' काँग्रेस उभी करणार ५ लाख “सोशल मीडिया योद्धे” असणारी फौज – InMarathi

काँग्रेस उभी करणार ५ लाख “सोशल मीडिया योद्धे” असणारी फौज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०१४ साली भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे अनेक कारणे असली तरी त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे सोशल मीडिया!

‘अब की बार मोदी सरकार’ सारखी कॅम्पेन यशस्वी ठरली २०१४ च्या निवडणुकीनंतर सोशल मीडियावर भाजप सर्वात सक्रिय राजकीय पक्ष बनला. भारताच्या राजकारणातील एक महत्वाचा बदल होता.

 

bjp inmarathi

 

सुरवात :

२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक रणनीतीचा एक भाग म्हणून सोशल मीडियाचा वापर करून आपला जनसमूह वाढविला.

भाजपच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) त्यांच्या अनुयायांनी केलेली राजकीय ट्वीटची संख्या, ते सुरक्षित करण्यात सक्षम रीट्वीट आणि मोहिमेच्या संपूर्ण आघाडीसाठी सकारात्मक पोस्ट या स्पर्धेत पुढे होते.

===

हे ही वाचा भाजपचा निवडणुकातील ‘पेज प्रमुख’ ब्रांड अॅम्बेसेडर २०१९ ची दिशा ठरवेल?

===

तसेच एकीकडे स्टॅनफर्ड च्या सर्व्हेनुसार २०१२ साली स्थापन झालेल्या आप ह्या पक्षकडे २०१४ च्या निवडणुकीत सर्वात जास्त सोशल मीडिया मजबूत होते.

 

BJP social media inmarathi

 

येत्या काळात काही राज्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत एकीकडे भाजपचे प्राबल्य वाढत असताना त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसने देखील आपला सोशल मीडिया मजबूत करण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी नजीकच्या काळात ‘पाच लाख सोशल मीडिया वॉरियर्स’ यांची भरती करणार आहेत.

त्याबाबतचा  हेल्पलाईन नंबर येत्या काळात ते  त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर टाकणार आहेत. भाजपने काही राज्यात होऊन गेलेल्या निडणुकांमध्ये अशीच रणनीती आखली होती.

मागील दोन लोकसभा निवणुकीत झालेल्या प्रभावामुळे उशिरा का होईना काँग्रेस ला शहाणपण आलेले दिसून येते त्यामुळेच त्यांनी ही आता सोशल मीडियाच्या मैदानात उडी घेतली आहे.

भरती कशी होणार?

काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या माहितीनुसार ह्या भरतीमध्ये देशाच्या विविध जिल्ह्यांमधून पन्नास हजार लोकांची निवड करणार आहेत तसेच ह्या वॉरियर्स ना मदत करण्यासाठी साडेचार लाख कार्यकर्ते जोडणार आहेत.

भरतीसाठी कडक परीक्षा घेतली जाणार आहे त्याबतचे शिबीर ही घेतले जाणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

 

congress inmarathi

 

भाजपची पीछेहाट?

गेल्या काही वर्षात नरेंद्र मोदी यांना अनेक लोक फॉलो करत होते, त्यांची लोकप्रियता सोशल मीडियावर वाढताना दिसून येत होती, मन की बात कार्यक्रमातून ते देशाला संबोधित करायचे.

मात्र वाढते लॉकडाऊन, बरोजगारी, महागाई अशा अनेक कारणामुळे त्यांना अनेक लोकांनी अनफॉलो  केले होते. नुकतेच जाहीर झालेल्या बजेटमध्ये सामान्य लोकांसाठी विशेष काही नसल्याने त्यावरूनही टीका होत आहे.

त्यामुळे येत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडिया वर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका नक्कीच पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.

===

हे ही वाचा राहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?