' ग्लास ओठाला लावण्याआधी ‘चिअर्स’ का म्हणतात? वाचा त्यामागील भन्नाट इतिहास – InMarathi

ग्लास ओठाला लावण्याआधी ‘चिअर्स’ का म्हणतात? वाचा त्यामागील भन्नाट इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“पेग भर रे”, “मला ऑन द रॉक्स”, “माझ्या पेगमध्ये बर्फ नको”…. घर असो किंवा हॉटेल पार्टी भर रंगात आल्याचा पुरावा म्हणजे हे संवाद.

ग्लासात फेसाळणारी बिअर किंवा आवडती वाईन पाहताना कधी एकदा याचा घोट घेतोय असं वाटल्याशिवाय रहात नाही मात्र  प्रत्येकाच्या हाती आपआपला मनपसंत ग्लास आला की मग एक प्रथा पार पाडल्याशिवाय ग्लास काही ओठाला लागत नाही.

 

wine drinking inmarathi

 

ही प्रथा प्रत्येकाकडून अगदी आवर्जून पाळली जाते, ग्लासातील घोट घेण्यापुर्वी केली जाणा-या या कृतीने आपल्या डोक्यात इतकं पक्कं स्थान निर्माण केलं आहे की दारुला स्पर्शही न करता पार्टीमध्ये केवळ कोल्ड्रिंक्सवर आपली तहान भागवणारेही खुशीने या कृतीत सामील होतात. मग बच्चेकंपनी आणि ज्येष्ठ नागरिकही गंमत म्हणून ही पोझ घेतात.

मात्र आपण जी प्रथा नित्यनियमाने पाळत आहोत, ज्या नियमाकडे गांभिर्याने बघत आहोत, तो नियम नेमका आला कुठून हे तुम्हाला ठाऊक आहे का?

नेमका कोणता नियम अशी शंका असेल तर काही दिवसांपुर्वीच एन्जॉय केलेल्या पार्टीचे फोटो बघा. आपला ग्लास इतरांच्या ग्लासांवर टेकवून हस-या चेह-याने ‘चिअर्स’ म्हणतानाचा फोटो तुम्हाला नक्कीच सापडेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आठवलं का? तर ही चिअर्स म्हणणाची सवय इतकी अंगवळणी पडलीय की आपल्याही नकळत ही क्रिया आपण पार पाडतो. मात्र यावेळी या पद्धतीमागचा इतिहास, त्याची कारणं याबाबत आपल्याला फारशी माहितीच नसते.

 

wine inmarathi

 

वरकरणी केवळ पाश्चात्यांच एक अनुकरण किंवा नकळत जडलेली सवय एवढ्यापुरताच हा विषय वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र या कृतीमागे अनेक अशी कारणं दडली आहेत ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

जाणून घेऊयात चिअर्सबाबतच्या काही अजब गजब आख्यायिकांबद्दल…

फ्रेंच लेखक ‘एलेक्जेंडर डुमास’ यांच्या पुस्तकात याबाबतची एक कथा सापडते. 

पुर्वी जगभरातील खलाशी प्रवास करताना एखाद्या ठिकाणी एकत्र जमायचे. यावेळी दारु हा त्यांच्या भेटीतील मुख्य घटक असायचा. संध्याकाळच्या वेळी दारु पित गप्पांचा फड रंगायचा मात्र या भेटीला एक प्रकारची अविश्वासाची किनार होती.

दुसऱ्या गटातील प्रवासी कधी दगाफटका करतील याचा अंदाज नसल्याने त्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. याच अविश्वासातून चिअर्सचा जन्म झाला.

हे सर्व खलाशी मातीच्या भांड्यातून दारु प्यायचे, मात्र पार्टी रंगण्यापुर्वी ते ग्लास एकमेकांवर आदळायचे. या प्रक्रियेत एकमेकांच्या ग्लासातील थोडीतरी दारु समोरील व्यक्तीच्या ग्लासात सांडली जायची. यामुळे दुस-या गटातील खलाशाने आपल्या दारुत काही मिसळले तर नाही ना? याची खात्री पटायची.

 

cheers history inmarathi

 

हे ही वाचा – अबब! चक्क 1BHK किंमतीची आहे दारुची बाटली! जगातील महागड्या दारुंचे १० प्रकार!

अनेकदा आपल्या ग्लासात जरी विष मिसळलं गेलं असेल तरी दुस-याच्या ग्लासात आपली दारु सांडण्याची खेळीही या प्रक्रियेत खेळली जायची.

हा विश्वास मिळवण्यासाठी ‘चिअर्स’ (आत्ताच्या काळातील) ही क्रिया केली जायची.

