' सावधान : शुगर टेस्ट करताना या १२ चुका करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं – InMarathi

सावधान : शुगर टेस्ट करताना या १२ चुका करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मधुमेह अर्थात डायबेटिस हा अलिकडे जवळपास घराघरात पोहोचलेला आहे. अनेकांना नियमीतपणे शुगर तपासायला सांगितली जाते. काहीजण घरीच शुगर तपासतात. मात्र घरी शुगर तपासताना काय काळजी घ्यायला हवी? काय टाळायला हवं? याचा मात्र फारसा विचार केला जात नाही.

डायबेटिस असणार्‍यांना नियमीत शुगर तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. पूर्वीसारखं शुगर तपासायला सतत पॅथोलॉजी लॅबमधे जावं लागत नाही. शुगर तपासणी किटमुळे घरच्याघरी शुगर तपासणं सुलभ झालं आहे.

मात्र जर तुम्ही घरच्या घरीच शुगर तपासत असाल तर मात्र काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. काही गोष्टी टाळायला हव्यात.

 

diabetes inmarathi

 

मधुमेहाची योग्य ती काळजी घेतली तर या अनुषंगानं उद्दभवु शकणार्‍या समस्या टाळता येतात. शुगरचं नियंत्रण सुटलं तर किडनीपासून ह्रदविकारापर्यंत कोणतीही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच मधुमेहींनी ब्लड शुगर नियमीत तपासणं गरजेचं आहे.

तुमच्या आहार विहारात झालेले बदल आणि त्यावर नियंत्रणं कसं राखावं हे शुगर तपासणीमुळे कळतं.

ग्लुकोमिटर हे असं छोटसं साधन आहे ज्यानं या साखर तपासणीत क्रांतीकारक बदल केला. या छोट्याश्या गॅजेटमुळे घरच्या घरी शुगर तपासणं शक्य झालं आहे. ज्यांना रोजच्या धावपळीत लॅब मधे जाऊन शुगर तपासणं शक्य नाही, ज्यांना वार्ध्यक्यामुळं वारंवार बाहेर पडणं शक्य नाही अशांसाठी ग्लुकोमिटर वरदान ठरत आहे.

मात्र या ग्लुकोमिटरसोबत ते कसं वापरावं याची माहिती दिली जात असली तरी त्या व्यतिरिक्तही काही गोष्टींचं भान राखायला हवं.

१ – जेवणानंतर शुगर तपासणे

अनेकांना जेवणानंतर लगेचच शुगर तपासण्याची सवय असते. मात्र जेवणानंतर जर लगेचच शुगर तपासली तर ती नेहमी जास्त येते हे लक्षात घ्या.

 

diabetes featured inmarathi

 

यासाठी नाष्टा असो किंवा जेवण, त्यानंतर लगेचच शुगर तपासू नका. किमान दोन ते तीन तासाचं अंतर ठेवा.

२ – सुई कधी टोचावी ?

घरीच मशिन असल्याचा फ़ायदा घेत अनेकजण कधीही टेस्ट करतात. मात्र जर योग्य रिझल्ट हवा असेल तर दिवसाच्या काळात सुई टोचावी.

 

blood test inmarathi

 

दिवसाच का? तर दिवसाउजेडी आजूबाजूच्या पर्यावाणात अनेक बदल घडत असतात आणि त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. याचा परिणाम शुगरवरही होतो.

३ – वेळेचं भान ठेवा

कधीही उठून शुगर तपासली तर अचूक निदान तर होणार नाहीच शिवाय एक स्ट्रीप वाया जाईल.

साधारणपणे सकाळच्या नाष्ट्यानंतर काही तासांनी तसेच रात्री  झोपण्यापूर्वी शुगर तपासण्याच्या आदर्श वेळा आहेत असं सांगितलं जातं. मात्र घरात तपासणीला सुरवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून जाणून घ्या.

 

doctors featured

 

शुगर तपासणं हे केवळ एक रूटिन नसतं तर, तुमच्या आहार विहाराचा, औषधांचा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो आहे हे यातून समजण्यास मदत होत असते.

४- बोट कसं निवडाल ?

ज्यांना दिवसभरातून एकाहून जास्तवेळा शुगर तपासावी लागते अशांनी एकच बोट आणि यावरचा एकच पॉईंट सतत निवडू नये. यामुळे बोटाला इजा होण्याची शक्यता असते.

 

test inmarathi

 

याशिवाय शुगर तपासणीनंतर इतर कामं करताना या सुई टोचण्यामुळे तिथे हुळहुळून त्रास होतो. विशेषत: स्त्रियांना स्वयंपाक करताना, घरातली कामं करताना याचा खूप त्रास होतो. यासाठी सुई टोचताना वरचेवर बोट बदलत रहावं

५- बोटाच्या टोकावर सुई टोचा

साधारणपणे शुगर टेस्टसाठी बोटाच्या टोकावर सुई टोचण्याची सवय असते. याऐवजी दोन्ही हातांचे तळवे नमस्काराला जोडल्यासारखे करा आणि जिथे बोटांची कडा येते तिथे सुई टोचा.

