संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष! पालक मुलांचं भविष्यातील आरोग्य नासवत आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लहान मूल म्हटलं, की त्याला गोड आवडणं हे ओघाने आलंच. चॉकेलट, कॅण्डी, साखरेपासूनच बनविलेले ‘बुढ्ढी के बाल’, विविध शीतपेयं याशिवाय लाडू, पेढे, गुलाबजाम, श्रीखंड असे पदार्थ किंवा क्रिम असलेली बिस्किटं आवडत नाहीत, असं लहान मूल सापडणार नाही. लहान मुलांना गोड आवडतं म्हणून लाडानं, कौतुकानं आपण आणि आपले नातेवाईक, मित्र अगदी बिनधास्त त्यांना देत असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आठवा बरं, आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्या घरात लहान मूल असेल, तर आपण जाताना एखादी कॅडबरी घेऊन जातो किंवा हातावर पैसे ठेवून “चॉकलेट आण हं”, असं सांगतो. आपल्याही नकळत आपण त्या मुलाच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम करणारी सवय त्याला लावत असतो.
याशिवाय अलीकडच्या लहान मुलांची सवय म्हणजे त्यांना तळलेले पदार्थ अर्थात जंकफूड प्रचंड आवडतं. एक-दोन पिढ्यांआधी बाहेरचं खाणं वर्ज्य असे, मात्र ग्लोबलायझेशन झालं आणि परकीय जंकफूड कल्चर भारतातही रुजलं.
पाश्चिमात्य देश आधीच या विकतच्या जंकफ़ूडनं चिंताग्रस्त झालेले होतेच, त्यात आपली म्हणजे भारताचीही भर पडली. ही जंकफूड विकणारी आऊटलेट्स देशभरातच काय, जगभरातही झपाट्यानं पसरली याचं कारण म्हणजे त्यांची चव. मात्र ही चव राखण्यासाठी त्यात जे फॅट्स वापरले जातात ते तब्येईला निश्चितच अपायकारक असतात.
जंकफूडमध्ये मीठ, साखर आणि फॅट्सचं प्रमाण भरपूर असतं. मात्र प्रथिनं, कर्बोदकं आणि चोथा यांचं प्रमाण नगण्य असतं. म्हणूनच हे पदार्थ मनाचं समाधान करतात आणि इन्स्टंट एनर्जी देतात.
साखर आणि फॅटी फूड खाण्याची सवय मुलांना पुढच्या आयुष्यातही भोवू शकते. भलेही एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला चांगलं आणि पौष्टिक खाण्याची सवय लागली तरीही लहानपणी घेतलेला आहार परिणाम करून जातोच. हे एका संशोधनातून जगासमोर आलेलं आहे.
==
हे ही वाचा – जंक-फूड – पोटासाठी वाईट आहेच, पण मेंदूला देखील खूप घातक आहे हे माहितीये का?
==
मोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणार्या असतात. म्हणूनच तुमच्या मुलांना तुम्ही खाण्याच्या काय सवयी लावता हे महत्वाचं आहे.
आजवर ही गोष्ट आहारतज्ज्ञांना माहितच नव्हती असं नाही. मात्र, याबाबतीत ठोस संशोधन होऊन ती समोर आलेली नव्हती. कॅलिफोर्निया येथील एका विद्यापिठात झालेल्या अभ्यासामुळे ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आलेली आहे.
उंदरांवर केल्या गेलेल्या एका प्रयोगानंतर ही गोष्ट सिध्द झाली आहे. एका उंदराला लहान असताना जंकफूड देण्यात आलं आणि तो मोठा झाल्यावर त्याच्या सवयी बदलून त्याला पौष्टिक खाणं देण्यात आलं. मात्र लहान असताना खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम प्रौढ उंदरावरही झाल्याचं या अभ्यासामुळे समोर आलं.
अर्थातच हा प्रयोग उंदरावर झालेला असला, तरीही लहान मुलांवरही हे असेच परिणाम होतात असं अभ्यासकर्त्यांनी सांगितलं आहे. ज्या मुलांचा पाश्चिमात्य जंकफूड खाण्याकडे कल आहे अशांवर हा परिणाम अधिक चिंताजनक असणार आहे.