भुताखेतांना पळवून लावण्यासाठी…

वाचायला विचित्र बाब वाटत असली तरी हा खरा समज होता. मध्ययुगात अनेक युरोपियन देशांमधील लोकांची ही धारणा होती. हातात दारुचा ग्लास घेऊन, चिअर्स करताना मोठ्या आवाजात हा “चिअर्स” असं ओरडलं जायचं. अनेकांच्या आवाजामुळे होणाऱ्या कर्कश्य आवाजाने भुताखेतांना पळवून लावता येईल हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

चिअर्स करताना अनेकदा आपल्या ग्लासातील थोडी दारु जाणीवपुर्वक जमिनीवर सांडली जायची. याबाबत जर्मन नागरिकांचा असा समज होता की असं केल्याने वाईट शक्ती, भुतं ही आपल्याला सोडून निघून जातील.

या समजुतीपायी पार्टी किंवा शुभकार्यात आवर्जून चिअर्स केलं जायचं.

संवेदना जागवण्यासाठी 

 

people doing party inmarathi

 

‘ड्रिंकींग’ अर्थात कोणत्याही प्रकारचं पेय पिणं या क्रियेत आपल्या सर्व संवेदनांचा समावेश होतो. यामध्ये डोळ्यांनी द्रव पाहिलं जातं, नाकाने त्याचा वास घेतला जातो, जीभेने त्याची चव चाखली जाते, हाताच्या बोटाने त्याला स्पर्श केला जातो. मात्र यामध्ये श्रवण ही संवेदना मात्र मागे पडते. म्हणूनच हाती ग्लास घेत जेंव्हा आनंदाने चिअर्स असं म्हटलं जातं तेंव्हा कानांव्दारे आपला हा आनंद ह्रदयापर्यंत पोहोचतो.

देवाचे आभार मानण्यासाठी

भारतात आजही अनेक ठिकाणी दारु पिणं ही बाब निषिद्ध मानली जाते, त्यातच एखादा सण, लग्न समारंभ अशा प्रसंगी तर दारुला स्पर्शही न करण्याची मोठ्यांची सक्ती असते. ख्रिचनधर्मीय मात्र याला अपवाद ठरतात.

मात्र परदेशात पुर्वीपासूनच याबाबत पुरोगामी विचारांचं पालन केलं जायचं. परदेशात लग्न, वाढदिवस, मुलाचा जन्म, कामात मिळालेली बढती अशा आनंदाच्या प्रसंगी हमखास ड्रिंक्स घेऊन पार्टी केली जायची. यामध्ये पार्टीच्या यजमानांकडून पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅन्ड्स आणले जायचे.

 

cheers inmarathi

 

अशावेळी कुटुंबिय, मित्र यांसह कोणताही आनंदाचा क्षण साजरा करताना सुरवातीला चिअर्स म्हणत देवाचे आभार मानण्याची पद्धत होती. हा क्षण आम्हाला तुझ्या आशिर्वादामुळे मिळाला अशी कृतज्ञतेची भावना दाखवण्यासाठी हातातील ग्लास वर धरत मोठ्याने प्रार्थना केली जायची. यालाच टोस्ट असंही म्हणतात.

शुभेच्छा देण्यासाठी

टोस्ट करणं ही प्रथा भारतात हल्लीच रुजू लागली आहे. मात्र परदेशात ही प्रथा वर्षीनुवर्ष पाळली जाते. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणेे देवाचे आभार मानले जातातच मात्र त्यासह ज्या आनंदासाठी पार्टी साजरी केली जात आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठीही ही प्रथा केली जाते.

यामध्ये यजमानांना शुभेच्छा देत टोस्ट करताना सर्वांकडून आनंदाचं कारण उच्चारलं जातं. यामुळे एकत्रित येऊन तो आनंद ख-याअर्थाने साजरा केला जायचा.

टोस्टबाबतची अशीही कथा…

क्विन एलिझाबेथच्या काळात वाईनची चव आजच्याइतकी चांगली नव्हती. मात्र त्यावेळी पार्टीत वाईन पिणं हे स्टेटस सिम्बॉल तसेच राजकीय शिष्टाचार मानला जात असल्याने प्रत्येकाला वाईन प्यावीच लागायची. अशावेळी वाईन सोबत टोस्ट खाल्ला जायचा. तेंव्हापासून ‘टोस्ट वाईन’ ही संकल्पना रुढ झाली असाही समज आहे,

थोडक्यात काय, तर कोणताही आनंद साजरा करण्यापुर्वी सर्वांनी एकत्र यावं, त्या आनंदासाठी दिलेल्या पार्टीच्या यजमानांचे आभार मानावेत आणि मग एकत्रितपणे त्या पेयाचा, भोजनाचा आनंद घ्यावा ही एक समान भावना सगळ्यांमध्ये दिसून येते.

आज भारतासह परदेशात कुठेही गेलात, हातातील पेय कोणतंही असो तरी चिअर्स म्हटल्याखेरीज तुमची पार्टी रंगणार नाही, आता तर यामागील अनेक कथा, आख्यायिकाही तुम्हाला समजल्या आहेत, त्यामुळे आता पार्टीच्या सुरवातीला चिअर्स करताना इतरांनाही ही कारणं सांगायला विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – या कारणामुळे तुमच्या शरीरातच दारु तयार होऊ शकते! जाणून घ्या काय आहे हा दुर्मिळ प्रकार?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?