Site icon InMarathi

त्या काळी भूल न देता केलेलं लाईव्ह ऑपरेशन बघायला लोक तिकिटं काढायचे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“भूल थापांचं जग आहे, सतर्क रहा” हे आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. तुमच्या समोर एक आभासी वलय तयार करून त्याद्वारे आपला वेगळाच हेतू साध्य करणे हे बरेच लोक करत असतात.

व्यावहारिक जगात हे घडत असतं जेव्हा तुमची कोणती तरी फसवणूक होत असते. पण, ‘भूल’ या शब्दाचा प्रयोग विज्ञानात तुमचं काहीतरी भलं करण्यासाठी सुद्धा होत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या शरीरावर झालेली एखादी जखम जर तुम्हाला बरी करायची असेल तेव्हा तितक्या भागाला भूल दिली जाते आणि ती जखम बरी केली जाते. हे आपल्यापैकी कित्येकांनी अनुभवलं असेलच.

 

 

भूल देणं म्हणजेच तुम्हाला स्वतःची जाणीव विसरायला मदत करणे हे सोप्या शब्दात म्हणता येईल. काही लोकांमध्ये एक हौस असते, की “माझ्या शरीरावर जी शस्त्रक्रिया होत आहे ती मला माझ्या डोळ्यांनी बघायची आहे.”

काही तुरळक जखम सोडली तर आपण हे बघू शकत नाही असंच डॉक्टरच्या लक्षात आलं असावं आणि म्हणूनच ‘भूल’ म्हणजेच ‘अनेस्थेशीया’चा शोध लागला असेल.

तुम्ही अंग चोरून घेतल्यावर डॉक्टर तुमच्यावर उपचार करू शकत नाहीत हे यामागचं कारण असावं. ‘भूल देणे’ हा प्रकार कधीपासून आणि का सुरू झाला असेल? हे वैद्यकीय भाषेत सुद्धा जाणून घेऊयात.

१८४५ पर्यंत कोणतीही शस्त्रक्रिया ही भूल न देताच केली जायची अशी नोंद आहे. कोणतीही शस्त्रक्रिया करतांना तेव्हा डॉक्टरांमध्ये आणि रुग्णांमध्ये एक भीती असायची.

आज लेझर तंत्रज्ञान असल्याने बऱ्याच शस्त्रक्रिया या अगदी सहज होतात. लंडन मधील जॉन अबेंथी या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला जाणे म्हणजे ‘फासावर लटकायला जाणे’ असा उल्लेख केला हे. ते म्हणतात की “प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर मला एक तर रडू यायचं किंवा उलटी व्हायची, इतक्या त्या रुग्णांच्या वेदना बघणं असह्य व्हायचं.”

===

हे ही वाचा “वेदनारहित प्रसूती: चांगली की वाईट?” यातील फायदे- तोटे ठाऊक असणं गरजेचं आहे

===

एक काळ होता जेव्हा लोक शस्त्रक्रिया बघण्यासाठी तिकीट काढून जायचे हे वाचल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. लंडन मध्ये हे घडलेलं आहे. रॉबर्ट लिस्टन या सर्जनने केलेल्या शस्त्रक्रिया बघण्यासाठी लोक हजेरी लावायचे. ‘कमीत कमी वेळात आणि कमीत कमी वेदनेत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर’ म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध होतं.

 

 

शस्त्रक्रिया ही यशस्वी होऊ शकते आणि अयशस्वी सुद्धा होऊ शकते. १५० वर्षांपूर्वी शस्त्रक्रियेच्या निकालापेक्षा शस्त्रकियेच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांबद्दल लोक जास्त घाबरायचे.

रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तयार करणे किंवा तितका वेळ शांत बसवणे हे डॉक्टरांसमोर फार मोठं आव्हान असायचं. शस्त्रक्रिया करायची म्हंटली की, पूर्ण दवाखान्यात त्या रुग्णाचा आवाज असायचा.

