आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय नौसेनेच्या अधिकारी आणि खलाशी वर्गाला हे वर्ष खरंच जड गेलं असणार. INS विराट, INS विक्रांत निवृत्त झाल्यामुळे सगळेच हळहळलें होते. त्यातच अजून भर पडली Tu-142 या विमानाची, Albatross स्क्वाड्रनची! या विमानांनी भारतीय नौसेनेमध्ये २९ वर्षे अखंडित सेवा दिली.
वेळोवेळी तांत्रिक सुधारणा होऊन या विमानांची ताकद वाढतच गेली. या सुधारणांमुळे त्यांचे तांत्रिक आयुष्य आता संपले आहे. पण या विमानांशी नौसेनेचे असलेले भावनिक नात्याने खुद्द ऍडमिरल लाबांना अंतिम निरोप देण्यासाठी खेचून आणले. ‘कॅच मी इफ यू कॅन’ असे आवाहन लढाऊ जेटला देणारे प्रोपेलरचे जगातील पहिल्या विमानाशी चला ओळख करून घेऊ!
पोलादी पक्ष्यांचा संक्षिप्त इतिहास:
अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर आण्विक बॉम्ब टाकून द्वितीय महायुद्धाची सांगता केली. त्यावेळी अमेरिका जगातला एकमेव आण्विक अस्त्रधारी देश बनला होता.
महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे हेच आण्विक अस्त्र दूरवर घेऊन जाणारी विमानेपण होती. द्वितीय महायुद्धानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या महाशक्तीशाली सोव्हिएट रशियाकडे ना आण्विक अस्त्र होते, ना त्यांना वाहून नेणारी विमाने! सोव्हिएट रशियाने मग आण्विक अस्त्र घेऊन जाणाऱ्या अग्निबाणांवर (मिसाईल्स) संशोधन चालू केले. पण त्यालासुद्धा एक मर्यादा होती.
शेवटी हे अग्निबाण उडून उडून युरोपपेक्षा तर दूर जाऊ शकणार नव्हते. त्यातच युद्ध संपले न संपले तोच अमेरिकी B-२९ विमानांनी होक्काईडो ते शिकागो असा भलामोठा प्रवास करून क्रेमलिनला अमेरिकन विमानांच्या ताकदीची एक हलकी छटाच दाखवली!
स्टॅलीनने जणू याचा धसकाच खाल्ला! कोण सांगावे उद्या हेच अमेरिकी विमाने रशियावर घोंघावतील आणि आण्विक हिवाळा आणतील! इथेच मुहूर्तवेढ रोवली गेली रशियन लॉन्ग रेंज स्ट्रॅटेजिक बॉम्बरची!
(क्रेमलिन म्हणजे काय माहित नसणाऱ्यांसाठी: मॉस्को क्रेमलिन – ज्याला फक्त “क्रेमलिन” असं संबोधलं जातं हा रशियाच्या राजधानी, मॉस्को तील सर्वात सुरक्षित भाग आहे. क्रेमलिन चा अर्थ आहे – शहरातील किल्ला. ह्याच भागात रशियन राष्ट्रपती आणि बहुतेक सरकारी अधिकाऱ्यांची कार्यालये आणि शासकीय निवासस्थानं आहेत.)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ थांबवण्यासाठी भारतीय सैन्याने दिलेला अभूतपूर्व लढा लक्षात आहे ना?
आंद्रेई तुपोलेव सारख्या निष्णात माणसाला स्टालिनने जुंपले! त्यांच्या चमूने रिव्हर्स इंजिनीरिंग करून बी-29 चा रशियन अवतार Tu-4 Bull जन्माला घातला! एकूण १६००० सुटे भाग यांनी जशास तसे बनवले.
कसं तरी का होईना रशियाने लांब पल्ल्याचे विमान बनवलेच! या विमानाची क्षमता होती ५१०० किमी, म्हणजेच अमेरिकेची यूरोपातील आणि पश्चिम आशियामधील सगळ्या लष्करी छावण्या आवाक्यात आल्या…! तसेच अमेरिकेच्या विमानाची हुबेहूब नक्कल केल्यानंतर त्यात थोडेफार बदल करत करत विमानाचा पल्ला मजल दर मजल करत ५००० वरून ७५०० पर्यंत पोहोचला. पण आंतरखंडीय आण्विक अस्त्रवाहू लांब पल्ल्याचे विमान हे फक्त दिवास्वप्नच राहिले!
यशाची फळे रशियन चाखत होतेच की तिकडे अमेरिकेनी B-36 आणि B-50 अशी अजून शक्तिशाली विमाने बनवून रशियाला घाम फोडला! त्यातच रशियन पॉलिटब्यूरोची उरली सुरली झोप B-50 ने जगाला फेरा मारून उडवून टाकली!
प्रोपेलर इंजिनची एक क्षमता होती आणि जेट इंजिन जरी बनले होते, तरी ते अतिशय खर्चिक होते. असे जेट इंजिन वापरणे रशियाला परवडणारे नव्हते! रिव्हर्स इंजिनीरिंग करून रशियाची ऐरोस्पेस उद्योगाची क्षमता कैक पटींनी वाढली होती!
यामुळेच जन्म झाला TU-95 Bear या जगातल्या अनोख्या पोलादी पक्षाचा!
