' चक्क विमान खाऊन ते पचवणाऱ्या अवलियाची अजब कहाणी वाचून तुम्ही चक्रावून जाल! – InMarathi

चक्क विमान खाऊन ते पचवणाऱ्या अवलियाची अजब कहाणी वाचून तुम्ही चक्रावून जाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणाला पंजाबी खाणं आवडतं, कोणाला, चायनिज, कोणाला मेक्सिकन तर कोणाला कॉण्टिनेण्टल. जगभरात जितक्या खाद्य संस्कृती तितक्या खाण्याच्या आवडी.

मात्र जगात एक व्यक्ती अशी होती जिला या सगळ्या खाद्यपदार्थासोबतच धातू आणि काच खायलाही आवडायचं. दचकलात नं? पण हे खरं आहे. याच जगात अशी व्यक्ती अस्तित्वात होती या व्यक्तीचं नाव आहे, मायकेल लोटिट्टो.

 

miachel lolitto inmarathi

 

जग हे चित्रविचित्र माणसांनी भरलेलं आहे आणि सायकल पासून विमानापर्यंत सगळं आवडीनं खाणार्‍या मायकेलचा क्रमांक या सगळ्यांत वरचा आहे.

त्याला असणार्‍या एका विचित्र रोगामुळे त्याला लागलेली खाण्याची विचित्र सवय आणि या सवयीमुळे त्याचं जाप्रसिध्द होणं सगळंच एखाद्या काल्पनिक गोष्टीत साजेसं. पण आपण कल्पनाही करू शकणार नाही असं आयुष्य तो जगला.

सुरवातीला जेव्हा त्याच्या या विचित्र आजाराची कल्पना त्याच्या कुटुंबियांना आली तेव्हा सामान्य आईवडिलांप्रमाणेच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली.

आपल्या मुलाला जगवायचं असेल, तर इथून पुढे आयुष्यभर त्याला चारचौघांसारखं खाऊ पिऊ न घालता काचा, खिळे, पत्रे खाऊ घालावे लागणार आहेत हे सत्य पचवणं लोखंड पचवण्यासारखंच कठीण होतं.

 

miachel lolitto 2 inmarathi

 

मात्र मायकेल आणि त्याच्या आई वडिलांनी वास्तव स्विकारून पुढे याच सवयीला त्याचं करियर बनवलं. तो एक नामवंत एंटरटेनर तर बनलाच शिवाय वर्ल्डबुकमध्येही त्याच्या नावाची नोंद झाली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुळात हे असं सगळं खाणं त्याला पचायचं कसं? त्याच्या आतड्याला काही इजा कशी व्हायची नाही? तर जेव्हा त्याच्या या आजाराची कल्पना डॉक्टरना आली, त्यांनी त्याची अगदी नीट तपासणी केली.

या तपासणीत असं आढळलं की, सामान्य माणसांपेक्षा मायकेलच्या आतड्याचं आतलं आवरण कठीण आणि जाड आहे. यामुळेच तो धातूच्या, काचेच्या गोष्टी काहीही इजा न होता खाऊही शकत होता आणि त्या पचवूही शकत होता.

===

हे ही वाचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले स्वतःचे ड्रॅगनमध्ये रुपांतर, काय आहे हा अजब प्रकार? वाचा

===

जगात अनेक व्यक्ती अशा आहेत, ज्यांच्या काही सवयी या सामान्यांपेक्षा निराळ्या असतात. त्या सवयी त्यांना जगात वेगळी ओळख देतात. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे मायकेल!

 

miachel 3 inmarathi

 

मायकेलची ही जगावेगळी आवड समजावून घ्यायच्या आधी त्याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. फ्रान्स येथील ग्रोनेबल गावात १९५० साली त्याचा जन्म झाला.

वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत इतर चार मुलांसारखच त्याचं आयुष्य होतं. मात्र त्यानंतर चित्र बदलत गेलं. या वयात त्याला एक विचित्र सवय जडली किंवा हळूहळू सवयीची होत गेली म्हणू. धातूच्या विविध वस्तू आणि काच खाण्याची सवय त्याला लागली.

आश्चर्य म्हणजे हे सगळं खाऊन तो पचवूही शकत होता. याची सुरवात अशी झाली, लहानपणी एकदा त्याच्या हातून ग्लास फुटला आणि त्याचे तुकडे सर्वत्र पसरले.

त्यानं त्यातला एक तुकडा उचलला आणि तो चघळायला सुरवात केली. घरातल्यांच्या निदर्शनाला जेव्हा ही गोष्ट आली तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर गाठला.

