आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘आपण आज लावलेल्या आम्रवृक्षाची सावली आणि रसाळ फळं पुढच्या पिढीला चाखायला मिळतील’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. घराण्याची परंपरा, रितीरिवाज, संस्कार यांची शिदोरी एका पिढीकडून दुस-या पिढीला सोपवली जाते. मात्र त्यासह आधीच्या पिढीने केलेलं सत्कर्म, जपलेला ठेवा यांची पुण्याई देखील भावी पिढीला मिळते यात शंका नाही.
आपल्या पणजोबांनी, आजोबांनी कमाविलेलं सारंकाही वडिलांच्या हाती सोपवलं गेलं, त्यानंतर वडिलांनी ते सांभाळलं, जपलं, वाढवलं आणि त्यानंतर ती जबाबदारी त्यांनी आपल्या समर्थ खांद्यांवर सोपवली, ही प्रत्येक घराची गोष्ट आहे.
पिढ्यांच्या या प्रवासात संस्कार, जबाबदा-या असल्या तरी आपल्या आधीच्या पिढीने कमावलेलं खूप काही आपल्याला आयतं मिळतं, हे देखील दुर्लक्षून चालणार नाही. मग त्यात पिढीजात जपलेलं घर असो, सोननाणं असो, वा त्यांची पुण्याई…
–
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : व्यापा-याच्या फसवणूकीचा असाही उलटा परिणाम
–
म्हणूनच केवळ आपल्या कुटूंबापुरता मर्यादित विचार न करता आपल्या पुढील पिण्यांचाही विचार करत आज सत्कर्म करावं असं म्हटलं जातं ते योग्यच.
भारतासाठी दुष्काळ ही बाब काही नवी नाही. रणरणत्या ऊन्हात काखेत आणि डोईवर पाण्याचा हंडा नेताना चटके सोसणा-या माऊली आपण गावोगावी नेहमीच पाहतो.
अपुरा पाऊस, पाणी साठवण्याबाबत शासनाची उदासिनता यासर्वांचा फटका कायमच बसतो तो इथल्या सामान्य माणासाला.
शहरात केवळ एक दिवस नळाची धार मंदावली तरी जीव कासाविस होत असणा-यांना गावातील दुष्काळ कल्पनेपलिकडचा आहे.
मात्र या समस्यांवर केवळ टिका करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा असा संदेश देणारी ही कथा प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालते.
गोष्ट त्या काळाची जेंव्हा सर्रास बालविवाह होत होते. पुर्व मथुरेतील एक लहानसं खेडं, एका छोट्या मुलीच्या आईवडिलांनीही प्रथेप्रमाणे तिचा विवाह उरकला आणि ते जबाबदारीतून मोकळे झाले. सुखाने नांदा असा आशिर्वाद देताना मात्र मुलीच्या नशिबात येणा-या दुःखांची त्यांना कुणकुणही नव्हती.
नव्याची नवलाई संपण्यापुर्वीच तिच्या पतीचं निधन झालं आणि बालवयातचं तिच्यावर वैधव्य नशिबी आलं. तेंव्हाच्या समाजरुढीप्रमाणे अनेक बंधनांच्या कुंपणात तिचं जीवन कधी गुरफटलं गेलं हे तिलाही कळलं नाही.
एकीकडे आयुष्यभराचं दुःख आणि दुसरीकडे कुटुंबाने फिरवलेली पाठ त्यातच बालवयात लग्न झाल्यामुळे पुरेशी समजा ही तिला नव्हती तसेच शिक्षणाशी दूरदूर संबंध नसल्याने स्वतःचे पोट भरेल इतपत तरी कमवावे लागेल ह्याच गोष्टीची फक्त तिला जाणीव होती, यांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी तिने एका पीठाच्या गिरणीत काम करण्यास सुरुवात केली.
पूर्वी गावाकडून शहराकडे जाण्यासाठी काही फारशी साधने नव्हती तसेच वाटेत तहान लागल्यास पाणी मिळेल अशी ही शाश्वती नसायची.
ऊन्हाचे चटके सोसत, थकलेले वाटसरू पाण्याच्या शोधात हिडताना तिने अनेकदा पाहिले, मात्र हे चित्र तिला अस्वस्थ करत होते.
मुळातच संवेदनशील असलेल्या तिला या वाटसरूंसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मात्र स्वतःचाच जेमतेम उदरनिर्वाह पुर्ण करताना तिचा खिसा मात्र कायमच रिकामा रहात होता.
‘हे गाव म्हणजेच माझं कुटुंब’ या विचाराने तिने रोजच्या कमाईतून थोडे पैसे शिल्लक ठेवण्यास सुरुवात केली. मुळातच रक्कम तुटपुंजी असल्याने पैसे साठण्याचा वेग अत्यंत मंद होता.
–
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : मनाच्या उत्साहाचं रहस्य
–
मात्र तिची जिद्द, चिकाटी यांना तोड नव्हती. काही काळानंतर तर केवळ पैसे साठवण्याच्या हेतूने ती काम करत होती. अखेरीस पुरेशी रक्कम जमा झाल्याचं लक्षात येताच ती रक्कमेच्या सहाय्याने तिने रस्त्याच्या कडेला एक विहीर बांधून घेतली.
पुढे तो रस्ता दिल्ली मथुरा हायवे म्हणून ओळखला जाऊ लागला. रस्त्यावर प्रवाशांची संख्या वाढू लागली आणि ती विहीर अनेकांसाठी संजीवनी ठरू लागली.
अनेक वर्षांपुर्वी कष्ट करणारी ही माऊली कोण? कुठली? याची कल्पनाही नसलेलेे प्रवासी तिच्या प्रयत्नांचा लाभ घेत आहेत. स्वतःचे कुटुंब नसले तरी अनेक कुटुंबियांना पाण्याचं वरदान देणारी ही माऊली आपल्याला जीवनाचा मंत्र देते.
केवळ आपण स्वतः किंवा आपले कुटुंब असा साचेबद्ध विचार न करता इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करा, तुमच्या एका कृतीचा फायदा पुढील अनेक पिढ्यांना होईल.
या नव्या पिढीत तुमची मुलं, नातवंड यांचाच समावेश असल्याने तुमच्याच प्रियजनांसाठी आजपासून नित्याने एक तरी सत्कर्म करा हे सांगणारी ही कथा प्रत्येकाला केवळ भविष्याकडेच नव्हे तर वर्तमानाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते.
आपले आयुष्य जगता जगता कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांसाठी काही करून जावे हाआपल्या पूर्वजांचा ठेवा आपण पुढच्या पिढी कडे नेला पाहिजे.
–
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : संकटात कोणीतरी सोबत असतं!
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.