Site icon InMarathi

मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर

WhatsApp Image 2021-02-17 at 15.49.02

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज स्टार्टअप्सचे वारे संपूर्ण देशभरात वाहत आहेत, नवनवीन व्यवसाय सुरु होत आहेत. त्यातच  त्याला डिजिटल प्लॅटफॉर्मची साथ मिळाल्याने त्याची यशोगाथा सर्वत्र व्हायरल होताना दिसून येते. त्यामुळे ते बघून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते.

आजच्या पिढीला किंवा आजच्या काळात लोंकाना काय हवंय ? ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे अनेकजण  व्यवसायात उतरत आहेत.

रोजचा कंटाळवाणा जॉब, १० ते ६  मध्ये आयुष्य अडकलं आहे’ ,तेच तेच काम करून कंटाळाला आलाय असे सर्वजण आणि ज्यांनी कॉलेज वयातच ठरवलेले असते की आपल्याला फक्त व्यवसाय  करायचा आहे असे लोक स्टार्टअप्स च्या शोधात धडपडत आहेत. असे लोक साहजिकच थोडा कामाचा, मार्केटचा अनुभव घेऊन व्यवसायात उतरतात.

व्यवसाय सुरु करणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर भांडवल ही संकल्पना सुद्धा मागे पडत आहेत. अगदी तुटपुंज्या भांडवलवरून लोक चकाचक ऑफिस घेण्यापर्यँत पोहचले आहेत.

एकीकडे बँकादेखील अशा स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. अशा ह्या स्टार्टअप्स मध्ये मराठी मुले कशी मागे पडतील. चहाच्या गाडीपासून ते अगदी मद्य निर्मीती पर्यंत मराठी माणूस कुठेही मागे पडत नाही.

 

हे ही वाचा – छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा

कोथरूडसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये पटवर्धन आडनावाचे दोन भावांनी चक्क घरगुती मद्य निर्मितीचाच व्यवसाय सुरु केला आहे. दोन्ही भावांनी इंजिनीरिंगचे शिक्षण घेतले, मद्य निर्मिती आणि इंजिनीरिंगचा तसा संबंध नसल्याने हा व्यवसाय सुरु करण्याचे कारण म्हणजे फक्त आवड.

दोघे भाऊ बराच काळ अमेरीका युरोपात राहिल्याने तिथे राहून त्यांना बिअर आवडायला लागली. तिकडे प्रामुख्याने घरगुती बिअर बनवली जाते व ती मोठ्या प्रमाणवर विकलीही जाते. हीच संकल्पना जर भारतात ते ही कोथरूड मध्ये चालू करावी असे त्यांना वाटले.

क्राफ्ट ब्रेविंग कल्चर :

साधारण साठ ते सत्तर च्या दशकात अमेरिकेत हे कल्चर उदयास आले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. बिअर निर्मितीसाठी लागणारे प्रमुख घटक शेतकऱ्यांकडून घेऊन ते अगदी तयार झालेली बिअर थेट पब्स मध्ये जाऊन विकणे, ह्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणवर एक रोजगाराची इको सिस्टिम तयार होते.

 

हे ही वाचा – ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

क्राफ्ट बिअर ही विशिष्ठ निवडलेल्या घटकांपासून बनवलेली असते. प्रामुख्याने जे बिअर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी छोट्या प्रमाणावर बनवलेली असते.

विशेष म्हणजे भारतातील अशा प्रकारच्या मद्य निर्मिती करून ते विकणारे ते पहिले भारतीय आहेत.

नावाची किमया कुठून आली?

‘किमया ब्रेविंग कंपनी’ अशा नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. प्रत्येक ब्रँडच्या नावामागे काहीतरी विशेष गोष्ट असते.

त्यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले की त्यांची आजी कोथरूड भागातील पहिली डॉक्टर. त्यांनी अनेक पेशंटना बरे केले होते म्हणून लोक त्यानं म्हणायचे कि “तुमच्या हातात किमया आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या क्लिनिकला ही’ किमया’ असे नाव दिले.

आजीची ही किमया पुढे नातवांनी आपल्या व्यवसायात आणली.

व्यवसायाची सुरवात मार्केटिंग फंडे :

कुठला व्यवसाय असो मार्केटिंग हवेच, कोणतेही हटके मार्केटिंग फंडे नं वापरता, साध्यासरळ सोप्या भाषेत त्यांनी मार्केटिंगला सुरवात केली. विक्रीसाठी त्यांनी फोकस फक्त ‘बार आणि रेस्टॉरंट्स’ वर न ठेवता, अनेक ठिकणी जे इव्हेंट्स होतात त्यावर ठेवला. इव्हेंट्समधून त्यांच्याकडे अनेक मदतीचे हात जोडले गेले.

सध्याची उत्पादने :

Munich Lager, Belgian Wit and Apple Cyder हे सध्याचे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत.तसेच आणखीन काही नवीन बिअर चे प्रकार लवकरच सुरु करणार आहेत.

परदेशी चव चाखण्यापेक्षा आपल्या लोंकाना आपल्या स्वदेशी चव देता यावी ह्यासाठी आंबा कोकम ह्या चवींमध्ये बिअर बनवायला सूरूवात केली.

आज व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत. चाकोरीबाहेरील व्यवसाय करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत. कोरोनसारख्या संकटातून हळूहळू सावरत व पुन्हा नव्याने उभे रहात आहेत. नव्या उद्योगांना जन्म देत आहेत.

 

 

दारूसारख्या व्यवसायामध्ये सहजासहजी सुखवस्तू कुटुंबातील मुले पडत नाहीत. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे, नात्यात व्यवहार करू नये अशा संकल्पना बाजूला सारून पुण्यातल्या कोथरुडसारख्या भागातील दोन भाऊ आज मद्य व्यवसायात स्वतःचा एक ब्रँड निर्माण करत आहेत.

त्यामुळे मद्यव्यवसायात देखील मराठी पाऊल पडत आहे ही नक्कीच वेगळी आणि अभिमानाची गोष्ट आहे.

===

हे ही वाचा – क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version