्हती आणि तिथे येऊन राहण्यासाठी लोकांना विनंती करावी लागायची हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे आपल्या सर्वांच्या आवडीच्या ‘शिवाजी पार्क’चा इतिहास?

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दादरमधील हे मैदान मुंबईतील सर्वात मोठं मैदान आहे. २८ एकर इतकं क्षेत्रफळ असलेलं हे मैदान कित्येक राजकीय आणि क्रीडा कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकांच्या सेवेत हजर आहे.

शिवाजी पार्क हे असं एकमेव मैदान आहे जिथे क्रिकेट, मल्लखांब, टेनिस आणि फुटबॉल या सर्व खेळांचा सराव एकाच वेळी सुरू असतो. १२ मार्च २०२० रोजी आपल्या ‘शिवाजी पार्क’चं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ हे नाव देण्यात आलं. या प्रक्रियेला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल.

 

 

शिवाजी पार्क हे असं मैदान आहे जिथे दिवसा लहान, तरुण मुलं क्रिकेट खेळायला येतात. संध्याकाळी इथे तरुणाई बघायला मिळते, संध्याकाळी इथे जॉगिंगसाठी लोक येतात आणि इथे तयार करण्यात आलेल्या जॉगर्स ट्रॅकचा वापर करतात.

मैदानाचा अर्धा भाग हा सध्या शिवाजी पार्क जिमखाना आणि ‘द बेंगॉल क्लब’ यांना वापरण्यासाठी देण्यात आला आहे. राहिलेल्या जागेत समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क नागरिक संघ, ‘नाना नानी पार्क’, गणेश मंदिर, वाचनालय अश्या विविध उपक्रमासाठी हे मैदान सध्या मुंबईकरांच्या सेवेत सदैव हजर असतं.

सर्व वयाच्या लोकांना त्यामुळे शिवाजी पार्कबद्दल एक वेगळाच जिव्हाळा आहे.

१९२५ मध्ये ब्रिटिश राजमध्ये तत्कालीन बॉम्बे मुंसीपल कॉर्पोरेशनने शिवाजी पार्कची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात या मैदानाला ‘महिम पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं. १९२७ मध्ये हे नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं.

स्वातंत्र्य सैनिकांनी या मैदानावर ब्रिटिश सर्जर विरुद्ध कित्येक आंदोलने केली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा हे मैदान राजकीय निर्णयांबद्दल आपला आवाज उठवण्यासाठी नेहमीच हक्काचं व्यासपीठ राहिलेलं आहे.

ज्या आंदोलनामुळे आज महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य आहे आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ती ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ सुद्धा शिवाजी पार्क येथेच आकाराला आली होती. १९६० मध्ये हे आंदोलन यशस्वी झालं आणि महाराष्ट्र हे राज्य म्हणून उदयास आलं हे आपण जाणतोच.

===

हे ही वाचा ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल

===

 

आचार्य प्र.के.अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या चळवळीत दिलेलं योगदान कोणताही मराठी माणूस कधीच विसरणार नाही.

आचार्य प्र.के.अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क वरून केलेलं भाषण आणि त्यांना मिळालेला ‘लॉर्ड ऑफ शिवाजी पार्क’ हा पुरस्कार त्या काळात हा सोहळा प्रत्यक्ष पाहू शकणाऱ्या लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

शिवाजी पार्कमध्ये पश्चिमेकडे असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा हातात तलवार नसल्याने आणि केवळ दिशादर्शक असलेला हा पुतळा खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल.

१९६६ मध्ये लोकसहभागाने हा पुतळा उभारण्यात आला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आपल्या राजाचं दर्शन हे सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी भाव देणारं आहे.

शिवाजी पार्क आणि क्रिकेटचं नातं फार जुनं आहे. रमाकांत आचरेकर सर आणि अण्णा वैद्य यांनी या मैदानावर केलेल्या मार्गदर्शनामुळे भारतीय क्रिकेट संघाला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजित आगरकर हे सगळे खेळाडू शिवाजी पार्कच्या मैदानावर नेट प्रॅक्टिस करूनच भारतीय संघात समाविष्ट झाले होते.

 

 

मराठी माणसाला मुंबईत काही ठिकाणं ही फार हक्काची वाटतात. मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क. आज शिवाजी पार्क आणि त्या भोवताली असलेला परिसर हा असा आहे की, तिथे गेल्यावर कोणाचा पाय निघवत नाही.

आपली मुंबई ही स्वच्छ रहावी यासाठी प्रत्येक मुंबईकर हा नेहमीच प्रयत्नशील असतो. आज मुंबईची झालेली प्रगती ही एखाद्या छोट्या देशाला लाजवेल अशी झाली आहे. स्थानिकांना काही त्रास असतील. पण, ते कुठे नसतात?

भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा जेव्हा उल्लेख ऐकायला मिळतो, तेव्हा जगभरात कुठेही असलेल्या मराठी माणसाला अभिमान वाटतो. मुंबईने कित्येक साहित्यिक, कलाकार सुद्धा घडवले आणि योगायोगाने यातील दादा कोंडके, मिलिंद सोमण, अनुप जलोटासारखे यशस्वी कलाकार हे शिवाजी पार्क गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातच राहतात.

१८७ इमारती असलेल्या या प्रकल्पातील घरं हे शिवाजी पार्क गृहनिर्माण योजने अंतर्गत बांधण्यात आल्या होत्या.

१९०१ मध्ये ब्रिटिश राजवटीत या बांधकामाला सुरुवात झाली होती. या परिसरातील काही इमारती या ब्रिटिश काळात बांधण्यात आल्या आहेत हे बघितल्यावर लगेच लक्षात येतं. क्रॉफर्ड मार्केटपासून अवघ्या ९ किलोमीटरचं अंतर असल्याने दादर, शिवाजी पार्क भागाची प्रगती नेहमीच प्रगतीपथावर आहे.

जवळच्या भागात वस्ती वाढण्याचं श्रेय हे रेल्वेच्या वतीने १९२५ मध्ये बांधण्यात आलेल्या ‘टिळक पूलला’ बऱ्याच अंशी जातं. १९३० पर्यंत दादर-माटुंगा हा भाग शहर विकास प्राधिकरणासमोर असलेलं एक लक्ष्य होतं आणि त्या भागाचा कायापालट करून दाखवला.

१९३७ पर्यंत अत्यंत कमी वस्ती असलेला हा भाग अल्पावधीतच गजबजला होता. जवळच असलेल्या सिंधी कॉलनीची स्थापना ही श्री. कटारिया यांनी केली आणि शिवाजी पार्कच्या आसपासचा भाग हा नागरिकांनी गजबजून गेला.

शिवसेनेची स्थापना, दादरमध्ये बांधण्यात आलेलं शिवसेना भवन आणि शिवाजी पार्कवरील सभा यानंतर शिवाजी पार्क कुठे आहे? हे जाणून घ्यायची इच्छा अख्ख्या मुंबईसह देशातील लोकांना होऊ लागली.

 

 

आज शिवाजी पार्क जवळचा भाग बघितला तर अतिउच्चवर्गीय लोकांचा भाग हे लगेच लक्षात येतं. ७ मजले ते २३ मजली इमारतींनी आज हा परिसर भरलेला आहे. आज कित्येक जुन्या इमारतींची आवश्यक ती डागडुजी करून त्यातील घरं ही आज खूप चढ्या किमतीने सहज विकली जात आहेत.

५००० प्रति चौरस फुट इतका भाव असलेला शिवाजी पार्क जवळचा भाग हा आज देशातील महागड्या जागांपैकी एक आहे.

मुंबईबद्दल माहिती नसलेली एखादी व्यक्ती जर मुंबईबद्दल एखादी तक्रार सांगत असेल तर त्याला फक्त एकच आव्हान द्या की, “तू फक्त दादरमध्ये किंवा मुंबईत कुठेही एक फ्लॅट विकत घेऊन दाखव…” इतकंच आव्हान द्या. तो पुन्हा कधीच मुंबई बद्दल काहीच चुकीचं बोलणार नाही.

सध्या लोकांना त्रस्त करणाऱ्या कोरोनासारखी १८९६-९७ मध्ये प्लेगची साथ आली होती. ब्रिटिश सरकारने त्या सबबीखाली जनतेला खूप नीच वागणूक दिली होती. १८९८ मध्ये प्लेग पूर्णपणे निघून गेल्यानंतर मुंबई शहर सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई शहर सुधारणा समितीची स्थापना करण्यात आली होती.

===

हे ही वाचा मुंबई खऱ्या अर्थाने “घडवणारे” कर्तृत्ववान व दानशूर “नाना शेठ”…!

===

या समितीने काम सुरू केल्यानंतर शहर एकदम बदललं. मुंबई मध्ये येण्यासाठी लोक प्रयत्न करू लागले, घर विकत घेऊन इथेच स्थायिक होण्याचा लोक विचार लोक करू लागले आणि मध्यवर्ती असलेल्या दादर, शिवाजी पार्क ह्या इथूनच मुंबईच्या प्रगतीला सुरुवात झाली असं जाणकार सांगतात.

 

 

शिवाजी पार्कचा हा इतिहास आणि आजपर्यंतचा प्रवास वाचून तुम्हाला सुद्धा एकदा या वास्तूला भेट देण्याची इच्छा निर्माण झाली असेल हे नक्की.

मास्कचा वापर करून आपणही एकदा शिवाजी पार्कमध्ये जाऊन आपल्या आठवणींना उजाळा देऊन या. तुम्हाला मुंबईत असल्याचं सार्थक वाटेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version