तुमच्या शरीरातील ‘एकाच’ भागावर नका देऊ ताण… अन्यथा हा आजार उद्भवेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
शरीर म्हटलं की वेगवेगळे आजार सुद्धा आलेच. काही आजार पटकन बरे होणारे असतात तर काही दीर्घ काळ टिकून राहतात. काही निव्वळ औषधांनी बरे होतात तर काहींना बरं करण्यास मात्र शस्त्रक्रियेची गरज असते.
इतके निरनिराळे आजार आपल्याला बघायला मिळतात, की आपण कधी विचारही केला नसेल. पण सगळ्या आजारांची मुळं मोजकीच आहेत. एकतर ते आजार अनुवंशिक असतात किंवा आपल्या गडबडलेल्या जीवनशैलीचं फळ असतात. त्यातलाच एक आजकाल फार कॉमन होत चाललेला आजार म्हणजे हर्निया किंवा अंतर्गळ.
पूर्वी हर्नियाचं प्रमाण तितकंसं जास्त नव्हतं. पण आता प्रत्येक १० पैकी ३ लोकांना हा आजार झालेला आढळतोच. तर हर्निया काय असतो, का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्यावरील उपाय काय असतात हे आपण जाणून घेऊया.
हर्निया म्हणजे त्वचेचा काही भाग अत्यंत नाजूक होऊन, शरीरातील एखादा अवयव त्या त्वचेला चिरून बाहेर पडणे.
हर्निया होण्यामागची काही कारणे –
१) अनुवंशिकता.
२) जड वस्तू उचलून त्वचेच्या कोणत्यातरी भागावर सारखा ताण पडणे.
३) लठ्ठ पणामुळे त्वचा खेचली जाऊन तिच्यावर ताण येणे.
४) प्रेग्नन्सी, विशेषतः एका पेक्षा अधिक प्रेग्नन्सीज.
५)प्रिमॅच्युअर जन्म आणि जन्मावेळी वजन फार कमी असणे.
६) शास्त्रक्रियेनंतर जखम नीट न भरणे.
७) म्हातारपणामुळे त्वचा नाजूक होणे.
८) धुम्रपाणामुळे फुफुस व आजूबाजूच्या त्वचेवर ताण पडणे.
९) दीर्घकाळापासून होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास.
ह्या सगळ्यांचं परिस्थितींमध्ये आपल्या त्वचेच्या कोणत्या ना कोणत्या भागावर ताण पडतो व ती नाजूक होते. ज्यामुळे शरीरातील अवयव जसे, आतड्या, पोट आपल्या जागेवरून निसटून शरीरा बाहेर पडतात.
लक्षणं – बहुतांश हर्नियाना कोणत्याही प्रकारची लक्षणं नसतात. पण शरीरावर कुठे नॉर्मल व्यतिरिक्त काही बदल झालेले आढळले तर ते खालील दिलेल्या बदलांपैकी आहेत का तपासून पहा.
१) उभे असताना, खोकताना, बसून असताना शरीरावर अकारण टेंगुळ किंवा एक उंचवटा आलेला जाणवणे. व तो उंचवटा वाढत जाणे. हात लावून पाहिल्यास त्या त्वचेच्या आत काही तरी आहे असे जाणवणे.
२) झोपल्यावर ते टेंगुळ नाहीसे होणे.
३) टेंगुळ आलेली जागा वेदनाग्रस्त असणे.
४) सतत जळती लागणे.
५) अन्न पाणी गिळताना त्रास होणे.
६) छातीत वारंवार दुखणे.
–
हे ही वाचा – “कसंतरीच होतंय’” या प्रत्येकाला त्रासदायक ठरणाऱ्या आजारावर “हे” आहेत घरगुती रामबाण उपाय
हर्निया चे प्रकार –
1) Hiatal हर्निया – या प्रकारा मध्ये तुमच्या पोटाचा भाग, डायफ्रमला भेदून फुफुसांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत शिरतो.
डायफ्रम हा एक सच्छिद्र पापुद्रा असतो जो पोटापासून खालच्या सगळ्या अवयवांना छातीतील आवायवांपासून वेगळं ठेवतो.
हा प्रकार पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. व जेव्हा पोटातून अन्नाची किंवा कोणत्या द्रव्याची समोर न जाता, अन्ननलिके कडे गळती सुरु होते तेव्हा ह्या हर्नियाचा त्रास होऊ शकतो.