पौगंडावस्थेनंतरही किमान सहा वर्षं तरी लहानपणी खाल्ल्लेली साखर, मीठ, फॅट्स यांचं अतिरीक्त प्रमाण असलेल्या जंकफूडचा परिणाम दिसून येतो असं हा अभ्यास करणार्या मानसोपचारतज्ज्ञ थिओडोर गार्लंड यांचं मत आहे.
विविध प्रकारचे बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरस या सगळ्यांना एकत्रित microbiom म्हटलं जातं. आपल्या आतड्यांत यांचं वास्तव्य असतं आणि यातले बरेचजण आपल्या पचनक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवायलाही त्यांची मदत होत असते.
आपण जे काही अन्नघटक पोटात ढकलतो त्यांचे ही मंडळी करतात त्यातून आवश्यक अशी जीवसत्वं बाजूला काढली जातात. शरीरात ही जी यंत्रणा कार्यरत असते तिचं संतुलन बिघडलं की विविध विकार दिसू लागतात.
हा microbiom चा खेळ समजून घेण्यासाठी थिओडोर आणि त्याच्या टीमनं संशोधन केलं. यासाठी त्यांनी उंदरांना चार गटात विभागलं. काहींना संतुलित आणि पौष्टिक आहार दिला गेला. काहींना कमी पौष्टिक पाश्चिमात्य आहार दिला गेला.
काहींना या कमी पौष्टिक आहारासोबत थोडा व्यायामही दिला गेला. याशिवाय जो चौथा गट होता त्याला व्यायाम दिला नाही. तीन आठवडे या प्रकारे आहार दिल्यानंतर सगळ्यांना पुन्हा नेहमीचा आहार दिला गेला, शिवाय त्यांचा व्यायाम थांबविला.
==
हे ही वाचा – लहान मुलांना योग्य आहार देणं गरजेचं असतं. काय असावं आणि काय नसावं? वाचा…
==
यानंतर १४ आठवड्यांनी या उंदरांचं निरीक्षण केलं गेलं. बॅक्टेरियांनी उंदरांच्या या चार गटांवर नेमका काय परिणाम केला आहे याचा अभ्यास केला. हे बॅक्टेरिया कर्बोदकांच्या पचनावर परिणाम करणारे असतात.
शरीरातल्या एनर्जिवरही हे बॅक्टिरिया परिणाम करतात हेही या अभ्यासात आढळलं.
जंकफूड खाणारे तात्पुरते एनर्जेटिक असतात, मात्र कालांतरानं त्यांची एनर्जी क्षीण होते. एनर्जीतलं सातत्य राखायचं असेल तर मीठ, साखर आणि फॅट्स यांचं अतिरेकी प्रमाण असलेलं जंक फूड टाळायलाच हवं.
याशिवाय व्यायामाचा आतड्यांतील बॅक्टिरियांवर परिणाम होतो हेही थिओडोर आणि त्याच्या टिमनं केलेल्या अभ्यासात दिसून आलं.
‘खाण्या खेळण्याच्या वयात काहीही पचतं’ असं म्हटलं जातं किंवा जंक खा पण पचवायला व्यायाम करा, लहान मुलं भरपूर खेळतात, शारिरीक कष्ट करतात म्हणून त्यांना जंकफूड “पचतं” असं म्हटलं जातं, त्यातला फोलपणा या निष्कर्षांवरून लक्षात येईल.
कितीही खेळलं तरीही जंकफूडचा व्हायचा तोच परिणाम मुलांवर होणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुमची मुलं जंकफूडचा हट्ट करतील तेव्हा तुम्ही ते देऊन त्यांचे लाड करत आहात, मात्र त्यांचं भविष्य सुद्धा बिघडवत आहात.
तुमच्या मुलांचं भविष्यातील आरोग्य तुम्ही चिंतेत टाकत आहात हे लक्षात घ्या. कितीही फॅशनेबल वाटलं तरीही जंकफूड शक्य तितकं टाळा. तुमच्या मुलांना त्याची सवय किंवा व्यसन होऊ देऊ नका.
अन्यथा भविष्यात होणारे गंभीर परिणाम भोगावे लागतील.. त्याची मानसिक आणि ‘शारीरिक’ तयारी ठेवा… बरोबर ना मंडळी?
==
हे ही वाचा : तुमच्या नकळत आरोग्यावर घाला घालणाऱ्या या सवयींपासून दूरच रहा
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.