आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
युपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असाल तर लक्ष्मीकांत यांच्या पॉलिटी पुस्तकाचा अभ्यास तुम्ही नक्कीच केला असेल. (लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला, कारण याशिवाय स्पर्धा परीक्षा ही अपुरी मानली जाते)
तर, या पुस्तकात पंचायत राज म्हणून एक वेगळा आणि महत्वाचा सेक्शन आहे आणि या शिवाय भारतीय घटनेचा अभ्यास हा निरर्थक ठरतो. कारण गांधींच्या ”खेड्याकडे चला” या घोषणेला राजकीय दृष्ट्या अर्थपूर्ण केलं ते या पंचायती राजने.
तर या पंचायती राजचे जनक कोण विचारले तर त्याच उत्तर येतं, ‘बलवंतराय मेहता’! पंचायती राजला देशात दृढ करण्यामध्ये मोलाचा आणि मोठा वाटा होता तो यांचाच.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तर बलवंतराय हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री, तसे तर ते लोकसभेचे खासदार पण कामराज प्लॅनमुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ येऊन पडली.
हे बलवंतराय राय देशातले एकमेव असे नेते आहेत ज्यांचा मृत्यू हा युद्धादरम्यान अथवा युद्धात झाला. आज त्यांच्याबद्दल आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.
१३ एप्रिल १९१९, क्वचित कोणता भारतीय असेल ज्याला या तारखेबद्दल माहीत नसेल, प्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांड!
त्यावेळेस फक्त प्रिंट मीडिया अस्तित्वात होती आणि पत्रव्यवहार मुख्य संदेशवहनाचे माध्यम असल्याने १५ दिवस शिळी घटना पेपर मधे ताजी बातमी म्हणून छापली जायची.
जालियनवाला बाग हत्याकांडाची ही घटना पंधरवडा-महिनाभराच्या काळात संपूर्ण देशात पसरली.
–
”घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू”: पाकिस्तान्यांना आव्हान देणारे बिपीन रावत यांचा जीनवप्रवास
आधुनिक यंत्रणा असूनही Mi-17V5 हेलिकॉप्टरचे याआधी सुद्धा झाले होते हे अपघात
–
याच जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ गुजरातच्या भावनगर भागात ब्रिटिश महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने संस्थेतर्फे अंतिम वर्षात दिल्या जाणाऱ्या पदवीचा त्याग केला.
कॉलेज मधून निघाल्यावर त्याने तडक लाला लजपत राय यांची ‘सर्व्हन्ट ऑफ पीपल’ ही संघटना जॉईन केली. हा तरुण होता बलवंतराय मेहता.
सर्व्हन्ट ऑफ इंडिया ही गैर राजकीय संघटना लालाजींनी समाजसेवेसाठी सुरू केली होती. बलवंतराय या संघटनेत समर्पकपणे कार्य करत होते. दोन वेळा ते या संघटनेचे प्रमुख म्हणून सुद्धा निवडले आले.
१९२८ मध्ये गांधी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली सुरत मध्ये सत्याग्रह सुरू होते. याच सत्याग्रहाच्या दरम्यान बलवंतराय एक नेते म्हणून उदयास आले.
१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी बलवंतराय तब्बल सात वर्षे जेल मध्ये होते.
स्वातंत्र्यानंतर गांधींच्या सांगण्यावरून बलवंतराय यांनी काँग्रेस जॉईन केली आणि १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोहिलवाड मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुक लढवली.जी त्यांनी तब्बल ८० हजार पेक्षा जास्त मतांनी जिंकली.
पुढे १९५७ ची निवडणूक सुद्धा त्यांनी तेवढ्याच फरकाने जिंकली. गांधींनी ठेवलेल्या ‘स्वराज’ संकल्पनेत गाव हे केंद्र होतं, त्यामुळे गाव सुद्धा राजकीय दृष्ट्या आत्मनिर्भर झालं पाहिजे असा संकल्प त्यांनी नेहरूंच्या समोर सोडला होता.
१९५७ च्या निवडणुकी नंतर नेहरूंनी यावर काम सुरू केले आणि एक कमिटी गठीत केले.