2) Umbilical हर्निया (नाभि-अंतर्गळ) – बेंबीच्या ठिकाणी होणाऱ्या अंतर्गळाला “नाभि-अंतर्गळ” म्हणतात. ह्या हर्नियाचा त्रास मुख्यतः लहान मुलांना होतो. गर्भात, नाळ बाळाच्या नाभीशी जोडलेली असते. जन्मानंतर नाळ गाळून पडते व नाभीच्या भाग बंद होतो. पण कधी असे न होता नाभी व्यवस्थित बंद होत नाही. आणि हर्नियाचा त्रास उद्भवतो.
बाळ रडत असताना जर नाभीत उंचवटा जाणवत असेल तर तो हर्निया असू शकतो. पण हा हर्नियातला एकमेव असा प्रकार आहे जो वयाच्या ५ वर्षांपर्यंत आपोआप नाहीसा होतो. जर ५वर्षानंतरही हर्निया गेला नाही तर त्वरित आपल्या डॉक्टरला भेट द्या. हा हर्निया असू शकतो.
–
हे ही वाचा – अस्थमासारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरली आहे ही मिठाची खाण!
3) Ventral हर्निया (अभ्युदर, आसंवृत अंतर्गळ)– उदराच्या पुढील भित्तीतून होणाऱ्या अंतर्गळाला ‘अभ्युदर-अंतर्गळ’, श्रोणि (ओटीपोट) भागातील आसंवृत (झाकलेल्या) छिद्रातून होणाऱ्या अंतर्गळाला ‘आसंवृत-अंतर्गळ’, Ventral हर्निया म्हणजे
उदरातून एखादा टिशू बाहेर येणे.
हा हर्निया मुख्यतः गरोदर किंवा बाळंतीण स्त्रियांना व लठ्ठ लोकांना होतो. पोटाची त्वचा अतिरिक्त ताणामुळे नाजूक होऊन आतील अवयव त्यामार्गे बाहेर पाडतात. ह्यात, उभे किंवा बसलेले असताना तुम्हाला तुमच्या उदराजवळ टेंगुळ जाणवेल. पण झोपल्यावर हे टेंगुळ नाहीसे होईल व टेंगुळ असलेल्या जागेवर वेदना होतील. ह्या पैकी एकही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेट द्या व उपचार करुन घ्या.
4) Inguinal हर्निया (वंक्षण-अंतर्गळ) – हा प्रकार बहुतेक वेळा पुरुषांमध्ये आढळून येतो. ज्या नालातून पुरुषांमध्ये शुक्ररज्जूजातो तेथील अंतर्गळाला ‘वंक्षण-अंतर्गळ’,ऊरुरक्तवाहिन्या (मांडीतील रक्तवाहिन्या) ज्या नालातून मांडीत जातात तेथील अंतर्गळाला ‘ऊरु-अंततर्गळ’ म्हणतात.
जन्माच्या वेळी त्वचेची पूर्ण वाढ न झाल्यामुळे किंवा कोणत्या शस्त्रक्रिये दरम्यान जखम पूर्ण पणे बरी न झाल्याने हा हर्निया होतो. हाच हर्निया वाढून नितंबात सुद्धा होऊ शकतो त्याला ‘नितंब-अंतर्गळ’ असे म्हणतात.
उपचार –
1) शस्रक्रिया करुन अंतर्गळाची पिशवी कापून काढून टाकणे.
2) हर्निया मुळे शरीरात कुठे पोकळी अली असेल तर ती शिवून बंद करणे.
3) निर्बल झालेले स्नायू शिवून भक्कम करणे, हाच हर्निया कायम बरे करण्याचा एक सगळ्यात उपयुक्त ठरलेला उपाय आहे.
वृद्धावस्था, चिरकारी खोकला, अशक्तपणा वगैरे कारणांमुळे शस्त्रक्रिया शक्य नसेल तर हर्निया होणाऱ्या भित्तिभागाला आधार देईल असा चामड्याचा किंवा रबराचा पट्टा वापरतात.
हर्निया होण्यापूर्वीच आपण काळजी घेतली तर अतिउत्तम.
1) फायबरयुक्त अन्न पदार्थांचे सेवन वाढवा.
2) तिखट मसालेदार पदार्थ ज्याने सतत जळती लागते ते टाळा.
3) जेवण झाल्यावर एकदम आडवे पडू नका किंवा बसू नका.
4) हर्निया टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे व्यायाम करा. आणि व्यायाम करताना क्षमतेपेक्षा व प्रशिक्षकाच्या गैरहजेरीत जास्त वेट ट्रेनिंग करणे टाळा.
===
हे ही वाचा – आजार होऊच नये म्हणून देण्यात येणारी लस कशी तयार केली जाते?
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.