Site icon InMarathi

कर्ज घेताना तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवर लक्ष ठेवायलाच पाहिजे, नाहीतर…

cibil score featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उद्या मिळू शकणाऱ्या वस्तू किंवा सेवा आज मिळवण्यासाठी आपण कर्ज घेत असतो. कर्ज कोणाला, किती, कधी द्यावं? हा अधिकार हा पूर्णपणे कर्ज देणारी संस्था, बँक यांच्याकडे असतो.

कर्ज, त्याची वेळेत भरपाई, काही मुदतवाढ हवी असल्यास त्याची मुभा या सर्व प्रक्रियेला ‘सिबील स्कोर’ या प्रणाली सोबत संलग्न करण्यात आलं आहे.

‘सिबील स्कोर’ म्हणजे ‘तुमच्या कर्जाची पात्रता’ हे सोप्या शब्दात म्हणता येईल. भारतात २००० साली ट्रान्सयुनियन सिबील लिमिटेड या कंपनीच्या अधिपत्याखाली सिबील स्कोरची सुरुवात करण्यात आली.

 

 

ट्रान्सयुनियन ही अमेरिकेच्या कंपनीने ही प्रणाली भारतात राबवण्यासाठी योगदान दिलं आहे. कोणत्याही व्यवसाय आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्जाची पूर्ण माहिती या संस्थेकडे असते.

जेंव्हापासून भारतात पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट खाते क्रमांक हे जोडण्यात आलं आहे तेव्हापासून ‘सिबील स्कोर’ सादर करणे ही प्रक्रिया जास्त सहज झाली आहे असं अर्थतज्ञ सांगतात.

तुम्ही कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेतले आहे आणि ते तुमच्या बँक खात्यात जमा झालं आहे, तर त्याचा पूर्ण तपशील ‘सिबील स्कोर’ मध्ये समाविष्ट केलेला असतो. कर्ज घेतांना ‘तुमचा सिबील स्कोर’ हा ७०० च्या पुढे असावा अशी कोणत्याही आर्थिक संस्थेची अपेक्षा असते.

नोकरदार व्यक्तींनी ‘सिबील स्कोर’ बद्दल नेहमीच सतर्क असण्याची आवश्यकता आहे, पण नियमित कर्जफेड होत असल्यावर त्याचा धसका घ्यायची गरज नाहीये.

===

हे ही वाचा क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल !

===

खाली नमूद केलेले काही गैरसमज मात्र याबाबतीत फार प्रचलित आहेत त्या शंकांचं निरसन करणं हा या लेखाचा उद्देश आहे:

१. सिबील म्हणजे कर्ज बुडवणाऱ्या लोकांची माहिती :

 

 

सिबील हे फक्त तुम्ही घेतलेल्या कर्जाची माहिती म्हणजेच फक्त ‘क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट’ ठेवत असते. तुमचे कर्जाचे हफ्ते चुकले ही माहिती ठेवणं हे बँकेचं किंवा अर्थसंस्थेचं काम आहे.

‘सिबील स्कोर’ आपल्याला देण्यामागे केवळ तुमच्यावरील सध्याचं कर्ज, आधी कर्ज मिळालेले व्याज दर याची माहिती सहजपणे देणं आहे. प्रत्येक बँकेची कर्ज देण्याची पद्धत म्हणजेच ‘क्रेडिट पॉलिसी’ असते त्यानुसारच बँक कर्ज देत असते.

चांगला सिबील स्कोर ही ते कर्ज तुम्हाला मिळू शकण्याची शक्यता वाढवत असते. तुमचा एखादा कर्जाचा हप्ता चुकला, चेक बाऊन्स झाला आणि जर तुम्ही वेळेत ती रक्कम अदा केली तर तुमच्या सिबील स्कोरवर काहीही फरक पडत नाही.

तुम्ही एखाद्या चेकला स्टॉप पेमेंट जरी पर्याय निवडला तरीही तुमच्या सिबील स्कोरचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो.

 

२. सिबील हे फक्त बँकांसाठी तयार करण्यात आलं आहे :

 

 

सिबील हा बँकांसाठी तर उपयुक्त आहेच. पण, तुमच्या कर्जाची गरज आणि तुम्हाला उपलब्ध होऊ शकणारं कर्ज हे तुम्हाला कुठेही न जाता कळण्यासाठी सिबील स्कोर सुरू करण्यात आला आहे.

‘आर्थिक शिस्त’ ही प्रत्येकात यावी या हेतुने सुद्धा सिबील स्कोरची सुरुवात करण्यात आली आहे. तुमच्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे आहेत या सर्वांशी सिबील स्कोरचा काहीही संबंध नसतो.