कित्येक लोक शस्त्रक्रिया सुरू असताना दगावायचे. मनात एकदा शस्त्रक्रियेची भीती बसली की मग शरीरही तसंच व्यक्त होणार यात काही शंकाच नाहीये.

‘भूल देणं’ शक्य नसलेल्या त्या काळात हेच व्हायचं आणि सर्व डॉक्टरांची शस्त्रक्रिया म्हंटलं की, फार तारांबळ उडायची.

आजसारखे तेव्हा मोबाईल पण नसायचे की ज्यामध्ये लक्ष घातल्यावर रुग्णाचं थोडं लक्ष विचलित होईल आणि डॉक्टरला ते सहकार्य करतील. हे आजही होत नाही.

पण, निदान आता कोणतेही मोठे हॉस्पिटल हे आधी इतके भयावह वाटत नाहीत, तिथल्या भिंतीतून येणारा फिनेलचा वास हा आता येत नाही आणि त्यामुळे आता सिझेरियन डिलिव्हरी साठी लोक स्वतः दिवस, वेळ ठरवून हॉस्पिटल मध्ये जातात, राहतात.

आपल्या पूर्वजांपेक्षा आपण खूप सुखात आहोत याचं हे अजून एक प्रमाण म्हणता येईल. विलियम मॉर्टन या अमेरिकेतील दातांच्या डॉक्टरांनी ‘वेदना विरहित’ दातांवर शस्त्रक्रिया हे लोकांना द्यायचं ठरवलं आणि त्यांनी अनेस्थेशीया चा शोध लावला.

‘अनेस्थेसिस’ हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ An म्हणजे विरहित आणि aesthesis म्हणजे संवेदना असा होतो.

वैद्यकीय शाखेला विलियम मॉर्टन यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला होता. १६ ऑक्टोबर १८४६ रोजी विलियम मॉर्टन यांनी ‘भूल देण्याचं’ पहिलं प्रात्यक्षिक लोकांसमोर मॅसेच्युएट्स जनरल हॉस्पिटलमध्ये दिलं आणि ते यशस्वी झालं.

 

 

डाव्या जबड्यातील ट्युमर काढून टाकणे हे काम चीफ सर्जनने रुग्णाच्या कोणत्याही तक्रारीशिवाय करून दाखवलं. लोकांना, इतर डॉक्टरांना हे प्रत्यक्ष बघणे हे खूप आश्चर्यकारक होतं.

तेव्हा पासून ‘अनेस्थेशीया’ चा शोध लागला आणि त्याला आजही वैद्यकीय शाखेतील सर्वात चांगला शोध म्हणून संबोधलं जातं.

काही वर्षातच लागलेला क्लोरोफॉर्मचा शोध हा ‘भूल’ देण्याच्या प्रक्रियेला सोपं करणारा होता. जेम्स सिम्पसन यांनी हा शोध लावला होता. उग्र वास आणि घश्याला त्रास देणारं हे द्रव्य शरीरातील वेदनांना शमवणारं किंवा तसा भास करून देणारं आहे.

बेशुद्ध करणे म्हणजे क्लोरोफॉर्म रुमालावर लावून तो नाकाला लावणे हे आपण जुन्या हिंदी सिनेमात कित्येक वेळेस बघितलं आहे.

 

 

इंग्लंडमधून सुरुवात झालेल्या क्लोरोफॉर्मचा वापर जगभरातील सर्व डॉक्टर्स अनेस्थेशीयासाठी करू लागले. वैद्यकीय क्षेत्रात अनेस्थेशीयाचा वापर सर्वप्रथम जॉन स्नो यांनी केल्याची नोंद आहे.

जॉन स्नो यांनी जेव्हा व्हिक्टोरिया राणीच्या आठव्या मुलाच्या म्हणजेच प्रिन्स लिओपार्डच्या प्रसूतीच्या वेळी क्लोरोफॉर्म वापरून भूल देण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता.

