' तिने असं काय केलं की भारतात कोणत्याही महिलेला न झालेली शिक्षा तिला होतीये?! – InMarathi

तिने असं काय केलं की भारतात कोणत्याही महिलेला न झालेली शिक्षा तिला होतीये?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात स्त्री पुरुष समानता असली तरी अशी अनेक क्षेत्र आहेत, अनेक कायदे आहेत जे महिलांच्या संरक्षणार्थ बनवण्यात आले आहेत. मग ते महिलांना आरक्षण असो वा सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी राखीव जागा असो.

महिलांच्या संरक्षणार्थ अनेक कायदेही भारतात सज्ज आहेत. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे महिलांना फाशी न देणं. देशात पुरुषांना फाशी दिल्याच्या अनेक घटना असल्या तरी महिलांना मात्र ही शिक्षा झालेली नाही.

 

hanged-till-death-inmarathi

 

यामागे नेमकं काय कारण आहे? महिलांनाच वेगळी सूट की फाशी सारखी कठोर शिक्षा मिळेपर्यंत महिलांनी ठोस पावलंच उचलली नाहीत? याबाबत वेगवेगळी मतमतांतरं आहेत. मात्र या सगळ्याच वादाला छेद देत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महिलेला फाशी दिली जाणार आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘ती’ फासावर चढणार आहे. याचा बराच बोलबालाही सुुरु असला तरी ती नेमकी कोण आहे? असा कोणता गुन्हा तिने केला आहे की ज्यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ती पहिली महिला ठरणार आहे.

हे ही वाचा – ‘व्यभिचारासाठी’ म्हणजेच विवाहबाह्य संबंधांसाठी देशोदेशी दिल्या जातात ‘या’ कठोर शिक्षा

कोण आहे शबनम

अमरोहा गावात राहणाऱ्या शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच कुटुंबातील सात जणांची निर्घुण हत्या केली होती. यामध्ये तिचे आई, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासह आणखी तीन नातेवाईकांचा समावेेश होता.

 

shabnam inmarathi

 

शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांच्या नात्याला कुटुंबियांचा विरोध असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते.

 

shabnam family inmarathi

 

 

२००८ साली ही घटना घडली असून त्यानंतर पुढील काही वर्ष ते गाव हा धक्क्यातून सावरू शकलं नव्हतं. गावावर या घटनेचा इतका परिणाम झाला होता की त्यानंतर गावातील एकाही कुटुंबाने आपल्या घरात जन्माला येणा-या मुलीसाठी शबनम हे नाव ठेवलं जाणार नाही याची काळजी घेतली होती.

फाशीवर शिक्कामोर्तब

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने शबनम आणि सलीम यांना अटक केली. २००८ पासून हे दोघे कारागृहात खितपत असून अखेरिस सुप्रिम कोर्टाने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.

या शिक्षेनंतर शबनमने राष्ट्रपतींकडे अर्ज करत फाशी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र हा दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शबनम आणि सलीम या दोघांनाही फाशी होणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

 

saleem hang inmarathi

 

यापुर्वी देशात पुरुषांना अनेकदा फाशी दिली गेली असली तरी महिलेला फाशी देण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याने ही घटना सातत्याने चर्चेत येत आहे.

प्रथमच महिला फाशीगृहाचा दरवाजा उघडणार

महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा कारागृहात ब्रिटीशकाळात फाशीगृह बांधण्यात आले होते. १८७० मध्ये या फाशीगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या जागेचा वापर मात्र अद्याप एकदाही झालेला नाही. किंबहुना महिलांसाठी असे स्वतंत्र फाशीगृह आहे ही बाबच अनेकांना ठाऊक नाही. मात्र शबनम प्रकरणामुळे पहिल्यांदाच या महिला फाशीगृहाचा दरवाजा उघडणार आहे.

शबनमला याच जागेत फाशी दिली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने फाशीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

 

mathura jail inmarathi

 

महिलांसाठी केवळ फाशीगृहाचं नव्हे तर फाशी देण्याचं साहित्यही पुरुषांपेक्षा वेगळं आहे. बिहारच्या बक्सरमधून फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारा दोरखंड मागवण्यात आला आहे. सध्या फाशीगृहाचं निरिक्षण करण्याचं काम जल्लादतर्फे करण्यात येत असून प्राथमिक दुरुस्तीनंतर या जागेत शबनमला फाशी दिली जाणार आहे.

भारतात महिलेला फाशी देणा-या या पहिल्या घटनेबाबत सध्या समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या प्रतिक्रियांपलिकडे जात अशा प्रकारची गुन्ह्यांची मनोवृत्ती फाशीसारख्या शिक्षेने रोखली जाईल का हा देखील प्रश्न अनुत्तरीत आहे.

===

हे ही वाचा – रक्ताचं स्नान, तारुण्याचा ध्यास… इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?