आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ज्या प्रमाणे प्रत्येक धर्मामध्ये मृत शरीरावर अंतिम संस्कार करण्याच्या प्रथा आहेत त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात मृत शरीराला जाळले जावे असे सांगण्यात येते, ज्यामुळे त्या शरीराला मोक्षप्राप्ती होते.
हिंदू धर्मात अग्नी हा पवित्र मानला गेल्याने देखील मृत शरीराचे अग्नीच्या सहाय्याने दहन करणे इष्टचं असे म्हटले जाते.
पण आज आम्ही तुम्हाला आपल्या भारतातील एक अश्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जेथे एखाद्या हिंदू धर्मीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यास अग्नी न देता जमिनीत दफन केले जाते.
काय? ऐकून चक्रावलात ना? चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
कानपूर शहरामध्ये हे स्मशान आहे. खरतरं याला स्मशान न म्हणता कब्रीस्तान असचं म्हटले जाते, कारण येथे थोड्या थोडक्या नाही तर अनेक वर्षांपासून हिंदू धर्मातील पारंपारिक प्रथेला बगल देत मृत शरीर दफन करण्याची पद्धत रूढ आहे.
ही प्रथा सुरु होण्यामागे देखील एक कारण आहे. १९३० साली स्वामी अच्युतानंद कानपूर मध्ये वास्त्यव्यास आले होते. एक दिवशी दलित कुटुंबातील एका लहान मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहण्यास ते गेले.
तेथे त्यांच्या निदर्शनास आले की अंतिम संस्कार करणारे पंडित मोठ्या दक्षिणेची मागणी करत आहेत. परंतु ते बिचारे दलित कुटुंब गरीब असल्याकारणाने पंडित मागतील तेवढी दक्षिणा देण्यास असमर्थ होते. या कारणामुळे त्यांच्या मुलाचे प्रेत अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत तसेच पडून होते.
ही असंवेदनशीलता पाहून स्वामी अच्युतानंद खूप व्यथित झाले. त्यांनी पंडितांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते.
शेवटी स्वामी अच्युतानंद यांनी स्वत:हून पुढाकार घेत कसेबसे त्या लहान प्रेतावर अंतिम संस्कार करून त्याचे शव गंगा नदीमध्ये सोडून दिले.
===
- पारसी लोकांच्या अंत्यसंस्कारांची ही वेगळीच पद्धत अनेकांना विचारात टाकते!
- स्मशानात सुरु केलेल्या चहाच्या टपरीचं आता एका हॉटेलात झालं रूपांतर===
झाल्या प्रकाराने बैचेन झालेल्या स्वामी अच्युतानंद यांनी इंग्रज प्रशासकांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा इंग्रज सरकारने गरिबांना आणि दलितांना स्मशानासाठी वेगळी जागा दिली. तेव्हापासून या स्मशानामध्ये प्रेताला अग्नी देण्याऐवजी ते जमिनीत पुरण्याची करण्याची प्रथा सुरु झाली, जी आजतागायत सुरु आहे.
जेव्हा स्वामी अच्युतानंद यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे शव देखील जाळण्याऐवजी याच स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आले.
कानपूर मध्ये अश्याप्रकारची ७ हून अधिक स्मशानं आहेत. जेथे हिंदू व्यक्तीला जाळलं न जाता पुरलं जातं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.