माघार घेतल्यानंतर ३ महिन्यांतच चीनने केलं होतं भारतावर आक्रमण! रात्र वैऱ्याची आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनच्या लडाखजवळील सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. या तणावाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. काल म्हणजेच गुरुवारी या तणावावर पडदा पडलाय असं म्हणायला हरकत नाही.
भारत आणि चीनमध्ये करार झाला असून, त्यानुसार दोन्ही देशांनी आपले सैन्य सीमेवरून मागे घेतलं आहे. या घटनेमुळे तणावावर पडदा पडला असं म्हणायला वाव असला तरीही, १९५० मधील ‘हिंदी चिनी भाई भाई’ या घोषणेचं त्यानंतरच्या भविष्यकाळात काय झालं, हेसुद्धा भारतीय विसरलेलले नाहीत.
१९६२ साली जुलै महिन्यात चिनी सैन्याने अशीच माघार घेतली होती. त्यानंतर मात्र, ऑक्टोबर महिन्यात चीनने अचानक आक्रमण करून युद्ध्याला सुरुवात केली.
मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!
भारतीय सैन्य यावेळी गाफील राहणार नाही. चीनने युद्ध पुकारलं, तरीही त्यांना तोंड द्यायला भारतीय जवान सज्ज असतील.
१९६२ मध्ये नेमकं काय झालं?
१९६२ सालच्या १५ जुलैमधील एका पेपरात आलेल्या बातमीचा मथळा होता ‘CHINESE TROOPS WITHDRAW FROM GALWAN POST’… ‘भारतीय जवानांच्या धैर्याला यश आलं’, ‘दिल्लीच्या चेतावणीचा परिणाम झाला’ असा त्या बातमीचा आशय होता.
त्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. जुलै महिन्यात चीनच्या ३०० दलांनी भारताच्या गोरखा रेजिमेंटला वेढा घातला होता. मात्र त्यावेळी समेट घडवून आणली गेली आणि चीनच्या सैन्याने २०० मीटरपर्यंत माघार घेतली.
नाईक सुभेदार जंग बहादूर यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या गोरख रेजिमेंटची त्यानंतरच्या काळात वाहवा होत होती. मात्र ही माघार काही काळापुरतीच सीमित राहिली. ऑक्टोबर महिन्यात अचानक चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गलवान येथील गोरखा रेजिमेंट हटवून तिथे शीख अल्पा कंपनीला पाठवलं होतं.
२० आक्टोबर रोजी गलवान ठाण्यावर चीनकडून हल्ला करण्यात आला आणि ३६ भारतीय जवानांना ठार केलं. पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर हसबनीस यांना चिनी सैन्याने ताब्यात घेतलं. भारत-चीन युद्धाला सुरुवात झाली.
–
हे ही वाचा – पाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच!
–
युद्ध संपेपर्यंत म्हणजे जवळपास ७ महिने हसबनीस चीनच्या ताब्यात होते. या युद्धात भारताचा पराभव झाला. दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या चीनने खायचे दात दाखवले आणि माघार घेणं हा केवळ एक डाव होता हेच दाखवून दिलं.
सध्या परिस्थिती काय?
चीनचा कावेबाजपणा यावेळी भारत जाणून आहे. त्यामुळे पंतप्रधान नेहरूजींच्या काळात घडलेली चूक पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. भारताने गाफील राहू नये आणि सैन्याने शस्त्रसज्ज राहावे अशी आशा केली जात आहे.
योगायोगाचा भाग म्हणजे, हसबनीस यांचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल हसबनीस सध्या भारतीय सैन्याचे डेप्युटी आर्मी चीफ आहेत.
चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरीही इतिहास चांगलाच लक्षात ठेऊन, त्याची पुनुरावृत्ती होणार नाही यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे.
===
हे ही वाचा – “भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला…?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.