 

finger tip inmarathi

 

बोटांच्या कडा साधारणपणे काम करताना वापरल्या जात नाहीत. यामुळे नंतर काम करताना त्रास होणार नाही.

६ – स्वच्छता महत्वाची

अनेकांना सवय असते की, हातांची स्वच्छता न करताच सुई टोचणं. ही सवय अत्यंत चुकीची आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी चाचणी करण्यापुर्वी हात स्वच्छ धुवून, कोरडे केल्यानंतरच चाचणी करावी.

 

washing-hands-inmarathi

 

तुमचे हात नुकतेच ज्याला कशाला स्पर्श करून आलेले असतील त्यावरचे जीवजंतू तुमच्या बोटावर उतरलेले असतात हे लक्षात घ्या किंवा समजा तुम्ही नुकतंच संत्रं खाल्लेलं आहे आणि लगेचच सुई टोचली तर त्यात संत्र्याचे अंशही येणार म्हणजे मग जे काही आकडे दिसतील त्यात संत्र्यातली शुगरही येणार.

७ – बोट कसं स्वच्छ कराल?

याबाबतीत केलेला एक अभ्यास असं सांगतो की, हात नीट न धुतलेल्यांचे रिझल्ट हे दहा टक्क्यांनी वेगळे येतात. यासाठी टेस्ट करण्यापूर्वी कोमट पाणी आणि साबणानं हात स्वच्छ धुवा आणि सुई टोचण्यापूर्वी ते स्वच्छ कापडानं कोरडे करा.

 

hand inmarathi

 

टेस्ट करताना बोटावर पाणी राहणार नाही याची काळजी घ्या.

८ – अल्कोहोल वापरू नका

 

 

sanitizers inmaarthi

 

अनेकांना सुई टोचण्यापूर्वी हात सॅनिटाईझ करण्याची सवय असते. सॅनिटायझरमधल्या अल्कोहोलचा परिणाम होऊ शकतो.

९- सुई न बदलणं

अनेकजण एकच सुई अनेकवेळ वापरतात. मीच तर वापरणार आहे सुई, त्यात काय? असा एक विचार यामागे असतो. मात्र याने संसर्गाच्या शक्यता वाढतात.

 

blood test

 

त्यामुळे एकच सुई वरचेवर वापरण्याची सवय घातक आहे. इथे काटकसर करत पैसे वाचविण्याची तुमची सवय तुमच्याच आरोग्यासाठी घातक आहे.

एकदा वापरल्यानंत ती सुई तोडून कचर्‍यात टाकून द्या. जेणेकरून नंतरही त्याचा इतर कोणी वापर करू शकणार नाही.

१०- सुई ची उंची

 

needles inmarathi

 

त्वचेच्या जाडीनुसार ती किती आतपर्यंत जायला हवी हे ठरतं. साधारणपणे ३-४ पर्यंत सुई सेटींग योग्य ठरतं.

११- नेहमी नव्या lancet वापरा.

 

test strips inmarathi

 

Test strip या नेहमी बंद डब्यात ठेवा, जेणेकरून कोणाचा स्पर्श होणार नाही किंवा त्यावर धूळ बसणार नाही. वापरापूर्वी स्ट्रिपची एक्सपायरी तारीख तपासायला विसरू नका.

१२ – डॉक्टरांचा सल्ला घ्या

अलिकडचे ग्लुकोमिटर पूर्वीपेक्षा अचूक निदान करणारे आहेत. मात्र अधून मधून manufacturer’s instruction वर नजर टाकत चला. रोजच्या वापरानंतर कधी कधी सराईतपणामुळे निष्काळजीपणा येण्याची शक्यता असते.

 

doctor inmarathi

 

जर आकड्यांबाबत काही शंका असेल तर लगेचच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्या.

मधुमेहींसाठी महत्वाची त्रिसुत्री

१. डायबेटिस असणार्‍यांनी नियमीत रक्त तपासणी करत रहाणं गरजेचं आहे.

२. शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी लो ग्लायसेमिक अन्नपदार्थांचं सेवन उपयुक्त ठरतं यामुळे आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुमचं डाएट निश्चित करून घ्या.

३. योग्य आहार विहार ही एरविही आरोग्याचि गुरूकिल्ली आहे. डायबेटिक लोकांनी याचं अगदी काटेकोर पालन केल्यास डायबेटिस नियंत्रणात रहाण्यास मदत होते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?