सर्व्हन्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेले बलवंतराय मेहता यांना त्यांच्या याच कार्यामुळे या कमिटीचे प्रमुख बनवले गेले.
नोव्हेंबर १९५७ मध्ये या कमिटीने आपल्या शिफारशी मंत्रिमंडळाच्या पुढे ठेवल्या. तीन स्तराच्या पंचायती राज चा ढाचा तयार झाला होता. गावासाठी ग्रामपंचायत, ब्लॉक साठी पंचायत समिती, जिल्ह्यासाठी जिल्हा पंचाय!
संसदेत चर्चा, वाद-विवाद, बदल या सगळ्यानंतर अखेर १ एप्रिल १९५८ ला संसदेत बलवंतराय आणि त्यांच्या कमिटीच्या शिफारशी मान्य झाल्या.
२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थान च्या नगौर गावापासून अधिकृतपणे पंचायत राज देशात सुरू झाले. पंचायत राज पूर्णपणे लागू करणारे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य ठरले.
१९९३ मध्ये ७३ व्या संशोधनाच्या अंतर्गत पंचायती राजला संविधानिक दर्जा प्राप्त झाला! पण बलवंतराय कमिटीने ठेवलेला ढाचा आहे तसा ठेवून काही बदल करण्यात आले.
१९६३ मध्ये कामराज प्लॅन लागू करण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला. त्याअंतर्गत पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी राजकीय पद सोडून पक्षाच्या मजबुतीसाठी ग्राउंड वर काम करावे असे ठरले.
===
हे ही वाचा – देशाला २ पॉवरफुल पंतप्रधान देणाऱ्या “किंगमेकरची” आज पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
===
त्यानुसार १९६३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री जीवराज मेहता यांनी राजीनामा दिला. मोरारजी देसाई यांच्या सांगण्यावरून बलवंतराय यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये पुन्हा कुरबुर सुरू झाली. १९ सप्टेंबर १९६५ ला युद्ध निर्णायक झाले होते.
युद्धामुळे गुजरातमध्ये सांप्रदायिक वातावरण बिघडले होते. बलवंतराय मेहता यांनी द्वारका जवळ असलेल्या मिठापुर रॅली मध्ये सहभागी व्हायचे ठरवले.
द्वारका हे कराची पासून ३५० किमी अंतरावर आहे. त्यामुळे तिथे जाण्यात धोका होता, तरी सगळ्यांचा विरोध झुगारून मेहता द्वारकेला निघाले.
अहमदाबादच्या एयरपोर्ट वर त्यांच्यासाठी विमान तयार होते. या विमानाचे पायलट होते जहांगीर जंगू. अहमदाबाद वरून द्वारका ४५० किमी दूर आहे.
तिथे कराची बेस वर उडण्यासाठी तयार असलेल्या एका फायटर जेटला ऑर्डर आली की भुज जवळ उडणाऱ्या विमानाची महिती घेऊन यावे.
या जेटचा पायलट होता, कैज मजहर हुसेन. उडाण घेतल्यानंतर हुसेनला कळले की हे लढाऊ विमान नसून प्रवासी विमान आहे.
तसेच जहांगीर यांनी विमानाचे पंख हलवून दया दाखवावी म्हणून इशारा पण केला होता. पण, कंट्रोल कडून हे हेर विमान असल्याचे सांगून त्याला पाडण्याचे आदेश आले.आणि युद्धात सेवेला असणाऱ्या हुसेन याने त्या विमानाचा वेध घेऊन ते विमान पाडले.
या विमानात पायलट, बलवंतराय मेहता, त्यांच्या पत्नी सरोजबेन, त्यांचे तीन सहयोगी आणि गुजरात समाचारचे पत्रकार यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेच्या तब्बल ४६ वर्षानंतर हुसेन याने पायलट जहांगीर यांच्या मुलीला, फरीद सिंग यांना ईमेल द्वारे त्याने केलेल्या कृत्याची माफी मागितली होती. पण माफी मागायला बराच उशीर झाला होता.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात बलवंतराय एकमेव असे नेते आहेत ज्यांचा युद्धात मृत्यू झाला होता. भारत सरकार द्वारे त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ३/- मूल्याचे पोस्टाचे तिकीट आणले गेले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.