मी ‘बिग बॉस’ फॅन आहे, मात्र काल जे काही घडलं ते अत्यंत हीन होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखिका – सानिका कुसूरकर
===
कोणत्याही चर्चेत जसे दोन गट आपोआप विभागले जातात तसाच नेहमी ऐकू येणारा वाद म्हणजे बीग बॉस!
बिग बॉस हा शो चांगला की वाईट यापेक्षाही बीग बॉस पाहणारे आणि या शो वर मनसोक्त टिका करणारे हे दोन गट पाहिले नाहीत असा माणूस सापडणं कठीणंच.
मी यापैकी पहिल्या गटातली. सततच्या कंटाळवाण्या रटाळ मालिका पाहण्यापेक्षा मनोरंजन म्हणून बीग बॉसची निवड केली. इतरांच्या मताप्रमाणे त्यातील वायफळ गप्पा, चीड आणणारे वाद हे सहन केलं, वेळोवेळी ते एन्जॉयही केलं, मात्र काल जे काही पाहिलं, ऐकलं त्यानंतर मात्र सहनशक्तीचा अंत होणं म्हणजे काय याची जाणीव झाली.
अर्थात हा शो चांगला की वाईट? या वादात न पडता सध्या या शो मध्ये आयटम गर्ल राखी सावंत जो काही धुमाकूळ घालत आहे तो आता फक्त मनोरंजन उरला नसून प्रेक्षकांच्या कानांवर अत्याचार करणा-या राखीपुढे बिग बॉसही हतबल झाले आहेत का असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.
–
हे ही वाचा – सुंदरता वाढवण्यासाठी या १२ अभिनेत्रींनी केला हा ‘उपाय’, तर काहींच झालं हसं!
–
तर बिग बॉस सिझन १४ चा शेवटचा टप्पा सध्या सुरु असून येत्या रविवारी म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी शो च्या या सिझनचा ग्रॅड फिनाले रंगणार आहे. पाच महिने प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या या सिझनला आपला विजेता मिळणार असून अखेरिस बिग बॉसच्या सदस्यांची घरातून सुटका होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शो संपणार म्हणून प्रेक्षकांच्या संमिश्र भावना होत्या, मात्र कालच्या एपिसोडमध्ये राखी सावंतनी जी काही मुक्ताफळं उधळली त्यानंतर एकदाचा शो संपणार म्हणत प्रेक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
तर झालं असं की, कालच्या म्हणजेच १७ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये गायक राहुल वैद्य आणि राखी सावंत यांची चर्चा सुरु होती.
बिग बॉसच्या घरातील सगळी कामं ही त्या घरात राहणा-या सदस्यांना करावी लागतात, पर्यायी कामांची सवय नसणारे अनेक सेलिब्रिटी हे आपआपली नियोजित कामं करण्यापासून पळ काढतात. कामांकडे पाठ फिरवणा-यांच्या यादीत राखी सावंत हे अग्रगण्य नावं.
तर राहुल आणि राखीच्या चर्चेचा विषय होता, राखीचा कामचुकारपणा. मात्र वरकरणी साध्याभोळ्या दिसणा-या राखीने प्रामाणिकपणे आपला कामचुकारपणा मान्य करत बीग बॉसच्या पहिल्या सिझनमध्येही आपण एकही काम न केल्याचं मान्य केलं, यावर निर्लजपणे पहिल्या सिझनमध्ये आपण फक्त इतर सदस्यांची अंतर्वस्त्र धुतल्याचंही उघडपणे सांगितलं.
हे ऐकताच चपापलेल्या राहुल आणि निकी तंबोली या सदस्यांनी विषय आवरता घेण्याचा प्रयत्न केला मात्र राखीने आपलंच घोडं पुढे दामटवत ” मला इतरांची अंतर्वस्त्र धुण्याची फॅन्टसी आहे, त्यात लाज बाळगण्याचं काहीही कारण नाही” असं ठामपणे उच्चारत पुन्हा एकदा आपणी ‘राखी सावंत’ असल्याचं सिद्ध केलं.
या नंतर मात्र तिने उपस्थित केलेल्या मुद्द्याने समस्त भारतीय पुरुषांची तळपायाची आग मस्तकात गेली असणार हे नक्की.
राखीच्या मते ज्या भारतीय पुरुषांचं पोट सुटलेलं आहे अशा पुरुषांना जगायचा अधिकार नाही. पुरुषांनी कायम फीट असणं गरजेचं आहे.
राहुलने तिच्या या वक्तव्याला विरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र राखीने आपला पवित्रा कायम ठेवत अत्यंत लज्जास्पद उदाहरणं दिली.
कोणत्याही स्त्रिला जाडजुड किंवा पोट सुटलेला पुरुष आवडत नाहीत. स्त्री आणि पुरुषांच्या प्रेमसंबंधात पुरुषांचं सुटलेलं पोट मध्ये येत असल्याचाही जावईशोध लावणाऱ्या राखीला यावेळी शरीरसंबंध असं म्हणायचं होतं, मात्र असं थेट न उच्चारता तिने सुटक विधान केलं.
यावेळी शो चा माजी सदस्य राहुल महाजन याच्या शरीरावरही टिका करणा-या राखीला आपण ऑनकॅमेरा असल्याचंही भान उरलं नव्हतं.
वादग्रस्त वक्तव्यांसाठीच बिग बॉस प्रसिद्ध आहे यात शंका नाही मात्र केवळ प्रसिद्धीसाठी नॅशनल टेलिव्हिजनवर लाखो प्रेक्षकांसमोर अशा प्रकारांची लज्जास्पद वक्तव्य करणा-या राखीला प्रेक्षकांनी मतं देऊन पाठिंबा देणं म्हणजे तिला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
कितीही मनोरंजन केलं तर सुजाण प्रेक्षक आपल्याला विजेता बनवणार नाहीत हे राखीला ठाऊक आहे, मात्र केवळ याच कारणासाठी उरलीसुरली सगळी इज्जत बिग बॉसच्या घरात समर्पित करण्याचा हा बेत आखणा-या राखीला नेमकं म्हणावं काय हा प्रश्न पडलाय.
बिग बॉस मध्ये शक्य तेवढा सगळा मुर्खपणा करणा-या राखीला, बिग बॉसच्या घराबाहेरील जगात पुन्हा आल्यानंतर संकटांना, आरोपांना, वादांना तोंड द्यावं लागेल याची साधी चिंता नाही हा तिचा मुर्खपणा की बेफिकिरी?
एखाद्या पुरुषाने स्त्रिच्या शरिरावर प्रतिक्रिया दिल्यास त्याला विकृत म्हटंल जातं किंवा त्यावर बॉडिशेमिंगचा आरोप केला जातो. मात्र एखाद्या स्त्रीने एक, दोन नव्हे तर समस्त भारतीय पुरुषांच्या शरिरावर अश्लिल भाषेत टिका करणं, जाड पुरुषांना जगायचा अधिकार नाही असं विचित्र वक्तव्य करणं या कृतीबाबत राखीला कोणती शिक्षा होणार? हे राखी बिग बॉसच्या सुरक्षित घराबाहेर पडल्यानंतरच समजेल.
–
हे ही वाचा – ‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे!
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.