' तुम्ही बनावट ॲप्लिकेशन्स तर वापरत नाही ना? वेळीच सावध व्हा, नाहीतर… – InMarathi

तुम्ही बनावट ॲप्लिकेशन्स तर वापरत नाही ना? वेळीच सावध व्हा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज देशात तसेच संपूर्ण जगात डिजिटल क्रांती झाली आहे. लोक आजकाल घरातच बसून सर्व व्यवहार करत असतात. अगदी बॅंकचे व्यवहार असो किंवा अगदी घरातील एखादी वस्तू विकायची असो लोक सगळे व्यवहार कॅशलेस करत आहेत.

 

online precautions inmarathi

 

शहरापासून ते अगदी खेडोपाड्यापर्यंत सर्व दुकाने,पान टपऱ्या इथे सर्रास कॅशलेस व्यवहार होताना दिसून येतात, पण कुठलेही तंत्रज्ञान आले की त्यासोबतीने त्याचे जसे फायदे असतात तेवढे तोटे ही असतात.

आजकाल जरी व्यवहार कॅशलेस झाले असले तरी तितकेच ऑनलाईन फसवणूकीचे व्यवहार देखील वाढले आहेत. हल्ली सर्रास अनेक लोंकाना ऑनलाईन गंडा घातला जातो.

केवळ ऑनलाईन पेमेंट करणारी ॲप्लिकेशन्स नव्हे तर कपडे, खाद्यपदार्थ, औषधं यांसारख्या खरेदीच्या माध्यमांमध्येही अनेक फेक ॲप्लिकेशन्स अर्थात फसवणूक करणारी अॅप्स सध्या कार्यरत आहेत.

हे ही वाचा – ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

 

online shopping inmarathi'

 

चला तर मग बघूया ऑनलाईन फसवणूकीपासून कसे वाचता येईल?

कोणती काळजी घ्याल?

तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग आणि युनिक असू द्या

कोणता ही पासवर्ड किंवा UPI पिन सेट करताना तो अप्पर आणि लोअर केस अक्षरे, characters आणि numerics  मध्ये असेल असा ठेवा.

 

password inmarathi

 

आपले नाव, वाहन क्रमांक, घर क्रमांक, घरचा फोन नंबर, मोबाइल नंबर,  किंवा जन्मतारीख यासंबंधी कोणत्याही माहितीचा पासवर्ड ठेवणे टाळा.

हे ही वाचा – एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा…

आपली माहिती शेअर न करणे 

कोणतीही बँक अथवा ॲप्लिकेशन्स तुम्हाला कधीच तुमची माहिती विचारणार नाही त्यामुळे असा कधी कॉल आल्यास आपली कोणतं ही माहिती त्यांच्या जवळ शेअर करू नका.

आपला UPI पिन पासवर्ड आपले घरच्यांव्यतिरिक्त इतर कोणासोबतही शेअर करू नका.

 

shuuu

 

लक्षात ठेवा UPI पिन हा तेव्हाच टाकतात जेव्हा  आपल्याला लोकांना पैसे द्याचे असतात, जेव्हा लोकांकडून पैसे घायचे असतात तेव्हा UPI पिन टाकला जात नाही त्यातील प्रकार नीट समजून घ्या.

बनावट ॲप्लिकेशन्स पासून सावधान

अनेक बनावट ॲप्लिकेशन्स आज उपलब्ध आहेत ज्या मध्ये ग्राहकाना आकर्षित करून त्यांना फसवले जाते. त्यामुळे अशी ॲप्स घेणे टाळा. जी ॲप्लिकेशन्स लोकप्रिय आहेत तीच डाउनलोड करा.

 

apps inmarathi

 

याबाबत अधिक माहिती नसल्यास आपल्या परिचयातील विश्वासू व्यक्तीशी चर्चा करा. इंटरनेटवरही याबाबत बरीच माहिती उपलब्ध आहे.

एखादे नवे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करताना त्याबाबत सविस्तर माहिती मिळवून खात्री करा, मगच ते डाऊनलोड करून त्याचा वापर सुरु करा.

फसवणूक झाल्यास तक्रार कुठे दाखल कराल ?

कृपया शक्य तितक्या लवकर सायबर-सेलला संभाव्य प्रकरणांचा अहवाल द्या. वेगवान अहवाल देणे बर्‍याचदा गमावलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते.

नुकतेच हैदराबाद येथे बनावट Paytm अकाउंट वरून एक दुकानदाराला फसवले, पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेगारांना अटक केली अशाच धर्तीवर अनेक ठिकाणी घटना घडत आहेत त्यामुळे आपण सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

हे ही वाचा – ‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?