' बाहुलीशी संबंध आणि तिलाच जोडीदार मानणं! असा हा पठ्ठ्या विचित्र की वासनांध? – InMarathi

बाहुलीशी संबंध आणि तिलाच जोडीदार मानणं! असा हा पठ्ठ्या विचित्र की वासनांध?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘व्हॅलेन्टाईन डे’ जवळ आला की प्रेमात आकंठ बुडालेली, प्रेमाच्या आणाभाका खाणारी, प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी जोडपी जागोजागी दिसून येतात.

हल्ली व्हॅलेन्टाईन डे पेक्षाही व्हॅलेन्टाईन वीक अर्थात आठवडाभर प्रेमाचा सप्ताह साजरा करण्याचाही अनेकांचा उत्साह असतो.

 

Couple in Temple Inmarathi

 

प्रत्येकाची लव्हस्टोरी इतरांपेक्षा वेगळी असते हे देखील कबूल, त्यानुसार प्रेमकथा आपल्याला आनंद देतात, प्रेम करण्यास भाग पाडतात मात्र काही प्रेमकहाण्या मात्र भंडावून सोडतात, चक्रावतात.

प्रत्येकाला प्रेम करण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा पुर्ण अधिकार आहे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीसह संपुर्ण आयुष्य आनंदात घालवण्यासाठी लग्नसंस्थेसारखा उत्तम पर्यायही समाजाने दिला आहे.

मात्र आज जी प्रेमकथा आम्ही सांगणार आहोत ती वाचून प्रत्येक भारतीय कपाळावर हात मारेल किंवा खांदे उडवून म्हणेल, ऐकावं ते नवलंच. कारण हॉंगकॉंग मधल्या हा प्रेमवीराने चक्क सेक्स डॉलच्या बोटात अंगठी चढवत तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा – जपानमधील हा अजब लग्नप्रकार तुम्हाला माहित आहे का?

काय आहे प्रकरण?

हॉंगकॉंग मधील ३६ वर्षीय शाई टियनरॉन्ग हा वरकरणी सर्वसामान्य माणूस. नोकरी, कुटुंब यांच्यासह सामान्य आयुष्य जगणा-या शाईने शारिरीक गरज म्हणून एक सेस्क डॉल विकत घेतली.

सेक्स टॉईज हा विषय भारतात तितकासा प्रचलीत नसला तरी परदेशात मात्र त्याचा सर्रास वापर केला जातो. तर शाईने एक महागडी बाहुली घरी आणली. 

 

sex doll inmarathi

 

सुरवातीला त्याचा वापर केवळ शारिरीक सुखासाठी केला जात होता. मात्र काही महिन्यांनंतर ही बाहुली केवळ शारिरीक गरज राहिली नसून तिच्या जीव अडकल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सुरवातीला आपल्याला केवळ या बाहुलीची सवय झाली असावी असा त्याचा समज होता, मात्र काला्ंतराने या बाहुलीवर आपलं खरंखुरं प्रेम जडल्याचं त्याने मान्य केलं.

बाहुलीवरचं प्रेम का?

कोणाला कोणाबद्दल आकर्षण वाटेल याचा काही नेम नाही. विजोड जोड्या आपण कायम बघत असलो तरी माणुस आणि बाहुली हे समीकरण अगदीच अनाकलनीय आहे.

शाईला मुलींपेक्षा बाहुल्यांमध्ये जास्त इंटरेस्ट होता. मुलींपेक्षा बाहुल्या अधिक देखण्या आणि लाघवी असतात असं त्याचं मत आहे. यासाठीच एखाद्या मुलीच्या प्रेमात न पडता त्याने बाहुलीची निवड केली. 

 

doll inmarathi

 

काही महिन्यांपासून या बाहुलीचा परिचय असला तरी हा सहवास आयुष्यभर रहावा असं त्याने तेथिल माध्यमांना सांगितलं आहे.

हे ही वाचा – नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

नव्या आयुष्याची सुरुवात

हा प्रेमवीर केवळ प्रेम व्यक्त करून थांबला नाही, तर काही दिवसांपुर्वीच त्याने या बाहुलीच्या बोटात महागडी अंगठी घालून तिला आयुष्यभराची जोडीदार म्हणून घोषित केलं आहे.

त्यांचा साखरपुडा हा केवळ हॉंगकॉंगसाठीच नव्हे तर इतर देशांसाठीही चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अनेकांनी शाईला मुर्खात काढलं असलं तरी त्याला त्याची काही फिकीर नाही.

साखरपुड्यानंतर शाईचं प्रेम अधिक ऊतु जात असून त्याने ख-याखु-या प्रेयसीप्रमाणे बाहुलीवर भेटवस्तुंचा वर्षाव केला आहे. महागडा आयफोन, चॉकलेट, केक, फुल अशी नवी गिफ्ट दररोज शाईकडून दिली जाताना पाहिल्यानंतर अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.

 

doll wedding inmarathi

 

येत्या काही महिन्यातच आपण या बाहुलीशी विवाहबद्ध होत असल्याचंही शाईने प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं आहे. 

लोकांच्या अजब आवडीनिवडी आणि त्यांच्या विचित्र सवयी यांची आणखी किती अजब उदाहरणं बघायला मिळणार आहेत याची कल्पनाही न केलेली बरी!

हे ही वाचा – “पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा” जी बंगालमध्ये आजही पाळली जाते!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?