आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्टिफन किंग या जगप्रसिद्ध लेखकाचे एक वाक्य खूप लोकप्रिय आहे, “Murder is like potato chips, you cannot stop with just one!”
खरंच काय भीषण सत्य सांगू पाहतो आहे हा, कारण आजवर जे जे म्हणून “serial killer” झालेत त्यांची मानसिक स्थिती याहून वेगळी नक्कीच नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
काय गम्मत आहे पहा, मर्डर मिस्ट्री हा विषय चित्रपट, नाटक, किंवा वेब सीरिज यामध्ये एक महत्वाचा भाग बनला आहे. बघायला म्हणून ठीक आहे.
पण अशा घटनांना जी लोकं बळी पडतात, ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष ती घटना घडते ती त्यांना कित्येक पटीने उद्धवस्त करत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अनेक देशांमध्ये अशा अनेक घटना घडतात, गुन्हेगारांना शिक्षाही होते, पण तरीही अशा घटना घडतच राहतात, कारण काहीही असो.
===
हे ही वाचा – भारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या सत्यकथा तुमची झोप उडवतील
===
असाच एक भयंकर गुन्हा आपल्या महाराष्ट्रात घडला होता १९७० च्या दशकात, होय हाच तो “जोशी-अभ्यंकर खून खटला” ज्याने सगळ्यांचीच झोप उडवली होती, तेव्हाच कशाला आताही जर कोणी त्याचा नाव काढलं तरी अंगावर काटा येतो.
हा खटला इतका गाजला कि त्याच्यावर मराठीत एक चित्रपटसुद्धा बनला होता, “माफीचा साक्षीदार” ज्यात नाना पाटेकर ह्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. शिवाय अनुराग कश्यपचा थिएटरमध्ये रिलीज न होऊ शकलेला ‘पांच’ हा सिनेमासुद्धा याच घटनेवर आधारित होता!
असो, तर सांगायचे असे की, राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक यांनीच हे निर्घृण १० हत्याकांड घडवून आणले होते, यातील सुहास चांडक हा माफीचा साक्षीदार झाला.
हे सगळे तरुण अभिनव कला महाविद्यालयातले कमर्शियल आर्ट्सचे विद्यार्थी यावर कुणाचाच विश्वासही बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या हातून इतका गंभीर गुन्हा घडू शकतो याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही!
३१ ऑक्टोबर १९७६ रोजी पुण्यातील विजया नगर परिसरात राहणारे अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा यांचा त्यांनी राहत्या घरात खून केला होता व त्यानंतर १ डिसेंबर १९७६ रोजी काशिनाथशास्त्री अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिराबाई, त्यांचा नातू धनंजय, नात जाई, व घरी काम करणाऱ्या सखुबाई वाघ यांचा निर्घृण खून केला.
दोन्ही वेळेस खुनाची “मोडस ऑपेरांडी” ज्याला म्हणतात ती काहीशी सारखीच होती, दोन्ही वेळा नायलॉनची दोरी वापरण्यात आली होती व घरभर अत्तराचा मारा केला गेला ज्यामुळे श्वान पथकाला त्यांचा मग लागू नये.
दोन्ही वेळा रोख रक्कम व दागिन्यांची चोरी करण्यात आली.
या तरुणांनी हे कृत्य का बरं केलं असावं? त्यांना यांचा बदल घ्यायचा होता म्हंटलं तर दूर दूर पर्यंत काही संबंधही नव्हता, जूने वैर वैगरे तर काहीच शक्यता नाही, मग काय कारण?
कारण एकच दारूची नशा आणि मोटरसायकलची आवड पूर्ण करण्यासाठी. वा रे वा , काय पण कारण आहे, पण म्हणतात ना “addiction is a serious disease, not only for you , but for society also” हेच खरं!
पण मग इतक्या भयानक गुन्ह्यांचा छडा कसा लागला असेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण होतोच, तर त्याची गोष्ट सुद्धा थोडी गंभीर आहे!
या सगळ्यांचा अजून एक मित्र होता “अनिल गोखले” नावाचा, ज्याला काहीतरी कुणकुण लागली होती, म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ह्यांनी त्याचाही खून केला व मृतदेह येरवाडा नदीच्या पात्रात टाकून दिला.
पण इथेच ते सगळे फसले, जोशींच्या खून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याची ते पोलिसांकडे वारंवर चौकशी करत असत, त्याचवेळी पोलिसांना संशय आला आणि मग काय महाराष्ट्रालाच नव्हें तर देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे धागेदोरे उघडकीस आले.
जवळपास ६ वर्षे हा खटला चालला आणि न्यायाधीश वा.ना.बापट ह्यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, दिनांक २५ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली!
या गोष्टीला बरीच वर्षे झाली पण या घटनेचे घाव अजूनही भरलेले नाहीत तोच डिसेंबर २०१२ मधल्या निर्भया हत्याकांडाने त्यावरची जणू खपलीच काढली.
स्री मुक्तीच्या घोषणा देणाऱ्या आपल्या या देशात “निर्भया” नावाच्या मुलीवर बस मध्ये फक्त बलात्कार नव्हे तर त्याहीपेक्षा भयंकर असे काही घडले कि ज्याने पुन्हा सारा देश हादरला!
खरंच जोशी-अभ्यंकर काय किंवा निर्भया काय, किंवा आणखीन कोणती घटना काय, दोष कोणाचा? समाज व्यवस्थेचा, माणसातील दुर्गुणांचा, किंवा परिस्थितीचा, कोणीच नक्की काहीच सांगू शकत नाही!
पण अशा घटना पुढे मात्र कोणाबरोबरही घडू नयेत एवढीच इश्वरचरणी मनापासून प्रार्थना. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं ” इतनी शक्ती हमे देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना”
===
हे ही वाचा – आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.