राममंदिर वर्गणी गोळा करतोय म्हणून बायकोचा जीव वाचवणाऱ्याच्याच पाठीत खंजीर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
देशात सध्या रामराज्य येणार असे वारे वाहू लागले आहेत, देशाचा सर्वात मोठा ऐतिहासिक निकाल म्हणजे राममंदिर होणार कि नाही? त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने देशातील अनेक राम भक्तांमध्ये चैत्यन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक वर्ष हा विषय वादग्रस्त होता त्यात १९९३ साली तिथे अस्तित्वात असलेल्या बाबरी मशिदीला काही लोकांनी पाडून त्यावर भगवा फडकवला त्यामुळे हा विषय आणखीनच चिघळला, त्यातच नुकतेच सवोच सर्वोच न्यायालयाने राम मंदिर बांधण्यासाठी समंती दिली.
‘मंदिर वही बनायेंगे’ हा आत्ताच्या सरकारचा नारा खरोखरच अस्तित्वात आला.
कोर्टाने संमती दिल्याने तिकडच्या विश्वस्त मंडळाने देशातील प्रत्येक राम भक्ताला देणगीचे आव्हान केले जेणेकरून राममंदिर निर्माणामध्ये सर्वांचा सहभाग असेल.
===
हे ही वाचा – ८३ वर्षाच्या साधुने राम मंदिर निर्माणासाठी केलेली ही मदत थक्क करणारी आहे!
===
देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरूपात देणगी स्वीकारली जाणार आहे त्यासाठी कालावधीही ठरला होता तो म्हणजे १५ जानेवारी ते १५ फेब्रूवारी.
त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करू लागले वर्गणी गोळा करण्याचा कालावधी संपत असतानाच ह्या कार्यक्रमाला गालबोट लागले!
झाले असे की दिल्लीस्थित एका भाजप कार्यकर्त्याला राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या आरोपावरुन जमावाने त्याला मारहाण करून त्यांचा खून केला.
===
हे ही वाचा – बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास
===
नक्की प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित व त्यांचे कुटुंब हे मंगलपुरी भागात रहात होते.आरोपी देखील त्यांच्याच घरापासून जवळ राहत होते. रिंकू शर्मा हा एका लॅब मध्ये काम करत होता तसेच तो विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता!
त्याने आरोपींमधील एकाच्या बायकोला दीड वर्षांपूर्वी रक्तही दिले होते. झाले असे कि दसऱ्याचा दिवशी एका कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद झाला आणि आरोपीच्या गटाने पीडित रिंकू शर्माला धमक्या देण्यास सुरवात केली.
वादाला सुरवात झाली होतीच त्यातच बुधवारी एका बर्थडे पार्टीच्या नावाने पुन्हा दोन्ही गटात वाद उफाळून आला. आरोपी आणि त्याचे सहकारी रिंकूच्या घरी आले त्याला बाहेर बोलावून मारहाण केली व त्याच्या पाठीत चाकू खुपसला.
पीडिताच्या कुटुंबाने त्वरित त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले परंतु उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
ताणतणावाचे वातावरण
खुनाचा वाद हा धार्मिक कारणावरून असल्याने साहजिकच त्या विभागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तिकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोशल मीडियावर ह्या घटनेचा निषेध होत आहे आणि आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी देखील होत आहे.
आरोप प्रत्यारोप
पोलिसांचे असे म्हणणे आहे की हा वाद खाण्याच्या व्यवसायावरून झाला आहे तर एकीकडे विश्व हिंदू परिषदचे म्हणणे आहे कि, हा वाद आमचा कार्यकर्ता हा राममंदिरासाठी वर्गणी गोळा करतोय म्हणून झाला आहे.
एकीकडे काँग्रेसचे मंत्री सुद्धा आरोप करत आहेत की विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते राममंदिरसाठी देणगी ऐवजी खंडणी गोळा करत आहेत.
राममंदिर व्हावे यासाठी अनेक वर्ष लोक वाट बघत होते त्यातील काही लोक आज हयातही नाहीत. राममंदिर काही वर्षात दिमाखात उभे होईल परंतु तोपर्यंत जे राजकारण होणार आहे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनीच बघावे लागेल.
रामराज्य येईलच पण ते यायच्या आधी असे किती रामभक्तांचे जीव जातील सांगत येत नाही.
===
हे ही वाचा – बाबरी मशीद प्रकरण आणि जगभरात वाढत चाललेला इस्लामद्वेष
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.