Site icon InMarathi

या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“साहब, हमको बचाओ, हमारे साथ रेप हुआ है”, ती ओरडून ओरडून सांगत होती, फक्त शरीरावरच नव्हे तर मनावर झालेली एक एक जखम तिच्या डोळ्यातून अश्रूंद्वारे बाहेर पडत असते, तीच सगळं बेचिराख झालेल असत, तरीही ती सांगत असते झुकलेल्या डोळ्यांनी!

मान खाली घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली, मनात आशा ठेवून कि “एक ना एक दिन उसे जरूर सजा मिलेगी”, पण खरंच येतो का हो लगेच तो “एक दिन”, तोपर्यंत त्या मुलीच्या अब्रूचे धिंडवडे किती ठिकाणी काढले जातात, तिला कशा कशातून जावं लागत, हे एक स्त्री किंवा मुलगीच समजू शकते!

हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशी एक भयंकर, अमानवी घटना ज्यामुळे तुम्ही अन्तर्बाह्य हादरून जाल!

हि कहाणी आहे Ted Bundy नावाच्या एका सिरीयल किलर आणि रेपिस्टची ज्याने पूर्ण अमेरिकेची झोप उडवली होती. याची कर्मचं अशी होती, कि ह्याला माणूस म्हणावं का हाही एक प्रश्नच आहे.

 

 

कागदावरची आकडेवारी बघितली तरी अंगावर काटा येतो, याने तब्बल ३० महिलांचा खून करून त्यांच्या प्रेतावर बलात्कार केला होता, त्यांची शरीरे डिकंपोस होईपर्यंत!

नीट बघा, आधी खून आणि मग प्रेतावर बलात्कार, विकृतीलाही किळस यावी असा हा प्रकार, स्त्री म्हणजे त्याच्यासाठी वापरण्याची गोष्ट होती. ज्यांना तो आधी ठार मारायचा, आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा.

===

हे ही वाचा बेमालुमपणे हत्या करणा-या या चर्चच्या प्रेसिडेंटची कथा भयपटाहूनही थरारक आहे!

===

३० हा आकडा फक्त कागदावर होता, असं म्हणतात कमीत कमी १०० स्त्रिया या नराधमाच्या कृत्यांना बळी पडल्या होत्या ज्यांची काहीच माहिती पोलिसांना शेवटपर्यंत मिळाली नाही, खरंच हा एक “womanizing satan” होता माणसाच्या रूपात आलेला.

जगप्रसिद्ध लेखक Joe Hill एकदा Ted बद्दल बोलताना सहज बोलून गेला, “Maybe all the schemes of the devil were nothing compared to what Ted can think of”!

अमेरिकेतील oregano, Colorado, Utah आणि Florida या राज्यांमध्ये या नराधमाने आपली कुकर्म केली होती (तपासात उगढ झालेली), अजून कितीतरी असतील जी उघडकीस आली नाही.

 

 

एक दोन वर्ष नव्हे, तर तब्बल ४ वर्षे म्हणजेच १९७४ ते १९७८, हा नराधम आपली वासना शमवत होता, शमवत कसली, जिवंत राहिला असता तर अजूनही शमली नसती.

प्रत्येक अपराधामागे एक कारण असतं असं म्हणतात, टेडच पण असंच काहीसं होतं. बहुतांश रिपोर्ट्स असं सांगतात कि टेड त्याच मुलींना आणि स्त्रियांना आपली शिकार करायचा, ज्या त्याचा तथाकथित कॉलेजे प्रेयसी सारख्या दिसायच्या, जिने त्याला अक्षरशः झिडकारलं!

अशा मानसिकतेचं विश्लेषण अजूनही मानसोपचारतज्ञ करू शकलेले नाहीत! तो स्त्रीचा किंवा मुलीचा खून करायचा, मग त्यांचं प्रेत जंगलात कुठेतरी टाकून द्यायचा, आणि परत त्या ठिकाणी नंतर जाऊन त्यांच्या प्रेतावर बलात्कार करायचा!

पण इतक्यावर थांबेल तो टेड कसला, नंतर या प्रेतांचे फोटो काढायचा, त्याने ज्या मुलींना व स्त्रियांना मारले त्यातल्या तब्बल १२ जणींची डोकी याने कापून स्वतःकडे सांभाळून ठेवली होती!