 

३. बिल उशिराने भरणे :

 

 

काही लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, आपण एखादं सरकारी बिल किंवा इन्कम टॅक्स रिटर्न जर का वेळेत भरले नाहीत तर आपला ‘सिबील स्कोर’ हा खराब होऊ शकतो. तर असं काहीही नसतं. कर्ज हे तुम्ही घेतलेले पैसे असतात जे की वेळेत परत करायचे असतात.

तुम्ही घेतलेली सेवा जसं की वीज, पाणी यांचा मोबदला तुमच्या कडून घेणं हे त्या संस्थेचं काम असतं.

नवीन पोस्टपेड कनेक्शन देतांना सिबील स्कोर बघितला जाईल असं फक्त मध्यंतरी काही टेलिफोन कंपन्यांनी सतर्कता म्हणून घोषित केलं आहे. तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरणे मात्र चांगल्या सिबील स्कोरसाठी अपेक्षित आहे.

 

४. सिबील स्कोर बघितल्याने तो कमी होतो :

 

 

तुम्ही कितीही वेळेस जरी सिबील रिपोर्ट डाउनलोड केला तरीही त्यात काही फरक पडत नाही. दर सहा महिन्यांनी सिबील स्कोर एकदा बघावा असं आर्थिक सल्लागार सांगतात.

तुम्ही सिबील स्कोर बघणं आणि कोणत्या बँकेने त्याची चौकशी करणं यात फरक आहे. कर्ज देऊ शकणाऱ्या बँकेने सिबीलची चौकशीला हार्ड इन्क्वायरी असं म्हणतात.

ती कमीत कमी वेळेस व्हावी असं सांगितलं जातं. त्यामुळेच एकाच वेळी तीन चार बँकेत कर्जासाठी अर्ज देऊ नये. एका बँकेकडून नकार आला तरच दुसऱ्या बँकेकडे जावे.

 

५. तुमच्या पार्टनरचा सिबील स्कोर हा तुमच्या कर्जाची रक्कम ठरवतो :

 

 

काही दाम्पत्य हे बँक अकाउंट आणि गृहकर्जात ‘को-ऍप्लिकंट’ असतात. नवीन व्यक्तिगत कर्ज घेत असताना दोघांनाही एकमेकांच्या सिबील स्कोरचा काहीही फरक पडत नसतो.

सिबील स्कोर हा व्यक्तिगत असतो. जितके पॅन कार्ड, तितके सिबील स्कोर. तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेतांना फक्त तुमचा आजपर्यंतचा आर्थिक व्यवहार बघितला जातो.

६. सिबील स्कोर कमी म्हणजे कर्ज मिळणारच नाही :

एका बँकेने कमी सिबील स्कोरमुळे कर्ज दिलं नाही म्हणजे कोणीच देणार नाही असं होत नाही. तुम्हाला दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळू शकतं, कदाचित त्यासाठी तुम्हाला थोडा अधिक व्याजदर मान्य करावा लागेल.

७. काहीच कर्ज नसणे म्हणजे चांगलं :

 

 

ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावं. पण, हे काही अपेक्षित नाहीये. कर्जदार हे नेहमी कर्ज घेऊन वेळेत भरलेल्या लोकांना नवीन कर्जासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या कर्जात हमीदार म्हणून मान्य करत असतात.

तुमचा कर्जफेडीचा ट्रॅक हा नियमित असायला हवा, कोरा नाही. कर्ज तितकंच घ्यावं जितकं परतफेड करता येईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं.

कोणताही हप्ता चुकू न देणं हे नंतर भराव्या लागणाऱ्या दोन हप्त्यांपेक्षा कधीही चांगलं हे समजून बँकांच्या तारखेनुसार आपलं आर्थिक नियोजन करायला पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी तुमचा ‘सिबील स्कोर’ बघणे याचा अधिकार तुमचं खातं असलेल्या बँकेला दिलेला असतो हे सुद्धा लक्षात असू द्यावं.

सिबील स्कोर ८०० आहे म्हणून गरज नसतांना कर्ज काढू नये आणि कर्जाचा धसका घेऊन चुकीचं पाउलं उचलू नये हे सुद्धा सगळेच आर्थिक सल्लागार सांगतात.

===

हे ही वाचा – कर्ज घेताय? थांबा! कर्ज घेतल्यावर मनस्ताप टाळण्यासाठी आधी या ८ गोष्टी तपासा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version