Tu-95 चा उगम:
या विमानाच्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचे कारण होते लांब पल्ला! जमीनीपासून कमीत कमी ३०००० फूट वर उडून आण्विक अस्त्राने हल्ल्याची धमकी देऊन मागण्या पूर्ण करून घेणे आणि वेळ पडलीच तर शत्रू प्रदेशात आत जाऊन मोक्याचे ठिकाणे नष्ट करणे, हा शीत युद्धाने दिलेला एक प्रबळ डावपेच आहे. याच गरजा लक्षात घेऊन या विमानाची निर्मिती झाली!
१६५ फूट पंखांचा विस्तार, इंधन न भरता जवळपास १४५०० किमी उडण्याची क्षमता, एकूण १४००० अश्वशक्तीचे शीत युद्धातील तांत्रिक नाविन्यपूर्ण असलेली चार NK-12M इंजिने, २० फुटांचे प्रोपेलर, विरुद्ध दिशेनी फिरणारे पाते, पात्यांच्या टोकांचा ध्वनीपेक्षा जास्त वेगामुळे तयार झालेला मोठा आवाज आणि रशियाचा सगळ्यात मोठा अणूबॉम्ब ‘झार बॉम्ब’ टाकायचा लौकिक!
(या झार बॉम्बचा – सर्वात बलाढ्य अणु बॉम्बचा – इतिहास मोठा रंजक आहे. नक्की वाचा: झार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा)
आजसुद्धा हे विमान जगातील वेगवान प्रोपेलर युक्त विमान आहे! या विमानाच्या आसपास फिरकणे किंवा मार्गात मध्येच अटकाव करणे आजच्या प्रबळ आणि आधुनिक लढाऊ विमानालासुद्धा अवघड जात असे आणि आज सुद्धा जाते!
एक मजेची बाब म्हणजे, निकिता ख्रुश्चेव सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाल्यानंतर, विमानाच्या चाचण्या अर्धवट सोडून, याच विमानाने आपल्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यावर गेले. तिथे पोहोचले तर विमानातून उतरायला अमेरिकेकडे मोठी शिडीच नव्हती! एका झटक्यात रशियाने अमेरिकेला आकाशीय कूटनीतीमध्ये खुजे बनवून टाकले! अमेरिकन राज्यकर्ते आणि लष्करी अधिकारी यांची बोलती बंद झाली हे वेगळे सांगायची गरज नको!
–
हे ही वाचा – भारताचं “हवाई टायटॅनिक”… एका क्षुल्लक चुकीमुळे अरबी समुद्रात बुडालं होतं…
याच विमानाचा उपयोग रशियन लोकांनी आपल्या अजस्त्र देशात फिरण्यासाठीपण केला. Tu-114 हे त्या मॉडेलचे नाव!
भारतीय नौसेनेमध्ये प्रवेश:
लॉकहीड L1049G Super Constellation या विमानांची जागा घेण्यासाठी Tu -142 सोव्हिएट रशियाकडून घेण्यात आले. त्यांचे नौसेनेमध्ये स्वागत खुद्द तत्कालीन संरक्षण मंत्री पंत यांनी केले.
३० मार्च १९८८ मध्ये पहिल्या तीन Tu-142 विमानांचे INS Hansa, गोवा येथे आगमन झाले आणि शामिल झाले Albatross स्क्वाड्रनमध्ये! नंतर हि विमाने चेन्नईपासून ९० किमी स्थित INS राजाली येथे स्थलांतरित करण्यात आली, भारतीय नौसेनेमधले सगळ्यात प्रबळ आणि शक्तिशाली long range maritime reconnaissance विमान म्हणून! १९९९ च्या प्रजासत्ताक दिनी Tu -142 ने भारतीय नौसेनेचे पहिले नेव्हल विमान म्हणून आपला पहिला सहभाग नोंदवला.
भारतीय नौसेनेमध्ये या विमानाची जबाबदारी होती ती म्हणजे सखोल टेहळणी, समुद्री गस्त, आणि शत्रू पाणबुड्यांचा नाश!
भारतीय नौसेनेची क्षमता त्या काळात दक्षिण-पूर्व आशियामध्ये कैक पटींनी वाढली. भारताची भौगोलिक स्थान बघता Tu-142 ने फार म्हत्वाची भूमिका बजावली.
IPKF ऑपरेशन्स, ऑपरेशन कॅकटस, ऑपरेशन विजय (१९९८), ऑपरेशन पराक्रम (२००२) मधील योगदानामुळे Tu -142 ने भारतीय नौसेनेच्या हवाई इतिहासात स्वतःची जागा निर्माण केली. हे सांगण्याची गरज नाही की हिंदी महासागर परिसरात सखोल व चोख टेहळणी आणि समुद्री चाच्यांवर करडी नजर प्रस्थापपित करण्यात या squadronचे किती मोठे योगदान आहे.
या squadron चा खरा लौकिकार्थ म्हणजे विना अपघात ३०,००० फ्लायिंग तासांचे उड्डाण!
Anti-submarine warfare अंतर्गत हे विमान भारतीय भूप्रदेशाजवळ सलग साडे दहा तास उड्डाण करायचे. Tropex 2017 या नौसेनेच्या वार्षिक कवायती मध्ये सलग ५२ तास उड्डाण करून या विमानांनी शेवटपर्यंत आपली चुणूक दाखवून दिली. इस्रायलच्या ELTA रडारने यांची घातकता अजून वाढवली. या विमानांनी आपले तांत्रिक आयुष्य आता यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या पुढे यांचा देखभाल परवडण्यासारखा नसल्यामुळे यांना आता सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.
Tu-142M संबंधित हा व्हिडीओ आणि Tu-142M ला दिलेल्या अखेरच्या मानवंदनेचा आणखी एक व्हिडीओ नक्की बघा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – आज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.