===

हे ही वाचा रक्ताचं स्नान, तारुण्याचा ध्यास… इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर!

===

मग प्रश्न असा पडतो कि इतके गुन्हे करून देखील पोलिस त्याला का पकडू शकले नाहीत, कारण बहुतेक ठिकाणी टेड किंवा त्यांची कारसुद्धा दिसली होती.

पण तो इतका सालस दिसायचा कि त्याच्यावर संशय कुणी घेऊच शकले नाही, कारण प्रख्यात मर्डर डीटेक्टिव्ह मिचेल वूड म्हणतात, “a devil should look like a devil”, पण हा त्याला अपवाद होता.

त्याचे दिसणे हीच त्याची जमेची बाजू होती, स्त्रियांशी वागण्याची त्याची पद्धत अशी होती कि नकळत त्याच्या जाळ्यात अडकल्या जायच्या व त्याच्या शिकार व्हायच्या.

 

 

१९७७ साली टेड वर अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला व त्याला अटक झाली पण ७ जून १९७७ साली तो पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याच्या दुर्देवाने पोलिसांच्या ताब्यात सापडला!

पण परत १३ डिसेंबर १९७७ साली पळून गेला, तोपर्यंत तो चोरीच्या गाड्यांमधे प्रवास करत होता, आणि त्याचे अपराध सुरूच होते.

पण म्हणतात ना “crime never pays”, अनेक स्त्रियांच्या मृत्यूची चोकशी याच काळात FBI तर्फे सुरु होती, आणि टेड Salt Lake City मध्ये एका पोलिसाला संशयास्पद स्थितित सापडला, मग कालचक्र उलटे सुरु झाले!

टेडच्या घराच्या झाडाझडतीत हळूहळू एक एक भयानक गोष्ट समोर येत गेली, मर्डरसाठी वापरलेली हत्यारं, दोऱ्या, ग्लोव्हज, रक्ताचे डाग असलेली बेडशीट, सगळ्याचा छडा लागत गेला आणि या नराधमाचा पर्दाफाश झाला!

जे काही समोर आलं ते अकल्पीत होतं तितकंच भयानकही, हळूहळू सगळे पुरावे सापडत गेले, शेवटी १५ फेब्रुवारी १९७८ साली त्याला अटक करण्यात आली.

पुढे ही केस जवळपास १० वर्षे चालली आणि २४ जानेवारी १९८९ साली या नराधमाला फ्लोरिडा मध्ये “इलेक्ट्रिक चेअर’च्या साहाय्याने मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली व समस्त स्त्रीवर्गाने सुटकेचा निश्वास टाकला!

 

 

याला विकृतीही म्हणू शकत नाही इतके भयानक कृत्य त्याने केले होते, अनेक आयुष्य संपली, अनेक घरं उध्वस्त झाली, एवढं करून त्याला काय मिळालं, तर फक्त “न शमलेली वासना”!

आपल्याकडेही स्त्रियांवर कमी अत्याचार होत नाहीत, पण आपल्याकडे अशा घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोनच इतका भयानक आहे, कि ज्या मुलीवर अत्याचार होतात, तिला आणि तिच्या कुटुंबियांना ज्या ज्या यातना पुढे होतात त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही!

आपल्याकडे बलात्कार पीडित स्त्रियांची कथा हिंदी स्त्रीवादी कवियत्री आशना ने खूप मोजक्या पण अतिशय बोचऱ्या शब्दात मांडली आहे, ती म्हणते,

“गल्ती उसकीही होगी
बेवक्त वो घरसे निकली होगी,
या शायद तंग कपडे पेहने होंगे,
क्या मालूम शायद लडको से भी मिलती होगी,
और ना जाने क्या करती होगी, जिसका अंजाम मिल उसको,

खैर, हमे क्या करना है,
हम पे थोडी ये गुजरा है,
अरे मियाँ , चॅनेल तो बदलो ,
ये न्यूज ने सुबह से बोर कर दिया है”

 

 

अमेरिका असो किंवा भारत, स्त्रियांचा बाबतीत समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही, अशा नराधमांसाठी काहीतरी अशी शिक्षा द्यायला हवी की बस रे बस, तोपर्यंत किती Ted Bundy तयार होतील सांगता येत नाही, रात्र वैऱ्याची आहे हे नक्की!

===

हे ही वाचा आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version