Gastroenterologists नी त्याची तपासणी केली आणि निदान केलं की, त्याला आतड्याचा एक दुर्मिळ रोग आहे, पिका. यामध्ये सामान्य खाद्य पदार्थ पचू शकत नाहीत मात्र चित्रविचित्र गोष्टी सहज पचतात.

एकप्रकारे बघायला गेलं तर ही त्याला दैवी शक्ती मिळालेली असून तो आपल्या आतड्यातून काहीही खाऊन पचवू शकतो. अत्यंत दुर्मिळ अशी देणगी त्याला लाभली आहे.

त्याच्या आतड्याची रचनाच अशी आहे की तो काहीही खाऊ शकतो आणि पचवू शकतो. यातूनच जन्म झाला त्याच्या अनोख्या करियरचा.

 

lolitto inmarathi

 

लोकांना आपल्या या सवयीचं खूपच आश्चर्य वाटतं आणि त्यांचा विश्र्वासही बसत नाही त्यामुळे त्यांच्या समोर एखादी गोष्ट खाल्ली तर त्यांना ते फारच रोमांचक वाटतं हे लक्षात आल्यावर १९६६ साली त्यांनी जाहिरपणे अशा विचित्र गोष्टी खाऊन लोकांचं मनोरंजन करण्यास सुरवात केली.

सुरवात त्यानं नखं आणि काचेच्या गोष्टी खाऊन केली. हळूहळू त्याची भूक वाढत जाऊन त्यानं इतर गोष्टीही खायला सुरवात केली. मायकेल जेव्हा इतर मुलांसारखा केळं, उकडलेली अंडी वगैरे खात असे ती त्याला पचत नसत.

या उलट तो जेव्हा काच, धातू खात असे ते सारं त्याला सहज पचत असे. आपण कसा चवीत बदल म्हणून वडा खातो, श्रीखंड पुरी खातो तसाच चवीत बदल मायकेललाही हवा होता.

छोट्या छोट्या गोष्टी खाऊन त्याचं पोट आणि मन भरेनासं झालं. आता त्याला काहीतरी मोठं खावसं वाटू लागलं होतं. त्यानं मग एक विमानच खायचं ठरवलं.

तुम्ही नाव घ्या, ती वस्तू तो खात असे. टीव्ही त्याला विशेष आवडत असत. मात्र त्याची जगभरात ओळख पसरली ती विमान खाणारा माणूस म्हणूनच.

===

हे ही वाचा चक्क “प्रायव्हेट पार्टचं” म्युझियम?! हे असं संग्रहालय असू शकतं असं स्वप्नातही वाटलं नसेल!

===

मायकेल धातू खायचा म्हणजे नेमका कसा खायचा? हे जाणून घेणंही मनोरंजक आहे. काहीही खाऊ शकतो म्हणून तो कसंही खात नसे. धातू खातानाही त्याला काळजी ही घ्यावीच लागते.

धातूच्या गोष्टींचे बारीक बारीक तुकडे करून ते खनिज तेलासोबत खाल्ले तर ते पचायला सोपे असतात. इतकंच नाही तर तो पेट्रोलही सहज पिऊन टाकत असे.

याचं कारण विचारलं आता पेट्रोलमुळे घसा ओला रहातो आणि धातूच्या चीजवस्तू पोटात जाणं सुखकर होतं असं त्यानं सांगितलं. खायला बसताना तो धातूचे तुकडे, तेल आणि पाणी सोबत ठेवत असे.

आपल्या हयातीत त्याने, १८ सायकल, सात टेलिव्हिजन सेट्स, १५ सुपरमार्केटमधल्या ट्रॉलीज, एखाद दोन कॉम्प्युटर, शवपेटी (हॅण्डलसहित) इतकंच नव्हे तर जेव्हा तो त्याच्या करियरच्या शिखरावर होता तेंव्हा त्यानं अख्खं विमान खाऊन दाखवून जगाला चकीत केलं होतं.

 

miachel featured inmarathi

 

१९७८ साली त्याचं नाव चर्चेत आलं कारण या वर्षी त्यानं एक अख्खं कॅसेना विमान खाण्यास सुरवात केली. लोकांसाठी ही आश्चर्याची परिसीमा होती. एकतर एखादी व्यक्ती विमान कसं काय खाऊ शकते? आणि खायचंच म्हणलं तर अख्खं विमान संपवायला किती काळ लागेल?

हे विमान संपूर्णपणे फस्त करायला त्याला दोन वर्षं लागली. १९५९ ते १९९७ या कालखंडात त्यांनी नऊ टन म्हणजेच ८१६४ किलो इतका धातू पचवला. त्यांच्या या जगावेगळ्या पचनशक्तीनं त्यांचं नाव गिनेज बुकमधे नोंदवलं गेलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?