' हौसेला मोल नाही…एका मराठी माणसाने व्यवसायासाठी उचललं ‘असंही’ पाऊल! – InMarathi

हौसेला मोल नाही…एका मराठी माणसाने व्यवसायासाठी उचललं ‘असंही’ पाऊल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

व्यवसाय वृद्धीसाठी आजकाल प्रत्येक जण काही ना काही क्लुप्त्या करत असतो. मग अगदी अंबानी असो किंवा नुकताच सुरु झालेल्या एखाद्या ब्रँड ची franchise देणें असो ,आज येवले चहा महाराष्ट्राच्या शहरात अनेक ठिकाणो पोहचला गेला आहे. आजच्या डिजिटल युगात देखील आपल्या व्यसायाचे अनेक सोशल प्लँटफॉर्मवर प्रमोशन केले जाते.

व्यवसाय आला म्हणजे त्यासाठी फिरणे आलेच, कारण व्यवसाय फक्त एका ठिकाणी मर्यादित न राहत व्यवसाय वाढवण्यासाठी इतर शहरात किंवा परदेशात फिरून तिकडे व्यवसाय आपला सुरु करता येईल का ह्यासाठी व्यावसायिक फिरत असतातच.

 

helicopter inmarathi

हे ही वाचा – शेतकऱ्यांना ‘रडवणाऱ्या’ कांदा समस्येवर तरुणीने शोधला उपाय, मंत्र्यांनीही केलं कौतुक!

अनेक गुजराती व्यापारी कामासाठी पूर्वी कायम मुंबईत ट्रेन ने यायचे परंतु आता आता उत्तम हायवे व विमानसेवा असल्याने ते त्यामार्गे येणे पसंत करतात.

एकीकडे मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो ही बोंब सतत केली जाते, परंतु भिवंडी मधील एका व्यावसायिकाने व्यवसाय निमित्त फिरत यावे यासाठी चक्क गाडी वगरे न घेता थेट ‘हेलिकॉप्टर’ च विकत घेतले.

भिवंडी येथील व्यवसायिक जनार्दन भोईर यांचा दुग्ध व्यवसाय आहे त्या व्यवसाय निमित्त त्यांना अनेक ठिकाणी फिरावं लागते म्हणून त्यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत घेतले जेणेकरून त्यांना देशभरातील विविध ठिकणी जाऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत करता येईल.

सध्या देशाची परिस्थिती बघता वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या व्यवसायाला फटका बसला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘संपूर्ण भारतात व्यवसायासाठी फिरावे लागते. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा इथे प्रामुख्याने जावे लागते, त्यातच तिकडच्या काही ठिकाणी एअरपोर्ट नसल्याने रस्त्याने प्रवास करावा लागतो, ज्यात भरपूर वेळ जातो म्हणून या सर्वावर उपाय म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सल्ल्यावरून हेलिकॉप्टर विकत घेतले’.असे त्यांनी स्पष्ट केले.

 

jandaradan inmarathi

 

ट्रायल बेसिस साठी हेलिकॉप्टर रविवारी त्यांच्या गावात पाठवले होते, गावातील पंचायत सभासदांना त्यांनी हेलिकॉप्टर मधून फिरून सुद्धा आणले असे तिकडच्या लोकांनी सांगितले.

आज नुसती गाडी घ्यायची तरी पहिला मुद्दा येतो तो पार्किंगचा. आजकाल पार्किंग वरून सोसायट्यांना परवानग्या मिळतात. पण इथे त्यांनी हेलिकॉप्टरसाठी एक गॅरेज, पायलट रूम, आणि technician रूम सह अडीच एकरांवर संरक्षक भिंत असलेले हेलिपॅड बांधले आहे.

१५ मार्च रोजी हेलिकॉप्टर त्यांच्या ताफ्यात दाखल होईल,१०० कोटींचे आज ते मालक आहेत, डेअरी व्यवसायाबरोबरीने त्यांचा रिअल इस्टेट चा  व्यवसाय आहे.

काही दिवसांपूर्वी अंबानींच्या मुलीच्या लग्नात झालेला खर्चावरून अनेकांनी टीका केल्या मात्र हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पैसे कमवणे हा सर्वांचाच अधिकार आहे पैसे खर्च करणे हा सुद्धा प्रत्येकाचा विषय आहे.

===

हे ही वाचा – डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?