त्यावेळेपासून अनेस्थेशीया हा प्रसूतीसाठी सुद्धा सुरक्षित आहे हा संदेश जगभरात पोहोचला. १९ वं शतक संपेपर्यंत ‘भूल देणे’ ही पद्धत सर्वच डॉक्टरांनी अवलंब करायची सुरुवात केली. कालांतराने, भूल देणारे वेगळे डॉक्टर्स म्हणजेच ‘अनेस्थेशीस्ट’ हे पद दवाखान्यांमध्ये असायला सुरुवात झाली.

अनेस्थेशीया हा सुरक्षित आहे हे सर्वांनी मान्य केल्यानंतर ‘सेवोफ्लूरेन आयसोफ्लूरेन’चा शोध लागला आणि क्लोरोफॉर्म चा वापर भूल देण्यासाठी बंद करण्यात आला.

‘इथर’चा होणारा वापर ज्वलनशील असल्याने कालांतराने बंद करण्यात आला. क्लोरोफॉर्म मुळे सुद्धा कित्येक लोकांना ‘कार्डियाक अरेस्ट’ म्हणजेच ‘हृदय बंद पडणे’ हा त्रास होत असल्याने त्यावर कायदेशीर रित्या बंदी घालण्यात आली.

सामान्य अनेस्थेशीयाचा वापर हा आता सगळीकडेच होतो आणि जवळपास ३ लाख लोकांपैकी १ व्यक्तीला त्याचा त्रास होतो अशी नोंद झाली आहे.

 

 

१७० वर्षांपासून वापरात येणारी ही पद्धत नेमकं शरीरात जाऊन काय करते आणि कशामुळे आपण बेशुद्ध होतो हे अजूनही एक गूढ आहे. एखादी व्यक्ती ही बेशुद्ध आहे की तसं असल्याचं भासवत आहे हे सुद्धा असंच एक गूढ कायम आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला अनेस्थेशीया हे मेंदूतील शिरांवर कार्य करते असा एक समज होता. पण, नंतर असं लक्षात आलं की, अनेस्थेशीया हे शरीरातील प्रोटिन्सची कार्य पद्धती बदलते हे नंतर समोर आलं आहे.

शुद्धीत असणे हे फक्त मेंदूचं कार्य आहे की इतर गोष्टी सुद्धा त्यासाठी आवश्यक आहेत हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा अनेस्थेशीया नेमकं कशावर ब्रेक लावतो हे समोर येईल. हे सर्व स्पष्ट करण्याची एखादी ‘थेअरीची’ आज सर्व वैज्ञानिक वाट बघत आहेत.

===

हे ही वाचा गोष्टी विसरणं म्हणजे ‘अल्झायमर’च नव्हे तर या ८ कारणांमुळे सुद्धा होतो स्मृतीभ्रंश, वेळीच सावध व्हा

===

अनेस्थेशीया देणाऱ्या प्रत्येक दवाखान्यात स्वच्छता असणे हे अत्यंत आवश्यक आहे. तसं नसेल तर त्याचे साईड इफेक्टस म्हणजेच इतर आजार होऊ शकतात असं काही अभ्यासात समोर आलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात असे कित्येक मुत्यु झाल्याची नोंद आहे जे की, अस्वच्छ वैद्यकीय अवजारांमुळे झाले होते. अलेक्झांडर फ्लेमिंग या डॉक्टरने पेन्सिलीनचा शोध लावला आणि त्यानंतर जगभरातील डॉक्टर्सना ‘वेदना विरहित’ शस्त्रक्रिया करण्यास अजून मदत झाली असं सांगितलं जातं.

 

 

कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायला कोणालाही गरज पडू नये असं म्हणतात. तुमच्याबद्दलही असंच होवो आणि तुम्हाला कोणत्याही अपघाताच्या किंवा भूल देण्याच्या सुद्धा वेदना होऊ नयेत हीच आमची सदिच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version