आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जर तुम्ही सामान्य भारतीय असाल तर तुमचा जवळपास १२ तासाचा वेळ हा बसून घालवण्यात जातो. मग ती ऑफिसची कामं असोत, प्रवास असो, किंवा फिल्म आणि इतर मनोरंजनाची वेळ… हे सगळंच ग्राह्य धरलं, तर एकूण १२ तासांचा हिशोब लावता येईल.
पूर्ण दिवसातला अर्धा वेळ जर बसूनच घालवला असेल, भलेही त्यात तुम्ही तुमची इतर कामं करत असलात तरी बसल्यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे अर्थातच शरीराच्या इतर भागावर त्याचा ताण येतो.
मान, कंबर, खांदे, मणका इत्यादी अवयवांवर याचा काय परिणाम होतो, ते वेगळं सांगायला नकोच. तुम्ही आयटी प्रोफेशनलिस्ट असाल, तर हे सगळं तुम्हाला माहित असेलच.
याच्यामुळे घडतं असं, की शरीराचं संतुलन बिघडतं. अति कामामुळे थकवा येतो आणि झोपण्यासाठी आडवे झाले असताना काही ठराविक भाग जड झाल्याचे जाणवतं. ज्यामुळे लवकर झोप लागत नाही.
सतत बसून बसून राहिल्यामुळे शरीराचे काही स्नायू अखडल्यासारखे होऊन जातात. परिणामी शरीर जड झाल्याचे जाणवते. ऑफिसमधली बसण्याची पद्धत, सतत एकाच जागी बसणं, कार चालवतानाची पोझिशन यावरून एक साधारण अंदाज आपण लावू शकतो.
या त्रासातून मुक्ती व्हावी आणि शांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!
आता तुम्ही म्हणाल व्यायाम तर सकाळी उठून करायचा असतो. झोपेच्या आधी व्यायाम करून काय फायदा होणार…?
झोपेच्या आधी थोडाफार व्यायाम केला, की तुमचे जड झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे जड झालेले अंग तुमच्या झोपेतही मोकळे होण्याचे काम होत असते.
–
हे ही वाचा – झोप येत नाहीये? या आणि इतर ७ त्रासांवर आयुर्वेदातला हा “खास” उपाय करून बघा!
–
झोपेच्या वेळी आपल्या शरीराच्या आतील क्रिया या सक्षमरित्या कार्य करून रक्ताभिसरण संस्था ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे इंटर्नल हिलींग सोयीस्कररित्या घडतं. यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत होत असते.
तर बघूया असेच काही व्यायाम ज्यामुळे रात्री शांत झोपण्यास मदत मिळेल.
१. गुडघे ते छाती स्ट्रेचिंग
हातांनी गुडघे छातीपर्यंत आणून काही सेकंद स्ट्रेच करून ठेवून शरीराला मिळणारा ताण सहन करा. पाय मोकळे सोडल्यानंतर मिळणारा आराम तुमच्या पूर्ण शरीरासाठी उपयोगी ठरतो.
या क्रियेमुळे तुमच्या पाठीच्या कण्याला सर्वाधिक आराम मिळतो. एकामागोमाग एक दोन्ही गुडघ्यांनी ही क्रिया तुम्ही करू शकता.
२. साईड स्ट्रेच
डावा हात वर करून कंबरेतून उजवीकडे झुकणे आणि नंतर उजवा हात वर करून डावीकडे कंबरेतून झुकणे ही क्रिया तुम्हाला माहीतच असेल.
कंबरेपासून खांद्यापर्यंत ताण इथे तुम्ही अनुभवू शकता. काही सेकंदासाठी झुकलेल्या पोझिशनमध्ये राहून तुम्हाला आराम मिळू शकतो.
या व्यायामामुळे तुमच्या पाठीच्या मणक्यासोबत खांदा आणि हात सुद्धा मोकळे होऊन तुम्हाला आराम मिळू शकतो.
३. लंज (Lunge)
कंबरेवर हात ठेवून एक गुडघा जमिनीवर टेकवून दुसरा पाय पुढे आणणे. काही सेकंद या स्थितीमध्ये राहून दुसऱ्या पायानेही हीच स्थिती घ्यावी.
आपली पाठ सरळ राहील आणि छाती बाहेर असेल याची काळजी घ्यायला घ्यावी. या व्यायामामुळे हॅमस्ट्रिंगवर आलेला अतिरिक्त ताण दूर होतो.
४. बटरफ्लाय पोझिशन
जमिनीवर बसून पायांच्या टाचा एकमेकांना जुळवून पायाचा पंजा दोन्ही हातांनी धरून ठेवणे. काही वेळ या पोझिशनमध्ये बसून शरीरावर ताण पडू द्या.
यामुळे तुमच्या मांड्या, पायाच्या पोटऱ्या यांवर ताण येतो. त्यामुळे या भागातील स्नायू मोकळे होण्यास मदत होते. शिवाय कंबरेखालच्या भागाला सुद्धा यामुळे आराम मिळतो.
५. भुजंगासन
पोटावर झोपून, हात छातीजवळ टेकून, पोटापर्यंत शरीर मागे उचलणे, मान वर उचलून मागपर्यंत घेणे ही कृती. काही वेळ या स्थितीमध्ये राहून पाठ आणि पोट यावर येणारा ताण अनुभवणे.
यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठदुखी वा पाठीच्या कण्याच्या गैर हालचालीवर उपचारात्मक उपयोग होतो.
६. बालासन (Childs pose)
पाय गुडघ्यात दुमडून पायांच्या टाचावर बसायचं आणि नंतर छाती गुडघ्यांना टेकवून डोकं जमिनीवर टेकवायचं. हात पुढे सरळ सोडून द्यावे. काही वेळ या स्थितीमध्ये राहून शरीरावर ताण पडू द्यावा.
यामुळे तुमच्या पाठीला, मानेला आणि खांद्याला आराम मिळतो.
७. सर्वांगासन
पाठीवर झोपून कंबरेच्या वर शरीर उचलून कंबरेला हाताने आधार द्यावा आणि शरीर जेवढं वर करता येईल, तेवढं करावं. असं करताना हनुवटी छातीला टेकवून ठेवावी.
नावाप्रमाणेच या आसनामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवावर उत्तम परिणाम होतो. पाठ, मान, मणका, कंबर, मांड्या आणि पाय यांना आराम मिळतो.
शिवाय शरीराच्या आतील अवयवांना सुद्धा याचा आराम मिळतो. एकाच जागेवर बसून करता येणाऱ्या व्यायाम/योगसनांमुळे अखडलेले, जड झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
शिवाय रक्ताभिसरण संस्था स्वस्थ राहून शरीराला आराम मिळतो ज्याचा थेट फायदा आपल्या झोपेसाठी होतो.
झोपेच्या आधी यापैकी काही व्यायाम करून तुम्ही चांगली आणि शांत झोप नक्कीच मिळवू शकता.
===
हे ही वाचा – झोपेचं खोबरं झालंय? वाचा, फक्त काही सेकंदात शांत झोपी जाण्याचा उत्तम उपाय!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.